अप्रकाशित कविता - बहुत हट्ट करूनि पदोपदीं

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[वृत्त : द्रुतविलम्बित]

बहुत हट्ट करुनि पदोपदीं
किति जरी रुसलों दिवसांतुनी,
परि कुशींत तुझ्या शिरल्याविना
खचित झोंप निशीं मज येऊना !
अठुनि दूर जरी तुजपासुनी
कधि कुठे लपलों, तरि ये मनीं -
मम मटामट गोड मुके कधी
जननि ! घेशिल ? होऊ अधीर मी !

२३. ऑगष्ट १९१४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP