अभंग - आजी धन्य धन्य झालों
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
आजी धन्य धन्य झालों । मूळ पीठासनीं आलों ॥१॥
तुझीं पाहिलीं पाउलें । माझें मन सुख पावलें ॥२॥
सदानंदी मोक्षदानी । निरंतर राहे ध्यानीं ॥३॥
मज घेई वो ओसंगे । रेणुके तुं माय गंगे ॥४॥
देई प्रेमपान भिक्षा । हीच पुरवी अपेक्षा ॥५॥
विष्णुस्वामीला सन्मुख । आतां धाडूं ने विन्मुख ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP