अभंग - अंबाबाईचें माहूर
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
अंबाबाईचें माहूर । आतां राहिलें तें दूर ॥१॥
माझें प्रारब्धचि द्वाड । थोर पडले पर्वत आड ॥२॥
कामक्रोधाचा भरपूर । प्रणीतेला आला पूर ॥३॥
भाव कळोनिया आला । नर जन्म वायां गेला ॥४॥
दंभ मत्सर दांडगे । मधें अडविती लांडगे ॥५॥
विष्णुदास म्हणे पाही । दुरावली अंबाबाई ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP