मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| उपदेश संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - उपदेश श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा उपदेश Translation - भाषांतर १४०) अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥१४१) असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥सुख दु:ख दोन्ही वाहूं नको ओझें । मी आणि माझें परतें सारीं ॥३॥चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा । जिहीं या खुणा अनुभविल्या ॥४॥१४२) असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥३॥चोखा म्हणे सुख आपेआप घरा । नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥१४३) आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥१४५) आला नरदेहीं पाहीं । शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥न ये राम नाम मुखीं । नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुद्ध ॥४॥मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥१४६) उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥इंद्रादि चंद्रा लावियेले काळें । कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी । तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी । अभिलाष करी मनें धरिला ॥५॥चोखा म्हणे येणें बहु नाडियेले । काय आतां बोल जाय पुढें ॥६॥१४७) ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥१४८) कोणें देखियेलें जग । पांडुरंगा मी नेणें ॥१॥मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥एका आधी कैचे दोन । मज पासोन मी नेणें ॥३॥चोखामेळा म्हणती संत । हे ही मात उपाधी ॥४॥१४९) घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥लावूनियां मोह भुलविलें आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥सकळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP