अभंग - अग आई, विश्वंभरे

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


अग आई, विश्वंभरे । दगा देणें नाहीं बरें ॥धृ०॥
लोभ लावूनि आगळा । मग कापूं नये गळा ॥१॥
जेवुं घालुनी उपाशी । मग देऊं नये फांशी ॥२॥
अंगीं लाउनी चंदन । करुं नये जेर - बंदन ॥३॥
साखर देउनिया हातीं । वरी घालुं नये माती ॥४॥
बाळ घेउनिया काखीं । माय मळविता राखी ॥५॥
मुखीं हात फिरविसी । शत्रु - हातीं मारविसी ॥६॥
शिरीं झांकुनी पदर । करुं नये अनादर ॥७॥
आधीं केली प्रतिपाळणा । आतां करसि कां हेळणा ॥८॥
रस प्रेमाचा पाजून । उगें घेसी कां गांजून ॥९॥
विष्णुदास म्हणे अभंग । अंबे, न करि मनोभंग ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP