मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक २८ ते २९ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक २८ ते २९ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक २८ ते २९ Translation - भाषांतर मग्नस्याब्धो यथाऽक्षाणि विव्हलानि तथास्य धी: ॥अखण्डैकरसं श्रुत्वा नि:प्रचारा बिभेत्यत: ॥२७॥मदिरापानें झाला उन्मत्त ॥ तो काय एक न बोलत ॥तैसेंचि हें प्रतिपादित ॥ असत्य वादी ॥१०१॥नाना डोळियां झाली कावळी ॥ मग तो कोणती वस्तु न म्हणे पिंवळी ॥जें जें दिसे तया जवळी ॥ तें तें पीतची भासे ॥१०२॥किंवा क्षारसमुद्रीं बुडाला ॥ मग जैसे धुरकट देखे वस्तूला ॥तैसेचि या तया विव्हला ॥ बुद्धि झाली ॥१०३॥एवं असत पूर्वीं होतें ॥ हें म्हणणें दिसे अरुतें ॥आपणचि आपुल्या व्याघातें ॥ जिवें कैसा ॥१०४॥वांझेचिया मुला ॥ कोण मातेचा सोहळा ॥ नाकोणडोंगरी मृगजला ॥ उगम झाला ॥१०५॥विषेन कैसें जियावें ॥ असतचि कैसे हुवावें ॥प्रेतें कैसें वदावें ॥ स्व मृत्युतें ॥१०६॥अखंडैकरस वस्तु ॥ तेथें कैच्या इया मातु ॥ऐकोनीया श्रुति सिद्धांतु ॥ भयें लपाली ॥१०७॥गौडाचार्या निर्विकल्पे समाधावन्ययोगिनाम् ॥साकारब्रम्हानिष्ठानामत्यंतं भयमूचिरे ॥२८॥अस्पर्शयोगो नामैष दुर्दर्श: सर्वयोगिमि: ॥योगिनो बिभ्यति हयस्मादभये भयदर्शिन: ॥२९॥साकार ब्रम्हानिष्ट योगी ॥ किती दुर्दशा पावती आंगीं ॥गौडाचार्य तया लागीं ॥ बाल म्हणती ॥१०८॥जैसे बालें भिती बागुलाला ॥ तैसेचि हे योगी “अस्पर्श” योगाला ॥अभये भय दर्शनाला ॥ प्रतिपादिती ॥१०९॥साकार ध्यान निष्टा ॥ करुनि मिरविती प्रतिष्ठा ॥म्हणती निर्विकल्पाचिया वाटा ॥ कष्टमयी ॥११०॥कल्पियेलें ध्यान ॥ दिसे तोंवरी समाधान ॥ नाहीं तरी रुदन ॥ करिताती ॥१११॥अखंड स्वात्माराम ॥ तेथें न करिती आराम ॥ सुगमचि मानिती दुर्गम ॥ भयप्रद ॥११२॥शं० - योगिया भय कां वाटावे ॥ प्राणायामादि साधिती आघवे ॥अस्पर्शयोगातें भियावे ॥ कवणे रीती ॥११३॥स० वृत्तीचा आधार तुटतां ॥ वाटे येईल मृत्यु अवस्था ॥आपण नाहींसे हौं हें भय चित्ता ॥ निरंतर वाटे ॥११४॥सदवस्तु असत कल्पिती ॥ येणें भांबावलेनी चित्तीं ॥अभये भयचि मानिती ॥ मूर्ख पणें ॥११५॥आपण दुसरें कल्पावें ॥ मग योगें तेंचि आपण व्हावें ॥यया परीस आपण आपुले स्वभावें ॥ कां न मुरावें ॥११६॥आपणचि आपण होतां ॥ अस्पर्श योग साधे आयिता ॥ परि या गुरुगम्य वार्ता ॥ येरा कानडया ॥११७॥अमृतसागरीं बुडतां ॥ वाटे मृत्युचें भय चित्ता ॥ऐशा हया योगियांच्या वार्ता ॥ एकरसीं आटणी ॥वसे तेथें स्पर्शालागोनी ॥ प्रधानत्व ॥११९॥तुम्ही अस्पर्श आणि योग म्हणतां ॥ हें विपरीत वाटे आमुचे चित्ता ॥ ब्रम्हाचारी स्वपुत्र वार्ता ॥ कैसी मानी ॥१२०॥स० कर्ष स्पर्श संयोग आणि योग ॥ ऐसे चार असती योग विभाग ॥तयांचें ही यथासांग ॥ वर्णना करूं ॥१२१॥वस्तु वस्तुशीं आकर्विती ॥ तया गुरुत्वाकर्षण म्हणती ॥ही योगाची प्रथम जाती ॥ कर्षयोग ॥१२२॥तेथें सजात न विजात ॥ एकमेकाशीं आकर्षित ॥ परि मिळणी नाहीं होत ॥ एकरसीं ॥१२३॥काळें एकमेक भिडती ॥ तया स्पर्शयोग म्हणती ॥इयाची ही होय स्थिती ॥ प्रथमा सारखी ॥१२४॥आतां तिसरा जो संयोग ॥ तो सजाती विण न होय सांग ॥विजातीयाशीं प्रसंग ॥ कधींच न करी ॥१२५॥परि इयांचें मिश्रण ॥ ओळखताती सुजाण ॥ कांकीं एकरसी आटण ॥ नव्हे म्हणोनी ॥१२६॥जैसें दुग्धीं पाणी मिसळलें ॥ संयोगीं एकत्वची दिसलें ॥परि राजहंस चोंचीं निवडलें ॥ पाणी तें पाणी ॥१२७॥आतां ऐक बापा योग ॥ जो सकळ धुरीची सीग ॥योगीये टाकिती आंग ॥ जया ठायीं ॥१२८॥तो मिळणी एकवटला ॥ पुनरपि न निवडे कोणाला ॥ परि द्वैतपणास जागा दिला ॥ एकरसीं ॥१२९॥तैसा नव्हे अस्पर्श योगु ॥ ज्याचा मुळींच नाहीं वियोगु ॥प्रतिबिंब बिंबातें आंगु ॥ स्पर्शिलें जैसें ॥१३०॥नाना रज्जुसर्पाभासु ॥ ज्ञान होतांचि होतसे नासु ॥मग मिळणी तियेचा स्पर्शु ॥ तिये जैसा ॥१३१॥कां भ्रमें कोणी विसरला ॥ हा मी नोहेचि म्हणे आपुल्याला ॥भ्रमनिरसतांचि योग झाला ॥ त्याचा त्याला ॥१३२॥नाना स्वप्नीं आपण मेला ॥ बहु लाक्रोशें रडुं लागला ॥प्रबोध होतांचि लाधला ॥ आपआपणा ॥१३३॥किंवा स्वप्नीं भद्रजाति ॥ भिक्षा मागतां जाजावला बहुति ॥जागा होतांचि मिळाला निश्चिती ॥ राजवैभवा ॥१३४॥हें जैसें का मिळणें ॥ किंवा झालीं स्पर्शलक्षणें ॥तैसिये ठाईं असणें ॥ अस्पर्श योगू ॥१३५॥आपणासी आपण मिळणें ॥ हींच अस्पर्शयोगाचीं लक्षणें ॥सिद्धचि कृतक नव्हती जाणे ॥ इतरां परी ॥१३६॥ऐसा सोडूनी राजपथ ॥ भ्रमिष्ट होती भयाभीत ॥तयांसी श्रीगुरु दूषित ॥ आचार्यही ॥१३७॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP