संत चोखामेळा - बाल क्रीडा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


बाल क्रीडा
४३) नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥
पावा वाहे वेणु खांदिया कांबळा । रूळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचें । उष्टें गोपाळांचे खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठींचा हरी । गोपाळा गजरीं काला वांटी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-07-10T22:28:16.5230000