महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६६

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


एवं श्रुतिविचारात्प्रग्यथा यद्वस्तु भासते ॥
विचारेण विपर्योति ततस्तच्चिंत्यतां वियत् ॥६६॥

श्रुतिविचाराचे पूर्वीं ॥ आकाशचि सदत्वें दावी ॥
जग सत्यत्वा आणवी ॥ मायादेवी ॥३०३॥
सुखदु:खाचे सांगडी ॥ पापपुण्याची पुरवडी ॥
स्वर्गनरकादी उतरडी ॥ रची मोडी ॥३०४॥
नवल इयेचें लाघव ॥ अभावी दाखविला भात्र ॥
भावेचि झाली देवी देव सुवधात्रो ॥३०५॥
इंद्रभुवन निर्मियेलें ॥ आमृत तेथ एक कल्पियले ॥
रंभा उर्वशादि रचियेले ॥ रूपाचे सांगाडे ॥३०६॥
बंधमोक्षाच्या दावणो ॥ बांधिलीं जनावरें नाना योनी ॥
तेथ अज्ञ सुज्ञ दोनी ॥ एकेचि पाती ॥३०७॥
पायीं घालुनी शृंखला ॥ मुक्तपणाचा नांच मांडिला ॥
आपणचि देखे आपुली लीला ॥ नानाविव ॥३०८॥
क्वचित् एखादा जीव ॥ एथून सुटकेचा करी उपाव ॥
तया पुढें सिद्धिची माव ॥ नांचवू लागे ॥३०९॥
सुखाचे घेउनि दोरखंड ॥ बांधुनी टाकी दोनी दंड ॥
कोणाही जिवाचे बंड ॥ इये पुढें न चाले ॥३१०॥
हा हा इये पासोनी जो सोडवी ॥ तयाची किती वर्णावी थोरवी ॥
धन्य धन्य हेचि वदवी ॥ वाचा आमुची ॥३११॥
अम्हा मूढा साठीं ॥ बोंब मारीत हटोहटी ॥
आक्रोशें धांवे उठाउठी ॥ कळवोनी ॥३१२॥
तया श्रुति परोती ॥ माउली नाहीं नाहीं त्रिजगती ॥
अहिता पासुनी सोडविती ॥ जिवा लागीं ॥३१३॥
आम्हीं कैसे बैसावें ॥ कोण उठणी उठावें ॥
कैसें जेवावें निजावें ॥ हें ही बोलली ॥३१४॥
आम्हीं होऊनी नि:संग ॥ करूं लागलों नाना संग ॥
तेथ ही प्रतिपादित सांग ॥ हिताहित ॥३१५॥
आमुचीये मळमूत्री ॥ विसर्जनी अहोरात्री ॥
गाथा गाईली पवित्री ॥ त्याज्यात्याज ॥३१६॥
आम्हीं कैसें बोलावें ॥ कोण कर्म अचरावें ॥
कोण्या रस्त्यानें जावें ॥ आपुलीया ठाईं ॥३१७॥
कैसा करावा भोग ॥ कैसा करावा त्याग ॥
विधीनिषधीं सांग ॥ प्रतिपादिलें ॥३१८॥
कर्म करुनी अकर्ता ॥ भोग भोगोनी अभोक्ता ॥
बोल बोलोनी अवक्ता ॥ कैसें व्हावें ॥३१९॥
जीव म्हणजे काय ॥ शीव म्हणजे काय ॥
आत्मा म्हणजे काय ॥ हें ही प्रतिपादिलें ॥३२०॥
आम्हीं पाऊल टाकावें ॥ तेथ ही हा दिवटा धांवे ॥
कां कीं आम्हीं न पडावें ॥ गर्ते माजी ॥३२१॥
वैराग्य कैसें करावें ॥ विचार कैसे विवरावे ॥
ज्ञान कैसेनीं ठसावें ॥ आमुचें आम्हां ॥३२२॥
संसार म्हणजे मृगजळ ॥ हें ही बोलियेलें प्रांजळ ॥
आमुचें सत्य हित निवळ ॥ उघड दावियेलें ॥३२३॥
आमुचे अनिवार छंद ॥ माया मोहें झालों धुंद ॥
तेही युक्तीप्रयुक्तीं केले बंद ॥ कृपाळुपणें ॥३२४॥
आतां किती इयेशी वर्णावें ॥ सकळ इयेनींच आम्हां दावावें ॥
अद्वैत साम्राजीं बैसवावें ॥ इनेची आम्हां ॥३२५॥
धन्य धन्य श्रुतिमाता ॥ जिचा बोधकर्णपुटीं ऐकता ॥
भवभय माया वार्ता ॥ वाव झाली ॥३२६॥
ऐसा जियेचा विचारू ॥ तयावरी बोधी श्रीसद्नरु ॥
धन्य धन्य अपरंपारु ॥ उपकार तयाचे ॥३२७॥
आम्हीं हेंद्रे जन प्राकृत ॥ नाहीं भाषा ही पुरी संस्कृत ॥
परि केलें कृत कृत्य ॥ ईक्षण मात्रें ॥३२८॥
श्रुतीजलधींतुनी बहु यत्नें ॥ शोधुनी काढिलीं अमोघ रत्नें ॥
आम्हा आर्पियलीं प्रयत्नें ॥ नको नको म्हणतां ॥३२९॥
उपनिषद सिद्धांत ॥ दाखविले यथार्थ ॥
आम्हां बनविलें समर्थ ॥ काळाचे ही काळ ॥३३०॥
आम्ही मूर्खपणें भांडावें ॥ तरी हंसुनी युक्तीनेंचि बोधावें ॥
किती म्हणोनी वर्णावें ॥ वात्सल्य तयांचें ॥३३१॥
जयासी सानुकुळ श्रीगुरु ॥ तोचि धन्य धन्य जगती नरु ॥
तेणें सकळ हा माया कुंजरू ॥ पायीं रगडिला ॥३३२॥
श्रीगुरुचीनी प्रसादें ॥ काय एक न सादे ॥
द्वैत साकार द्वंदें ॥ लया जाती ॥३३३॥
जयाचेनी कृपाउजिवडे ॥ महेंद्र पदही पावती वेडे ॥
वेदघोषही बोलती रेडे ॥ अचुक पणीं ॥३३४॥
धन्य धन्य गुरुमाउली ॥ श्रुती प्रत्यक्षचि उभी राहिली ॥
आम्हांस करावया सावली ॥ कृपाळुपणें ॥३३५॥
आम्हांसी घेऊनी खांदीं ॥ बसविती साम्राजपदीं ॥
डंका ठोकोनी देती पदीं ॥ ब्रम्हाचि ब्रम्हा झालें ॥३३६॥
गुरु शिष्याच्या भावा ॥ उरोंच न देती ठावा ॥
दीपकें वातीचा दिवा ॥ स्पर्शतांचि जैसा ॥३३७॥
गुरु शास्त्र आणि आपण ॥ एकचि रूपें झाली गोठण ॥
ब्रम्हानंद परिपूर्ण ॥ दुमदुमिला ॥३३८॥
आतां वर्णना पुरे करी ॥ श्लोकपद राहिलें दुरी ॥
ऐसें बोलियलें अंतरीं ॥ श्रीगुरु माझे ॥३३९॥
ऐकोनी तयांचें वचन ॥ आलें गेलेलें भान ॥
“ऐशिया श्रुतिविचारेण” ॥ मुनी जे का बोलिले ॥३४०॥
विचारेण या पदावरी ॥ व्याख्या झाली येथवरी ॥
श्रोतें कोपावें ना चतुरीं ॥ बोबडया बोला ॥३४१॥
आणि कोप तरी कुणावरी करती ॥ तेचि अंतरांतुनी प्रतिपादती ॥
मला एक बाहुलें निश्चिती ॥ पुढें केलें ॥३४२॥
असो ऐशिया विचारें स्पर्शला ॥ तयानेच मायाकलाप आकर्षिला ॥
सद्रूप ब्रम्हाचि झाला ॥ देखदेखतां ॥३४३॥
आणि इतरही याच रीती ॥ गगनादि भाव सोडिती ॥
वस्तु सद्रूप चिंतिती ॥ निरंतर ॥३४४॥
तेही ब्रम्हाचि होती ॥ नाना विपरीत भाव त्यागिती ॥
श्रुतिविचारें लाभतीं ॥ आपआपणा ॥३४५॥
श्रुति गुरुवरी नाहीं विश्वास ॥ तया येथचि नरक वास ॥
कोण वर्णी आपदांस ॥ तयांच्या त्या ॥३४६॥
म्हणोनिया निरंतर ॥ ब्रम्हाविचारेंच भरावें अंतर ॥
शास्त्र गुरुवरी विश्वास थोर ॥ असों द्यावा ॥३४७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP