मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक २५ ते २७ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक २५ ते २७ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक २५ ते २७ Translation - भाषांतर विजातीयमसत्तत्त न खल्वस्तीति गम्यते ॥नास्यात: प्रतियोगित्वं विजातीयाद्भिदा कुत: ॥२५॥आतां विजातीय भेद असत ॥ तो मुळींच सिद्ध नाहीं होत ॥असत शब्देंचि प्रतिपादित ॥ नाहीं ऐसें ॥९६॥मुळींच जें झालें नाहीं ॥ तें प्रतियोगी होईल कैसें पाहीं ॥ तात्पर्य एकही भेद नाही ॥ वस्तुठाई ॥९७॥स्वगत सजातीय विजातीय ॥ भेदरहित वस्तु होय ॥म्हणोनी “एकमेवाद्वितीय” ॥ श्रुति बोलिली ॥९८॥एकमेबाद्वितीयं सत्सिद्धमत्र तु केचन ॥विव्हला असदेबेदं पुरासीदित्यवर्णयन् ॥२६॥एवं ऐसें झालें सिद्ध ॥ वस्तु सदा सर्वदा अभेद ॥परि मूर्ख तेथेंही विरुद्ध ॥ असतवाद करिती ॥९९॥तयाचीया रीती ॥ दाउं तुजला पुढती ॥“असदेवेदंपुरासीत्” इति ॥ विव्हालादि बोलती ॥१००॥मग्नस्याब्धो यथाऽक्षाणि विव्हलानि तथास्य धी: ॥अखण्डैकरसं श्रुत्वा नि:प्रचारा बिभेत्यत: ॥२७॥मदिरापानें झाला उन्मत्त ॥ तो काय एक न बोलत ॥तैसेंचि हें प्रतिपादित ॥ असत्य वादी ॥१०१॥नाना डोळियां झाली कावळी ॥ मग तो कोणती वस्तु न म्हणे पिंवळी ॥जें जें दिसे तया जवळी ॥ तें तें पीतची भासे ॥१०२॥किंवा क्षारसमुद्रीं बुडाला ॥ मग जैसे धुरकट देखे वस्तूला ॥तैसेचि या तया विव्हला ॥ बुद्धि झाली ॥१०३॥एवं असत पूर्वीं होतें ॥ हें म्हणणें दिसे अरुतें ॥आपणचि आपुल्या व्याघातें ॥ जिवें कैसा ॥१०४॥वांझेचिया मुला ॥ कोण मातेचा सोहळा ॥ नाकोणडोंगरी मृगजला ॥ उगम झाला ॥१०५॥विषेन कैसें जियावें ॥ असतचि कैसे हुवावें ॥प्रेतें कैसें वदावें ॥ स्व मृत्युतें ॥१०६॥अखंडैकरस वस्तु ॥ तेथें कैच्या इया मातु ॥ऐकोनीया श्रुति सिद्धांतु ॥ भयें लपाली ॥१०७॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP