मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ६० ते ६२ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६० ते ६२ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ६० ते ६२ Translation - भाषांतर आद्यो विकार आकाश: सोऽवकाश: स्वरूपवान् ॥आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेप्युनुगच्छति ॥६०॥निर्विकारी झाला विकार ॥ तोही झाला निराकार ॥पोकळपणाचा आकार ॥ अवकाश घनी ॥२७४॥हीच मूळ कल्पना ॥ आकाशाची झाली भावना ॥सत्ता विशेष गुणा ॥ उद्भवली ॥२७५॥येर्हवीं पहातां आकाश ॥ स्वरूपाकारच वाटे भास ॥ परि गुणा झाला अवकास ॥ पोकळ पणें ॥२७६॥एकस्वभावं सत्तत्त्वमाकाशो द्विस्वभावक: ॥नावकाश: सति योम्नि स चेषोऽपिद्वयं स्थितम् ॥६१॥सद्वस्तुच्या ठाईं ॥ अवकांश मुळींच नाहीं ॥ तें सदस्वभावें असे पाही ॥ एकलें एक ॥२७७॥परि आकाशीं द्वय स्वभाव ॥ सत्ताविशेष अवकाश ठाव ॥मायादेवीचा प्रभाव ॥ येथून वाढला ॥२७८॥यद्वा प्रतिध्वनिर्व्योम्नो गुणौ नासौ सतीक्ष्यते ॥व्योम्नि द्वौ सध्द्वनी तेन सदेकं द्विगुणं वियत् ॥६२॥सद्वस्तुचे ठाईं ॥ “सत्” हाही शद्ब नाहीं ॥ अवकाश होतांचि आला पाही ॥ प्रतिध्वनी ॥२७९॥सतला सत् कोणी म्हणावें ॥ तें असें एकलें स्वभावें ॥अवकाश होतांची संभवें ॥ सत् शद्ब ॥२८०॥म्हणोनी द्विगूण आकाश झालें ॥ तेणेंचि सद्वस्तु एक गुणी म्हटलें ॥येर्हवीं गुणातीत वस्तु संचलें ॥ जैशाचें तैसें ॥२८१॥वांझेला मुलगा नाहीं झाला ॥ परि झाला ऐसाचि कल्पिला ॥मग सुखें ऐका बाललीला ॥ एकेक त्याच्या ॥२८२॥तैसाचि हा माया विलासु ॥ सुखें ऐका सावकाशु ॥श्रुत्यादिकांना अवकाशु ॥ बरा फावला ॥२८३॥श्रुति प्रमाणा आल्या ॥ स्मृत्यादिकीं. बाहया उभारल्या ॥मायादेवी शृंगारल्या ॥ पुत्रोत्साहें ॥२८४॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP