मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन| पहिली माझी ओवी ओवी गीते : स्त्रीजीवन बहीण भाऊ मायलेकरे मुलगी सुखदुःखाचे अनुभव देवादिकांच्या ओव्या तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व्रत व सण ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन पहिली माझी ओवी सुभाषिते संकीर्ण संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ स्त्रीजीवन - पहिली माझी ओवी मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह. Tags : ganegeetoviओवीगाणीगीतमराठी पहिली माझी ओवी Translation - भाषांतर पहिली माझी ओवीपहिला माझा नेमतुळशीखाली रामपोथी वाची ॥१॥पहिली माझी ओवीपहिल्यापासूनआली रथात बसूनअंबाबाई ॥२॥ पहिली माझी ओवीवहिला काळा दोरालिहिणाराचा हात गोराराजबिंडा ॥३॥दुसरी माझी ओवीदूध नाही कोठेध्यानी मनी भेटेपांडुरंग ॥४॥तिसरी माझी ओवीतीन त्रिकुटाच्या परीब्रह्मविष्णुशिवावरीबिल्वपत्र ॥५॥चौथी माझी ओवीचवथीच्या चंद्रामखमली गेंदारंग बहू ॥६॥पाचवी माझी ओवीपाच पांडवांनापाठीच्या भावंडांनाराज्य येवो ॥७॥सहावी माझी ओवीसहावीची छाया पडेतुझ्या गर्भ तेज चढेउषाताई ॥८॥सातवी माझी ओवीसात सप्तर्षीकौसल्येच्या कुशीरामचंद्र ॥९॥आठवी माझी ओवीआठ आटेपाटेदेवाजीचे ओटेरंगविले ॥१०॥नववी माझी ओवीनऊ खंडी गहूफेरीला किती घेऊदेवाजीच्या ॥११॥दहावी माझी ओवीदशांगुळे मी गाईनलक्ष्मी होईनसंसारात ॥१२॥अकरावी माझी ओवीअकरा हे गं गडूजेवला बुंदीलाडूगोपूबाळ ॥१३॥बारावी माझी ओवीबारा आदितवारसूर्याला नमस्कारघालू गेले ॥१४॥तेरावी माझी ओवीतेरा तेरियाचीपालखी हिरियाचीदेवाजींची ॥१५॥चौदावी माझी ओवीचौदा चौकड्यांचीपालखी हलकड्यांचीदेवाजींची ॥१६॥पंधरावी माझी ओवीपंधरा की गं काड्यारंगविल्या साड्यासीताबाईच्या ॥१७॥सोळावी माझी ओवीसोळा कोशिंबिरीआज आहे माझ्या घरीभाऊबीज ॥१८॥सतरावी माझी ओवीसतरा धंदे करु नयेऐकावे माझे सयेहितासाठी ॥१९॥अठरावी माझी ओवीअठरा धान्यांचे कडेबोळेशेजीशी बर्या बोलेवाग बाई ॥२०॥एकोणिसावी माझी ओवीएकूण एक करासंसारी नित्य स्मरागणेराया ॥२१॥विसावी माझी ओवीविसावा माहेरालाआईच्या आसर्यालासुखशांती ॥२२॥एकविसावी माझी ओवीएकवीस दुर्वा आणावाहा देव गजाननालंबोदरा ॥२३॥पहिली माझी ओवीजगाच्या पालकारक्षिता बालकादेवराया ॥२४॥दुसरी माझी ओवीदुजा नको भावतरीच पावे देवसंसारात ॥२५॥तिसरी माझी ओवीभीकबाळे तीन मोतीसंसारी रमापतीआठवावा ॥२६॥चौथी माझी ओवीचांडाळचौकडीत्यांची कधी गडीकरु नये ॥२७॥पाचवी माझी ओवीआपुली पाच बोटेत्यांनी कधी कर्म खोटेकरु नये ॥२८॥सहावी माझी ओवीसहा महाशास्त्रेनिर्मिली विचित्रेऋषिमुनींनी ॥२९॥सातवी माझी ओवीसाता आठवड्याचे वारआहे हा संसारसंकटाचा ॥३०॥आठवी माझी ओवीआठवा देवकीचासखा द्रौपदीचाकृष्णनाथ ॥३१॥नववी माझी ओवीआहेत नवग्रहसंसारी आग्रहधरु नये ॥३२॥दहावी माझी ओवीआहेत दहा दिशाचंद्रामुळे निशाशोभतसे ॥३३॥अकरावी माझी ओवीअकरावा अवतारमानू ज्ञानेश्वरआळंदीचे ॥३४॥अकरावी माझी ओवीअक्राळ आसूरनखरा न करउषाताई ॥३५॥बारावी माझी ओवीसंसारी बारा वाटापुण्याचा करी साठाक्षणोक्षणी ॥३६॥तेरावी माझी ओवीतीन तेरा होतीजरी न जपतीजगी लोक ॥३७॥चौदावी माझी ओवीचौदा चौकड्यांचानाश झाला रावणाचागर्व होता ॥३८॥पंधरावी माझी ओवीपंधरा दिवसांचा पक्षसंसारात दक्षराही सदा ॥३९॥सोळावी माझी ओवीसोळा चंद्रकलापतीच्या ग कलासांभाळावे ॥४०॥सतरावी माझी ओवीसतरावीचे दूधयोगी पीती शुद्धसमाधीत ॥४१॥अठरावी माझी ओवीअठरा पुराणेलिहिली व्यासानेलोकांसाठी ॥४२॥अठरावी माझी ओवीअठरापगड जातीगावात नांदतीआनंदाने ॥४३॥एकोणिसावी माझ ओवीएकोणीस वर्षेनेली मी गं हर्षेसंसारात ॥४४॥विसावी माझी ओवीविसाण पाण्याचेनिशाण रामाचेउभे केले ॥४५॥विसावी माझी ओवीवीस मणी खंडीनास्तिक पाखंडीहोऊ नये ॥४६॥एकविसावी माझी ओवीएकवीस मोदकतेणे सिद्धीविनायकसुप्रसन्न ॥४७॥पहिली माझी ओवीपहिला माझा नेमगायिले निधानपांडुरंग ॥४८॥दुसरी माझी ओवीदुजे नाही कोठेपाहीन मी विटेपांडुरंग ॥४९॥तिसरी माझी ओवीत्रिगुणा शरीरागाईन सोयरापांडुरंग ॥५०॥चवथी माझी ओवीचतुर्भुज मूर्तीगाईला श्रीपतीपांडुरंग ॥५१॥पाचवी माझी ओवीपाची पराक्रमगाईन आत्मारामपांडुरंग ॥५२॥सहावी माझी ओवीसहा मास लोटलेसाक्षात भेटलेपांडुरंग ॥५३॥सातवी माझी ओवीसप्त द्वीपांठायीलक्ष्य तुझ्या पायीपांडुरंग ॥५४॥आठवी माझी ओवीअठ्ठावीस युगेविटेवरी उभेपांडुरंग ॥५५॥नववी माझी ओवीनवविधा भक्तीगाईन श्रीपतीपांडुरंग ॥५६॥दहावी माझी ओवीदाही अवताराघाली संवसारातुका म्हणे ॥५७॥चौथी माझी ओवीचौसंगे दाटलीप्रसंगे भेटलीमायबाई ॥५८॥बारावी माझी ओवीबारा वाटा गं संसारीआठवा कंसारीभय नाही ॥५९॥तिसरी माझी ओवीतीन पावली वामनव्यापितो त्रिभुवनदेवांसाठी ॥६०॥सहावी माझी ओवीसहा हे गं ऋतूवसंत परंतुत्यांचा राजा ॥६१॥सहावी माझी ओवीसहा तोंडे षडाननानमू देवा गजाननात्याच्या भावा ॥६२॥एकटी दुसरीतिसरीला चिंधीचवथीला बिंदीउषाताईला ॥६३॥एकटी दुसरीतिसरीला माळचवथीला चंद्रहारघालू गेला ॥६४॥पहिली माझी ओवी पहिले वहिलेभक्ती वंदिले मायबाप ॥६५॥पहिली माझी ओवी पहिली कामालास्मरते रामाला अंतरंगी ॥६६॥पहिली माझी ओवी पहिला गं पुत्रव्हावा संसारातम्हणतात ॥६७॥दहावी माझी ओवीदश इंद्रियांचाअकराव्या मनाचाखेळ सारा ॥६८॥बारावी माझी ओवीबारा अक्षरांचा मंत्रध्रुव बाळाने पवित्रजप केला ॥६९॥सरसकट माझी ओवीसरसकट सहा देवाआरती महादेवा कापुराची ॥७०॥पहिली माझी ओवी सदा एकीचे पालनघरी बेकी होता जाणराज्य गेले ॥७१॥दुसरी माझी ओवीदुहीला मिळता वावपरक्यांनी डावसाधियेला ॥७२॥तिसरी माझी ओवीलाभ तिसर्याचादोघांच्या भांडणाचाशेवट हा ॥७३॥चवथी माझी ओवीचारांचे ऐकावेहट्टाला सोडावेसंसारात ॥७४॥ओवीला आरंभ केलापेटीला कप्पे कप्पेलिहिणार माझे सख्खे भाईराया ॥७५॥ओवीला आरंभ केलापेटीला काळा दोरालिहिणाराचा हात गोराभाईरायाचा ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP