अभंग - मूळपीठाची वेल्हाळा

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


मूळपीठाची वेल्हाळा । आदिमाय ज्ञानकळा ॥१॥
आई बैसली नवरात्रीं । झडति चौघडे वाजंत्री ॥२॥
पुढे घटमंडित माळा । द्वारीं होतसे सोहळा ॥३॥
देव देवी गण मातृका । ऋद्धि सिद्धि महाकालिका ॥४॥
पूर्णाहुती होमानळीं, पडति चंड मुंड बळी ॥५॥
भुतें गोंधळ घालिती । भक्त उदयो बोलती ॥६॥
विष्णुदास म्हणें धालों । आजी धन्यधन्य झालों ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP