अप्रकाशित कविता - To My Mother

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


रवितापाने बदलुन जाऊन, अपुली आऊ धरणी
अजला सोडुन थेम्ब जलाचा सवायु विहरे गगनीं;
मातृप्रेम तयाचें परि त्या वरती राहुं न देऊ -
विकल होऊनी तो विरहाने झेंप खालती घेऊ;
अमर हृदय आऊचें अघडुन त्याला घेऊ आंत -
सदा सारखें ! कुठे असो तें सुखांत वा दु:खांत !
तसाच आऊ मी रागावुन, तुजवर झालों दूर;
राग परी तो प्रेमजन्य, मज वाटे मग हुरहूर.
अत्कण्ठेने धावत आलों पुनरपि तुझियापाशी;
कारण जें तुजपाशी तें नच इथे न वा आकाशीं.
तर घे आऊ, अचलुन मजला, मीलन हें किति गोड !
तुझ्या मुलाचें कोण तुजविना तुजसम पुरविल कोड ?

१३ जुलै १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP