मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक १ ते ५ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १ ते ५ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर सदद्वैतं श्रुतं यत्तत्पंचभूतविवेकत: ॥बोद्धुं शक्यं ततो भूतपंचकं प्रविविच्यते ॥१॥सकल ही सृष्टीनिर्माण ॥ झाली सताद्वैतवस्तु पासून ॥ ऐशी बोलली श्रुती प्रमाण ॥ “सदेव” इत्यादिना ॥९॥तें अद्वैत ब्रम्हा कैसेनी बोलावें ॥ जेथ वाचा मन परतलीं स्वभावें ॥कार्या वरुनी अनुभवावें ॥ पंच भूतांच्या ॥१०॥म्हणोनी पंचभूतविवेक ॥ करूं आताम सम्यक ॥जेणें होईल हरिख ॥ श्रोतृजना ॥११॥शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधो भूतगुणा इमे ॥एकद्वित्रिचतु: पंचगुणा व्योमादिषु क्रमात् ॥२॥आकाशाचा शब्दगुण ॥ तेथून वायु झाला उत्पन्न ॥त्याला आले दोन गुण ॥ शब्द स्पर्श ॥१२॥वायुपासून वन्ही झाला ॥ तो धरी तीन गुणांला ॥ शब्दस्पर्श आणि रूपाला ॥ प्रकाशत्वें ॥१३॥अग्री पासूनी झाला रस ॥ तो धरी चौगुणास ॥ शब्दस्पर्श रूपरस ॥ पातळपणें ॥१४॥तेथून झाली भूमी ॥ ती पांच गुणातें आक्रमी ॥शब्द स्पर्श रूप नामीं ॥ रस गंध ॥१५॥प्रतिध्वनिर्वियच्छब्दो वायोर्बीसीति शब्दनम् ॥अनुष्णाशीतसंस्पर्शो वन्हौ भुगुभुगुध्वनि: ॥३॥उष्ण: स्पर्श: प्रभा रूपं जले बुलुबुलुध्वनि: ॥शीत स्पर्श शुक्लरूपं रसो माधुर्यमीरितम् ॥४॥भूमौ कडकडाशब्द: काठिण्यं स्पर्श इष्यते ॥नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रस: ॥५॥सुरमीतरगंधौ द्वौ गुणा: सम्यक विवेचिता: ॥प्रतिध्वनि उमटतो ॥ तोच आकाशीं शब्द होतो ॥हाचि एक गुण राहतो ॥ आकाशतत्वीं ॥१६॥वायूचा शब्द वीसीत ॥ थंडगार स्पर्श होत ॥हे दोन गुण राहत ॥ जये ठायीं ॥१७॥अग्रीचा भुगुभुगुध्वनि ॥ उष्णस्पर्श रूप प्रकाशनीं ॥ऐसें राहती गुण तीनी ॥ एके ठायीं ॥१८॥जळीं बुलबुल शब्द होतां ॥ शीतस्पर्श शुक्ल रूपता ॥रसीं वसे माधुर्यता ॥ चारी गुणें ॥१९॥भूमीं कडकड शब्द होत ॥ कठीण स्पर्श लागत ॥ नीलादि चित्ररूप दिसत ॥ मधुर आम्लादि रस ॥२०॥गंधही नानागुण ॥ भूमीमध्यें असतीजाण ॥ एवं हीं पांचही लक्षण ॥ पृथ्वीठायीं ॥२१॥ऐशीं हीं पंचभूतें ॥ धरितीं झालीं नानागुणातें ॥तयांचें कार्य इंद्रियें त्यांतें ॥ पुढेंकरुनी बोलती ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP