मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| करुणा संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - करुणा श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा करुणा Translation - भाषांतर ५६) आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥चोखा म्हणे तुमचा अवित हा खेळ । भुललें सकळ ब्रम्हांडचि ॥४॥५७) आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥दारीं परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥होयाचें ते झालें असो कां उदास । धरोनिया आस राहों सुखी ॥३॥चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे । न लावीं पिसें जीवा कांही ॥४॥५८) आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवाळा तुम्हां लागीं ॥३॥चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावी आस मायबापा ॥४॥५९) आतां कोठवरी । भीड तुमची धरूं हरि ॥१॥दार राखीत बैंसलों । तुम्ही दिसे मोकलिलों ॥२॥ही नीत नव्हे बरी । तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥चोखा म्हणे काय बोलों । आमुचे आम्ही वायां गेलों ॥४॥६०) आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥कामक्रोधांचे सांपडलों हातीं । बहुत फजीति होय तेणें ॥३॥नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें । सुख राई पाडें झालें मज ॥४॥चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे । बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥६१) आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥जन्म देई संताघरीं । उच्छिष्टाचा अधिकारी । आणिक दुजी थोरी । दारीं परवरी लोळेन ॥३॥नका मोकलूं दातारा । विनंती माझी अवधारा । अहो रुक्मादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥६२) आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥६३) आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा । होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं । देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥केला माझा अंगिकार । आतां कां करितां अव्हेर । तुमचा तुम्ही साचार । करा विचार मायबापा ॥३॥जन्मोजन्मींचा पोसणा । तुमचाचि नारायणा । भाकितों करुणा । आना मना चोखा म्हणे ॥४॥६४) इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥उच्छिष्ट धणिवरी पोटभरी घाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळु देवा ॥४॥६५) करोनियां दया । सांभाळा जी देवराया ॥१॥मी तो पतीत पतीत । तुमचाचि शरणांगत ॥२॥लाज येईल तुमचे नांवा । मज उपेक्षितां देवा ॥३॥आपुलें जतन । करा अभय देवोन ॥४॥चोखा म्हणे हरि । आतां भीड न धरीं ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP