मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| पद १ चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - पद १ श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी आरती रामाची Translation - भाषांतर आरती रामाची (काशिराजकृत).द्युमणि - अन्वय - भूषण दूषण - हरा । ब्रम्हा विष्णू शंकर यांहूनी परा ॥काम निशाचर - मारण हरिहरां वरा । सर्वोत्तमा रामा रणरंगधीरा ॥जयदेव जयदेव जयरघुवंशाभरणा । अचिंत्या अरूपा न कळेसी मना ॥स्वयें सिद्ध येथें कैची भावना । आत्मरूपा रामा न कळेसी जना ॥ज० ज०॥१॥आरती करूं तव सर्वही आरतें । जड सर्वही रामा तुजवरी भासतें ॥सर्वाधिष्ठान तूं सर्वां परतें । ब्रम्हा स्वयं येती स्वयें भासतें ॥ज० ज०॥२॥ कल्पित आरति करी रघुवीरा आतां । आरति ओवाळूनी पाहीन परता ॥निरसूनी भवव्यथा सुखरूपत्वता । पावन गुरूकृपें रूप तुझें आतां ॥ज० ज०॥३॥पंचभूत देह तें पात्र करुनी । इंद्रियें हया वात्या वरि ठेवोनी ॥पंच विषय पांच वाती घालोनी । जाळिन रात्रीदीन तें तुज लागोनी ॥ज० ज०॥४॥भक्तिरसें भरलें मन माझें घृत । घालुनि पंच दिवे ओवाळूं म्हणत ॥ ज्योती नाहीं ज्यासी जडचि तें बहुत । तुज वेगळा प्रकाश नाहीं किंचीत ॥ज० ज०॥५॥सिद्ध स्वयं ज्योती तुझीच लावोनी । प्रकाशक दीप स्वयें हौनी ॥ओवाळीन रामा तुज लागोनी । तुझा तूची देवा तोष पाव मनीं ॥ज० ज०॥६॥ओवाळावयालागीं न दिसे कांहीं । एकरूप सर्वहि तूंचि एक पाही ॥कल्पित सर्वहि हें तुजवेगळें नाहीं । तूंचि सत्य रामा जग कांहीं नाहीं ॥ज० ज०॥७॥जाणुनि अर्थ पठण करी जो आरती । चित्तशद्धी पावे ब्रम्हा - संविती ॥जननी - दु:ख - जठर न पवे संसृती । स्वयें हौनी राम निरसूनी भ्रांति ॥ज० ज०॥८॥काशीरंगनार्थें उजळिली आरती । माया अंध:कार निरसूनी भ्रांती ॥रामरूप झाला स्वयें निश्चिती । विनवी संतां ऐशी करा हो आरती ॥ज० ज०॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP