मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| अध्याय सोळावा चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - अध्याय सोळावा श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी अध्याय सोळावा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: ॥ आनंदचरित महादाख्यान ॥ बापानंद आनंदघन ॥वक्तृत्ववृष्टी करून । नृसिंह - कर्णक्षेत्र निवविलें ॥१॥मागें निर्याण प्रकरण । संपलें श्रीदयेंकरून ॥पुढें सुरस अनुसंधान । कळसाध्याय कथिजेला ॥२॥श्रीचे शव - दहनस्थानीं । समाधि वृंदावन बांधोनी ॥पादुका - प्रतिष्ठापनालागोनी । आरंभ केला सुपुत्रें ॥३॥क्षेत्राक्षेत्रा लागून पत्रें । लिहोन धाडिलीं पवित्रें ॥श्रेष्ठ ब्राम्हाण सत्पात्र । आणावया लागोनी ॥४॥भिलवडी आणि नरसिंहपुर । सांगली आणि अष्टें नगर ॥कराड क्षेत्र आणि करवीर । क्षेत्रींचे विप्र आणविले ॥५॥निरंजनस्वामी कृपावंत । राहणार कर्हाड क्षेत्नांत ॥तेही विप्र - समुदाया समवेत । पातले पत्रावरूनी ॥६॥विप्रमंडळी सहवर्तमान । पोंचले जेथें वृंदावन ॥सहज स्वामी निरंजन । भाषण केलें संगियां ॥७॥आनंदमूर्तींनीं कधींही । आपुले आधीं आम्हांस पाहीं ॥नमस्कार करूं दिधला नाहीं । नमस्कारितों आज आम्हीं ॥८॥ऐसें बोलोन नमस्कार । घालणार तोंचि अगोदर ॥जड वृंदावन नमस्कार । करितें झालें निरंजना ॥९॥ऐसें गमलें सर्व त्रांस । इमारत पडते काय भूमीस ॥इतुकेमाजि जैसें तैसें । उभें राहिलें पूर्ववत ॥१०॥एकही चिरा न ढळतां । अवक्र वृंदावन उभें राहतां ॥आश्चर्योत्कर्ष सर्वां चित्तां । झाला तेव्हां अपार ॥११॥निरंजनस्वामी बोलले । वृंदावन श्रीमूर्तीं जाहले ॥आमुचे नमस्कारार्थ लवले । वृंदावनस्थ ते साधु ॥१२॥ब्रम्हावृंदासहवर्तमान । मंत्रोक्त केलें प्रतिष्ठापन ॥संतर्पण समीचीन । झालें सांगोपांग तें ॥१३॥सभावनादि सत्कार । करून घातले नमस्कार ॥बोळवण यथाप्रकार । सर्वत्रांची पैं केली ॥१४॥मग आपआपुले पैं स्थळा । गेला विप्र आणि सज्जनमेळा ॥सद्वंग - प्रेमा आगळा । चढाओढी चुणावे ॥१५॥ऐसें स्वामींचें निर्याण । कथिलें मुळापासोन ॥एतद्विषयीं आशंकोन । प्रश्न करील जरी कोणी ॥१६॥सांगलीहून शव आणिलें । स्वर्गस्थ दुंदुभी ते वेळे ॥वाजिन्नले ऐसें लिहिलें । डोल झाला वृंदावनीं ॥१७॥दुजे दिवशीं गीता - श्लोक । साधु - परित्राणार्थ एका ॥वृंदावनस्थ रघुनायक । बोलले वृंदावनीं तें ॥१८॥श्रीचें शरीर सर्वांसी । गोचर झालें तृतीय दिवशीं ॥प्रमाण इतुक्या गोष्टींसी । काय ऐसें म्हणाल ॥१९॥चिंतामणभट ज्योतिषी ।" कलेढोणचे मिराशी ॥होते निर्याण - समयासी । शिष्यवर्ग स्वामींचे ॥२०॥तेणें वाचोन स्वयें । आशंका सर्व निवटेल ॥२१॥कृष्णानंद आनंदघन । श्रींचे ज्येष्ठ नंदन ॥तेणें स्वांगें केलें कवन । श्रींचें निर्याण - प्रकरणीं ॥२२॥आरती लिहिली तेथें भावें । लेहून दर्शविलें सर्वें ॥तेंचि सज्जनीं वांचून पाहावें । तेणें शंशय निरसेल ॥२३॥वडिलां वडिलां मुखीं कथा । आली असे श्रोत्र - पथा ॥तेचि बखर मति यथा । लेहुनिया ठेविली ॥२४॥आनंदमूर्तींचीं चरित्रें । स्थळोस्थळीं केलीं चित्नें ॥श्रीसदगुरु - कृपामात्रें । तितुकीं कोणास विदित ? ॥२५॥श्रोत्रानेत्रा गोचर झालीं । परंपरेनें श्रवण केलीं ॥तेचि बखर असे लिहिली । ब्रम्हानाळीं सद्वंशीं ॥२६॥श्रीमूर्ती जीवें असते काळीं । बोलले एकदोन वेळीं ॥वृंदावना सन्मुख जवळीं । वृंदावन दुजें न करावें ॥२७॥पुढें अंतकाळ जाहला । सत्पुत्न - चित्तीं हेतू गमला ॥वृंदावन श्रीमूर्तीला । पादुकारूप स्थापावें ॥२८॥कृष्णानंदें श्रीस्त्रामींसी । विनवणी करून सायासी ॥आज्ञा घेवोन वृंदावनासी । काम लाविलें सत्पुत्रें ॥२९॥काष्ठ खडावा पायांत । घालीत होते श्रीरघुनाथ ॥यास्तव पुढें वंशांत । काष्ठ - खडावा घालूं नये ॥३०॥ऐसी आज्ञा श्रीआनंदें । केली असे प्रसिद्ध ॥तदनुसार वंशज बुद । खडावा कोणी न घालिती ॥३१॥असो ऐशी निर्मळ कथा । बापू दिनकर होऊनि वक्त ॥निरोपिली माणिक - सुता । नरसिंह भटाकारणें ॥३२॥विस्मयाविष्ट नरसिंह जोशी । विनंती केली बाप्पाजीसी ॥येवढी बखर आम्हांसी । लिहूनियां देइजे ॥३३॥मग बोलले दिनकर - तनय । मठामाजि बखर आहे ॥तिची प्रत लिहून स्वयें । पोंचवीन आपणांतें ॥३४॥त्यावर दिवस कितीएक गेले । तें तैसेंच राहिलें ॥बाप्पानंद समाप्त जाहले । स्वल्पकाळोंचि तेथोनी ॥३५॥नृसिंह जोशियाचा पौत्र । रघुनाथ नामक सुपात्र ॥उद्योग करोन स्वतंत्र । बखर आणिली निजांगें ॥३६॥प्रथम येवोनी तिशिंगीसी । भेटला गोपाळ - तनयासी ॥बखर दाविली तयासी । पहा म्हणोन सांगितलें ॥३७॥येरें बखर पाहोन । चित्तास झालें समाधान ॥ग्रंथ रचावा म्हणोन । हेतू अंतरीं उपजला ॥३८॥मग मंगळाचरणापासोन । परंपरे सहवर्तमान ॥रघुनाथाचें आगमन । भेटी आनंदमूर्तींची ॥३९॥तया पासोन निर्याण । पर्यंत केलें निरूपण ॥ग्रंथ जाहला येथोन । कळसाध्याय सोळावा ॥४०॥गोपाळात्मज कवि चकोर । इच्छीत श्रीगुरु - चरण - चंद्र ॥स्वामी माझे गुण - समुद्र । प्रेमभरतें भरविती ॥४१।मी संतांचा लडिवाळ । मतिमंद सर्वागळा ॥कृपावंत संत लळा । चालविती तो थोकडा ॥४२॥प्रथम अध्याय गहन । परंपरा कथिली जाण ॥तीर्थयात्रा रघुनंदन । केली हे कथा वर्णिली ॥४३॥भेट अप्पाजीपताची । आणि रघुनाथस्वामींची ॥होऊन गंगा सौरस्याची । भरोन गेली दोहों थडी ॥४४॥हाचि भाव प्रथमाचा । आतां द्वितीय अध्यायाचा ॥मुख्य पाया ग्रंथाचा । तोही निवडोन दावितों ॥४५॥श्रीआनंद - रघुनाथ - मिळणी । होऊनि वसगडया जावोनी ॥ब्रम्हाग्रहातें उद्धरोनी । वस्ती तेथेंच पै केली ॥४६॥आतां तृतीयाध्यायीं कथा । निरूपण झालें श्रीची सत्ता ॥वसगडे ग्रामीं असतां । नवल एक वर्तलें ॥४७॥श्रीरघुनाथ - आसनशिळा । तिजवर मारुती उमटला ॥श्रीराम कौतुक अवलीळा । दाखविते झाले जगातें ॥४८॥पुढें संकेश्वरालागी । तपास गेले रघुनाथ वेगीं ॥पत्ता न लागतां आनंदयोगी । आहाळोन झाले व्याकुळ ॥४९॥भेटी केली तेथेंचि गुरुवें । श्रीनें संवोखलें बरवें ॥आनंदमूर्ती ऐसें नांव । ठेवियेलें दयाळें ॥५०॥वंध्या स्त्रियेसी पुत्रदान । दीधलें श्रीरघुनंदनें ॥पुढें वसगडेस येऊन । पोंचले श्रीरघुनाथ ॥५१॥समाप्त जाहले वसगडे नगरीं । संस्कार केला कृष्य्णातीरीं ॥ब्रम्हानाळा शेजारीं । इतुका भाव तृतीयाचा ॥५२॥चतुर्थाध्यायीं वृंदावन । बांधोन केलें प्रतिष्ठापन ॥डोल होतां सर्वजन । विस्मयाविष्ट जाहले ॥५३॥प्रतिवर्षीं पुण्यतिथी - नेम । पुढें जयराम - समागम ॥वड्गांवीं पुरुषोत्तम । नवल चरित्र दाविती ॥५४॥चर्मुपान पुस्तक । करोनी जनां दाविलें देख ॥इतुका भाग करोनी लेख । चतुर्थाध्याय संपविला ॥५५॥पंचमाध्यायीं निरूपण । कृष्णातीरीं ब्राम्हाण ॥राहिला उटज करून । साक्षात्कार दाविला तया ॥५६॥मृदंग आणिला पन्हाळ्याहून । भिवा गुरवासी अधिकारी करून ॥सांगलींत उत्सव कीर्तन । होतां यवना जाणवलें ॥५७॥मिरज किल्लेंत नेऊन । कैद केलें श्रीगुरूलागून ॥तयातें श्रीरघुनंदन । ठकवोन श्रीमूर्ती सोडविली ॥५८॥सहावे अध्यायीं दिलेलखान । मिरजेस श्रीमूर्ती नेऊन ॥केलें कापटय विंदान । भ्रष्ट करावें या हेतू ॥५९॥त्यास दाविला चमत्कार । मिळालें इनाम अग्रहार ॥महारुद्रपंत बहेकर । सनाथ केलें मग त्यांतें ॥६०॥सप्तमीं चोरांसी दर्शन । दिधलें धनुर्धररूपानें ॥द्रव्य आणिलें पन्हाळेहून । ऋणमुक्त जाले श्रीमूर्तीं ॥६१॥आठव्यांत कथिली महायात्रा । सौख्य दिधलें सावकारा ॥समंध नेला गंगातीरा । उद्धार केला तयाचा ॥६२॥नवमांत नागठाणेंत । चमत्कार दाविला ब्राम्हाणीतें ॥शहर हैदरावादेंत । केशवस्वामीस भेटले ॥६३॥दशमाध्यायीं कथा गहन । मिरजेस नेले दिलेलखानें ॥चमत्कार त्या दाऊन । मिजजेस राममठ स्थापिला ॥६४॥रंगनाथ गोपाळस्वामीस । आधीं नमस्कारासरिसे ॥वाफ्यांत पडोनि साधूंस । चमत्कार कांहीं दाविला ॥६५॥अकराव्यांत सुरस कथा । मृताश्च जीववोन रंगनाथा ॥संतोष देवोन सर्व संतां । गौरविलें बहुसाल ॥६६॥भागानगरींत म्हातारी । केशवस्वामीस आपुले घरीं ॥भोजना नेलें ते अवसरीं । विपरीत केलें कौतुक ॥६७॥बाराव्यांत श्रीरंग । गोपाळस्वामीचिया संगें ॥सडे सांगलींत जळमार्गें । भिलवडी पासोन रात्री आले ॥६८॥प्रतिनिधीचें प्रकरण । अध्याय बाराव्यांत जाण ॥यवन सरदार लुटोन । आले परत ब्रम्हानाळा ॥६९॥तेराव्यांत रघुनंदन । पंतासी दिधलें दर्शन ॥सनद दिधली करोन । ब्रम्हानाळ ग्रामाची ॥७०॥चौदाव्यांत अपंक्त विप्र । उद्धरोन केला पवित्र ॥विप्र मंडळींस चमत्कार । पाप पुरुष दाविला ॥७१॥पंधरा सोळांत निर्याण । कथन केलें ग्रंथ पूर्ण ॥झाला श्रीरघुनाथार्पण । कायावाचामनेंसी ॥७२॥सोळा अध्याय ग्रंथ । कीं षोडशोपचारसहित ॥पूजोनिया रघुनाथ । कृतकृत्य मी झालों ॥७३॥कीं ग्रंथरूप पौर्णिमा । षोडश कळेचा चंद्रमा ॥उदय पावोन रघूत्तमा । आल्हाद देऊं इच्छित ॥७४॥श्रीप्रसादें हा ग्रंथ । पठण करी जो नित्य नित्य ॥निर्व्यलीक होऊनि चित्त । येणें श्रीमूर्ती संतोषे ॥७५॥संतति आणि संपत्ती । प्रवृद्ध त्याचिये गृहीं होती ॥शेवटीं ब्रम्हा - पदवी - प्राप्ती । होईल श्रीचे कृपेनें ॥७६॥ऐसा मूळ बखरींत । लिहून ठेविला इत्यर्थ ॥सद्वंशाचा वचनार्थ । अन्यथा होऊं केवी शके ॥७७॥मुख्य पाहिजे विश्वास । कामा नये अविश्वास ॥महाराज विश्वासी नरास । कृपा करिती निश्चयें ॥७८॥गोपाळात्मज हो पोसणा । श्रीसंतवळाडी जाणा ॥गंगाराम श्रीगुरुराणा । कृपा करिती सुदिन तो ॥७९॥इतिश्री चरितामृत ग्रंथ । सोळा अध्याय पूर्ण येथ ॥कृपावंत तुम्ही संत । मना आणोन पहावा ॥८०॥शके सतराशें एकाहत्तरीं । सौम्यनाम संवत्सरीं ॥शुक्ल पंचमी इंदुवारीं । आषाढांत ग्रंथ संपविला ॥८१॥॥ इति श्रीआनंदचरितामृतं संपूर्णमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP