मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| भूपाळी ३ चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - भूपाळी ३ श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी भूपाळी ३ Translation - भाषांतर उठोनि ब्राम्हीं मुहूर्ती । चिंतन करावी गुरुमूर्ती ॥ भवपाशा होईल शांती । स्वानंदस्थिती निजबोधें ॥१॥सगुण निर्गुण ध्यान । एकाग्र करावें चिंतन ॥आत्माराम परिपूर्ण । सुख निधान स्वानंदें ॥२॥बरवीं पादतळीं लक्षुनी । ध्वज अंकुश वज्रादि चिन्हें ॥पद्म उर्ध्व रेखा चरणीं । चिदघनीं विराजित ॥३॥ऐसी पादपद्मा पासुनी । अययवमस्तक पर्यंत मनीं ॥ध्यावी गुरुमूर्ती अनुदिनीं । आनंदखनी शोभतसे ॥४॥वरदहस्त मस्तकीं धरुनी । कृपां आठवावी मनीं ॥उपाधी निरसुनी । ब्रम्हानंदीं सुख व्हावें ॥५॥पिंडा ब्रम्हांडाचा नाश । करुनि व्हावें पै निर्दोष ॥हेचि गुरुकृपा विशेष । श्रीगुरुभक्त शोभती ॥६॥गुरु नाम गुरु ध्यान । गुरु परब्रम्हा निधान ॥गुरू परिपूर्ण चिदघन । श्रीगुरु राम विराजित ॥७॥ऐशा निदिध्यासें करुनी । मनोनाश होय चिदघनीं ॥मग कृतकृत्य हौनी । साक्षात्कारीं असावें ॥८॥निर्गुण निर्विकार । अनिर्वाच्य सुखसार ॥जीवन्मुक्त पैलपार । श्रीगुरुभक्त शोभती ॥९॥स्वयें प्रसन्न श्रीगुरुराज । आनंदमूर्ती पादरज ॥रूळे अखंड सहज । कृतकृत्य पै झाले ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP