अभंग - नित्य मातृतीर्थी स्नान
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
नित्य मातृतीर्थी स्नान । नित्य रेणुकादर्शन ॥१॥
आदिमाये तुजपाशी । सर्व देव तीर्थें काशी ॥२॥
उजळोनी ज्ञानज्योती । नित्य ओवाळूं आरती ॥३॥
करुं तीर्थामृतपान । हेंचि जप तप ध्यान ॥४॥
करुं त्रिकाळ वंदन । तोडूं यमाचें बंधन ॥५॥
करुं नित्य प्रदक्षिणा । तन मन धन दक्षिणा ॥६॥
तुझ्या बैसोनी द्वारांत । गुण गाऊं दिन रात ॥७॥
नित्य पाहूं तुझें मूख । हेंचि आम्हां ब्रह्मसुख ॥८॥
नित्य विष्णुदास म्हणे । कृपा लोभ असूं देणें ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP