मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| करुणा संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - करुणा श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा करुणा Translation - भाषांतर ८६) धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा । अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा ॥३॥कर जोडोनी चोखा विनवितो देवा । बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥८७) धीर माझे मना । नाहीं नाहीं नारायण ॥१॥बहुचि जाचलों संसारें । झालों दु:खाचे पाझरे ॥२॥भोग भोगणें हें सुख । परि शेवटीं आहे दु:ख ॥३॥भारवाही झालों । वाउग्या छंदा नागवलों ॥४॥दया करा पंढरीराया । चोखा लागतसे पायां ॥५॥८८) नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥करूं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन । धि:कारिती जन सर्व मज ॥३॥अंगसंग कोणी जवळ न बैसे । चोखा म्हणे ऐसे जीवित माझें ॥४॥८९) नेणों तुमचे मन कठिण कां झालें । मज कांहीं न कळे पूर्व कर्म ॥१॥किती आठवण मागिलाचि करूं । तेणें पडे विचारू पुढीलासी ॥२॥आतां अवघड दिसतें कठीण । मनाचें हें मन चिताडोहीं ॥३॥चोखा म्हणे काय करूं तें आठवेना । निवांत वासना कई होय ॥४॥९०) नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं । लक्ष चरणावरी ठेवोनियां ॥१॥कां गा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥नेणें करूं भक्ति नेणें करूं सेवा । न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥चोखा म्हणे माझ्या जीविचा विसावा । पुकारितों धावां म्हणोनियां ॥४॥९१) बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख दु:ख लेशे भोगोनियां ॥१॥मागिला लागाचें केलेंसे खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर ते ही केले देशधडी ॥४॥९२) बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो बळी जीवें माझ्या ॥१॥आतां कोणावरी रूसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥आहे जें संचित तैसें होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे । झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥९३) बावरलें मन करीं धांवा धावी । यांतुनी सोडवीं देवराया ॥१॥लागलासे चाळा काय करूं आतां । नावरे वारितां अनावर ॥२॥तुमचें लिगाड तुम्हींच वारावें । आम्हांसी काढावें यांतोनियां ॥३॥चोखा म्हणे तरीच जीवा होय सुख । नका आतां दु:ख दाऊं देवा ॥४॥९४) भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥कवणाची असा पाहूं कोणीकडे । जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥९५) भ्रमण न करितां भागलों जी देवा । न मिळे विसावा मज कोठें ॥१॥लागलेंसे कर्म आमुचे पाठारीं । आतां कोणावरी बोल ठेऊं ॥२॥सांपडलों वैरियाचे भांडवली । न कळे चिखलीं रोवियेलों ॥३॥चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । तुम्हाविण फांसा उगवी कोण ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP