अभंग - मातृतीर्थीं रहिवास

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


मातृतीर्थीं रहिवास । हेंचि वैकुंठ कैलास ॥१॥
नित्य भजन पूजन । नित्य भिक्षान्न भोजन ॥२॥
सदा प्रसन्न मूरती । वसे सिंहाद्री पर्वतीं ॥३॥
सदा रेणुका माउली । करी कृपेची साउली ॥४॥
विष्णुदास स्वामी म्हणे । आतां आम्हां काय उणें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP