अभंग - अग अनाथाचे आई
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
अग अनाथाचे आई । तुला म्हणती अंबाबाई ॥१॥
तरी थोडी बहुत कांहीं । मजवर कृपा केली नाहीं ॥२॥
ऐसें माझ्या चित्ताठाई । माझें मन देतें ग्वाही ॥३॥
विष्णुदास म्हणे पाही । अंबे ! कृपावंत होई ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP