मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत चोखामेळा| नाम संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - नाम श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा नाम Translation - भाषांतर १२१) नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥१२२) नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥१२३) नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥चोखा म्हणे येथें एकचि साधन । संतासी शरण जाईं सुखें ॥४॥१२४) भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥आदिनाथ कंठी जप हा सर्वंदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥चोखा म्हणे येथें सर्वांधिकार । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥१२५) भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म । वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥चोखा म्हणे मज कांहींच न कळे । विठ्ठलाचे बळें नाम घेतों ॥४॥१२६) महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करूं नका ॥३॥चोखा म्हणे खातां जिवितां वाचें । नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥१२७) माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥आवडी बैसली विठूचे चरणीं । आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥१२८) मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥न करी कायाक्लेश उपवास पारणें । नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम । तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥१२९) योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥कासया फिरणें नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काया क्लेश ॥३॥चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥१३०) राम हीं अक्षरें सुलभ सोपारी । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥चोखा म्हणे नाम सुलभ सोपारें । जपावें निधरिं एका भावें ॥५॥१३१) वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥योगायोगादि जपतप कोटी । एक नाम होठीं घडे तेंचि ॥३॥चोखा म्हणे ऐसा आहे शिष्टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥१३२) सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥न लगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोंबाचे ॥३॥बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥१३३) हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥योग्यांचिया वाटे नलगे खटपट । नामचि फुकट जपा आधीं ॥३॥चोखा म्हणे सुख संताचे संगती । नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP