अप्रकाशित कविता - मी आणि माझी आऊ
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
आहे शान्त नितान्त सुन्दर अषा; आकाशपन्थीं निळ्या
शिस्तीवांचुनि मेघ मध्यमगती काळे, भुरे, कापशी
नैऋत्येकडुनी चढून ठरती, जाती पुन्हा खालती
ऐकामागुनि ऐक मानवपिढया याकालपृष्टीं जशा.
छाया आणि रविप्रभा विहरती भूमीवरी चञ्चला
विश्वाच्या हृदयांतल्या गमति त्या आशानिराशा मला;
आहें खेळत ग्यालरींत बसलों मी पुस्तकांसङगतीं
केव्हाचें परि सर्व लक्ष्य अपुलें वाटेकडे लागलें.
आऊ ठेवुनि एकला मज घरीं बाहेर गेली असे,
पातेलीमधि दूधभाकर - मला आहे क्षुधा लागली.
आधी येऊनि हासुनी मम मुके घेऊल ती साखरी,
पोटाशी धरल्यावरी मज तिने मी भाकरी खाऊन.
जें तीं दे - मग मीठभाकर असो - सर्वाहुनी गोड ती
जें पाणी नयनांमधूनि तिचिया माझ्यावरी लोटतें
गंगास्नानहि तुच्छ त्या पुढति, की आचार साधे तिचे,
प्रीती गाढ, विचार अन्नत खरे, त्यांचे असें मूळ मी.
१६ जून १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP