मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक १०१ ते १०६ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १०१ ते १०६ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक १०१ ते १०६ Translation - भाषांतर अवज्ञातं सदद्वैतं नि:शंकैरन्यवादिभि: ॥एवं का क्षतिरस्माकं तद्द्वैतमवजानताम् ॥१०१॥वेद युक्ति विचार प्रमाणें ॥ जें सिद्ध जाहलें तें न मानणें ॥ तया मूर्खाशीं वाद करणें ॥ नको आतां ॥४५७॥तयांच्या त्या द्वैतपर मती ॥ उपेक्षण्या काय आहे आम्हां क्षिती ॥ते जैसे कां आम्हा, मानिती ॥ तैसेची आम्हीं तयां ॥४५८॥तयांचें तें द्वैत ॥ असो चिरायु स्थापित ॥ तेणें कांहींच बाध न येत ॥ अद्वैत सिद्धांती ॥४५९॥द्वैतावज्ञा सुस्थिता चेदद्वैते धी: स्थीरा भवेत् ॥स्थैर्ये तस्या: पुमानेष जीवन्मुक्त इतीर्यते ॥१०२॥वादी द्वैतवादी अद्वैत अनादरती ॥ अद्वैत वादी द्वैता उपेक्षती ॥येणें काय फल प्राप्ती ॥ उभयतां असे ॥४६०॥सि० - अद्वैत सिद्धांत उपेक्षितां ॥ जन्ममरणाच्या भोगाव्या व्यथा ॥देहीं कधीं ही सुखाची वार्ता ॥ नायकावी ॥४६१॥तैसें नाहीं द्वैत उपेक्षितां ॥ अद्वैतीं मती होय स्थिरता ॥यांच देहीं लाभें जीवन्मुक्तता ॥ जन्ममृत्यु चुके ॥४६२॥हें आमुचेंचि नोहे मत ॥ ऐसा बोलिला भगवंत ॥द्वितीयाध्यायीं अर्जुनाप्रत ॥ गीते माजीं ॥४६३॥एषा ब्राम्ही स्थिति: पार्थ नैनां प्राप्य विमुहयति ॥स्थित्वाऽस्यामंतकालेऽपि ब्रम्हा निर्वाणमृच्छति ॥१०३॥अर्जुना ऐशा हया ब्रम्हास्थिती ॥ जयाची बुद्धि होय स्थिर निश्चिती ॥तया व्यामोहादि न बाधिती ॥ कवणे ही काळीं ॥४६४॥तो देहीं असतां जिवन्मुक्ति ॥ अंतीं ब्रम्हापदाची होय प्राप्ति ॥ जन्ममरणाचें पुनरावृत्ति ॥ कधीं ही नये ॥४६५॥ऐसें बोलियले भगवान ॥ हें काय फळ होय सान ॥ म्हणोनि द्वैत बुद्धि उपेक्षून ॥ अद्वैतीं स्थिरावी ॥४६६॥सदद्वैतेऽनृतद्वैते यदन्योन्यैक्यवीक्षणम् ॥तस्यांतकालस्तद्भेदबुद्धिरेव न चेतर: ॥१०४॥यद्वांऽतकाल: प्राणस्य वियोगोऽस्तु प्रसिद्धित: ॥तस्मिन् कालेऽपि न भ्रांतैर्गताया: पुनरागम: ॥१०५॥नीरोग उपविष्टो वा रुग्णोवा विलुठन् भुवि ॥मूर्च्छितो वा त्यजत्वेष प्राणान् भ्रांतिर्न सर्वथा ॥१०६॥सत् अद्वैत असत् द्वैत ॥ हया दोहींचें मिश्रण झालें जगांत ॥तेणें प्राणी झालें भ्रांत ॥ सतासतीं ॥४६७॥वास्तवीक मिश्रण नाहीं झालें ॥ परि तें बुद्धिमोहें घेतलें ॥तें या विवेकें दूर जाहलें ॥ भूतपंचकाच्या ॥४६८॥मोहबुद्धिचा अंत झाला ॥ तोचि अंतकाल म्हणियला ॥तईंच ब्रम्हाप्राप्ति जिवाला ॥ होत असे ॥४६९॥अथवा अंतकाळ शब्दानें ॥ प्राण वियोग जरी समजणें ॥तरी ही उठलें भ्रमाचें ठाणें ॥ नये परतोनी ॥४७०॥जया अद्वैत सिद्धांत ठसला ॥ तो प्राणी तेव्हांचि मुक्त झाला ॥तया या मायामोहाचा घोंटाळा ॥ कधींही न बावे ॥४७१॥तो रोगी असो का निरोगी ॥ भोगी असो का अत्यंत त्यागी ॥तयासी कोण्याही प्रसंगीं ॥ भ्रम न शिवे ॥४७२॥तो बसला असो कां निजला ॥ नाना व्यथें लोळत पडला ॥कां प्राणोत्क्रमणीं मूर्छित झाला ॥ तरी ही मुक्त ॥४७३॥हा ! हा ! धन्य तयाचें निधन ॥ विस्मृतींत ही ब्रम्हापरिपूर्ण ॥ तया अंतकाळींची व्यथा दारुण ॥ कैची बाधे ॥४७४॥अरे जयाची नामें स्मरतां ॥ न बाधे भवभय व्यथा ॥तया मुक्ताची अवस्था ॥ कोण वर्णी ॥४७५॥जयाचें निखळ ज्ञान ॥ सदां अखंड समाधान ॥देखोनी भयें घेतलें रान ॥ मोहादिकीं ॥४७६॥तीं परतोनी कधीच न येती ॥ काय तम करी सूर्यागृहीं वस्ती ॥नाना पूर्ण प्रबोधीं स्वप्न भ्रांति ॥ माळ घाली ? ॥४७७॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP