मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन| सुभाषिते ओवी गीते : स्त्रीजीवन बहीण भाऊ मायलेकरे मुलगी सुखदुःखाचे अनुभव देवादिकांच्या ओव्या तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व्रत व सण ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन पहिली माझी ओवी सुभाषिते संकीर्ण संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ स्त्रीजीवन - सुभाषिते मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह. Tags : ganegeetoviओवीगाणीगीतमराठी सुभाषिते Translation - भाषांतर डोंगर चढूनभेटावे देवालायत्नाने यशालामिळवावे ॥१॥नको ग कधीहीसंसारी बोलू खोटेत्याने गेले मोठमोठेअधोगती ॥२॥नको ग कधीहीसंगती दुर्जनांचीभेट ती नरकाचीमृत्युलोकी ॥३॥रामाच्या नावाचापापी कंटाळा करितीनिवळ टाकूनपाणी गढूळ भरिती ॥४॥माझे माझे म्हणूनप्राणी संसारी भुलतोनिवळ सोडूनपाणी गढूळ भरीती ॥५॥साखर मुंगीलामध तो माशीलातैसे सज्जन चित्तालारामनाम ॥६॥शिकती तरायापाण्यात पडूनसंसारी वावरुनमुक्त व्हावे ॥७॥वाण्याच्या दुकानीभाव नाही कापरालामुर्खाशी बोलताशीण येई चतुराला ॥८॥चंदना पडतीविळखे सर्पाचेतैसे दुर्जनांचेसज्जनांना ॥९॥बळीचिये दारीतिष्ठतो वामनभक्ताचे आधीनभगवंत ॥१०॥भक्ताला जवळदुष्टा सदा लांबप्रल्हादासाठी खांबस्वीकारीला ॥११॥कुणी नाही रे कुणाचाआत्मा नव्हे रे कुडीचाआहे संसार घडीचानाशिवंत ॥१२॥कुणी नाही रे कुणाचापुत्र नव्हे ग पोटीचायेईल कामालाधर्म पाचा ग बोटीचा ॥१३॥कुणी नाही रे कुणाचाकशाला हसा रडाआहे संसार बुडबुडानाशिवंत ॥१४॥कुणी नाही रे कुणाचाकशाला खोटे बळसंसार मृगजळनाशिवंत ॥१५॥वृद्ध मायबापसेवावे पूजावेहेच समजावेधर्मसार ॥१६॥वृद्ध मायबापजशी पिकलेली फळेतयांची चरणकमळेनित्य वंदू ॥१७॥रामराम म्हणूनीजपतो माझे ओठजिव्हेबाई घ्यावा घोटअमृताचा ॥१८॥रामराम म्हणूनीजपती माझ्या दाढाघेई अमृताचा काढाजिव्हेबाई ॥१९॥कुतरा भुंकतोमांजर देखूनगर्जतो पंचाननहत्तीसाठी ॥२०॥कुतरा भुंकतोभुंकतो भीतभीतरानात हुंकारतपंचानन ॥२१॥हंस धीर गतीकावळे कोकलतीमुर्खांना उपेक्षितीबुद्धिमंत ॥२२॥नको तीर्थयात्रानको चारी धामेमुख्यी घ्यावे नामेविठ्ठलाची ॥२३॥नको तीर्थयात्रानको सप्त पुर्यामुखी ओव्या गाव्याविठ्ठलाच्या ॥२४॥नको तीर्थयात्रानको अन्य नेमव्रतमाझे पवित्र दैवतमायबाप ॥२५॥रामराम म्हणुनीराम माझ्या ह्रदयातजसे मोती करंड्यातवागविते ॥२६॥चंद्राच्या प्रकाशीलोपून जाती ताराथोरापुढे तोरामिरवू नये ॥२७॥ चांदण्यांनो तुम्हीअवसे राज्य कराथोर नसता गलबलाकरावा की ॥२८॥कुतरा भुंकतोघराच्या सभोवतीघर रानी गर्जतीसिंह व्याघ्र ॥२९॥आज काय जालेखळे पडले चंद्रालाकोणी पापी का संतालाछळिताहे ॥३०॥पुराणींच्या गोष्टीगोड ऐकायलातसे वागायलाअवघड ॥३१॥पुराणींच्या गोष्टीदेवळात गोडसंसाराची ओढकोणा सुटे ॥३२॥पुराणींच्या गोष्टीसखी पुराणी राहतीजन हे वागतीयथातथा ॥३३॥आकाशामधूनकेवढा तारा तुटेपतनावाचूनकोणी ना जगी सुटे ॥३४॥फुले कोमेजतीतारे वरचे तुटतीसर्वांना आहे च्युतीसंसारात ॥३५॥फुले सुकताततारे गळतातअसे कोण गं अच्युतसंसार ॥३६॥चूल सारवीतीजशी नित्य गं नेमानेतसे मन हे भक्तीनेसारवावे ॥३७॥सारे बुडबुडेकाही संसारी टिकेनाहे गं मरण कुणाहीकधी काळी चुकेना ॥३८॥जो जो प्राणी आलामाउलीच्या पोटीधरित्रीच्या पोटीतो तो जाई ॥३९॥ तिकीट संपतासोडती आगीनगाडीसोडावे लागे जगआयुष्याची सरता घडी ॥४०॥अमृत विषयाचेविष अमृताचेईश्वराच्या इच्छेहोत असे ॥४१॥पो पो गं पो पोजशी करते मोटारतसा जगी अहंकारप्राणिमात्रा ॥४२॥पो पो गं पो पोमोटार पुढचे पाहिनातसा कोणा जुमानीनाअहंकार ॥४३॥समुद्राच्या काठीविष्णू मळीतसे मातीब्रह्मा घडवितो मूर्तीनाना परीच्या ॥४४॥समुद्राच्या काठीविष्णू वाळू मळीघडवी बाहुलीब्रह्मदेव ॥४५॥वेळी सारवावेवेळीच शिवावेहा गं देह आहेतोच सार्थक करावे ॥४६॥वेळीच जपावेवेळच्या वेळी कामहा गं देह आहेतोच स्मरु मनी राम ॥४७॥ज्यांच्या दारी आहेकंदर्पाचे रोपत्याच्या हाती सारे पापजमा होते ॥४८॥कोणाचे कोण आहे कोणमाझा आहे भगवानशेवटा जाऊ देमूर्खा तुझा अभिमान ॥४९॥कोणाचे आहे कोणमाझा आहे भगवानत्याच्या गं आधारेजाऊ संसार तरुण ॥५०॥संकटात कामायेई जो मैत्र खराअभंग राहे हिराघाव पडता ॥५१॥इवलीशी पणतीप्रकाशा देतसेइवलेसे पुण्यजिवा आधार होतसे ॥५२॥सुंठ घासायलाखापरी येते कामीजगात निकामीवस्तू नाही ॥५३॥वरुनी आरशाचेआत परी भांडे काळेसर्वच जिवांचेआता बाहेर निराळे ॥५४॥संकटात कामायेईल तो खरात्याची कास धराजन्मवेरी ॥५५॥संसारी मानावेलागते समाधानसगळे मनीचेहोईना कधी कोण ॥५६॥संसारी मानावेलागते सखी सुखनाही तर सदा दुःखचोहो बाजू ॥५७॥पिकतात केसगळते बत्तिशीवासना राक्षसीजैशीतशी ॥५८॥पांढुरले केसपरी वासना हिरव्याकळेना कोणालात्या कैशा जिरवाव्या ॥५९॥फुलात सुगंधकमळी मकरंदह्रदयी गोविंदअसो तेची ॥६०॥नवतीची नारनार चाले दणादणानवती गेली निघूनमाश्या करिती भणाभणा ॥६१॥समुद्रा रे बापाकिती करिशी बढाईनाही पाण्याला गोडाईतिळमात्र ॥६२॥गोड बाळपणगेले बागडोनीपाखराच्यावाणीसदोदित ॥६३॥मरणाच्या वेळेरामनाम घ्यावेत्याने मुक्त व्हावेचारी लोकी ॥६४॥राम राम म्हणाराम साखरेचा खडात्याने माझ्या दंतदाढागोड केल्या ॥६५॥राम राम म्हणताराम साखरेचा खडरामाचे नाव घेतादिवस आनंदात जावा ॥६६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP