मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन| ऐतिहासिक ओवी गीते : स्त्रीजीवन बहीण भाऊ मायलेकरे मुलगी सुखदुःखाचे अनुभव देवादिकांच्या ओव्या तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व्रत व सण ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन पहिली माझी ओवी सुभाषिते संकीर्ण संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ स्त्रीजीवन - ऐतिहासिक मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह. Tags : ganegeetoviओवीगाणीगीतमराठी ऐतिहासिक Translation - भाषांतर रायगडच्या किल्ल्यावरीसोनियाचा वरवंटाशिवाजी मराठाराज्य करी ॥१॥रायगडच्या किल्ल्यावरीसोन्याचा पाळणाशिवाजीचा बाळ तान्हाराजाराम ॥२॥शिवाजी शिवाजीऐकुनी शत्रू पळेसर्वांचा गर्व गळेनाममात्रे ॥३॥शिवाजी शिवाजीऐकून शत्रू धूम ठोकीशिवाजी महाराजांचीसत्कीर्ती गावी लोकी ॥४॥शिवाजी छत्रपतीसांबाचा अवतारमावळे वानररामरायाचे ॥५॥वानरांकरवीराम रावणा लोळवीमावळ्यांचा हातीशत्रू शिवाजी बुडवी ॥६॥शिवछत्रपतीधन्य धन्य गं राजापोटच्या पुत्रावरीपाळिली त्याने प्रजा ॥७॥खाऊच्या निमित्तेबादशाह फसविलेशिवाजी बसून आलेपेटार्यात ॥८॥शिवाजी राजाचेधन्य गं धाडसभवानी आईचेतो गं लाडके पाडस ॥९॥शिवाजी राजाचेधन्य गं धाडसभवानी मातेसचिंता त्यांची ॥१०॥शिवाजीचे किल्लेकिल्ले ना, ती तो किल्लीज्याच्या हाती तो जिंकीदिल्ली उत्तरेची ॥११॥शिवाजीचे किल्लेकिल्ले चढाया कठीणमोल प्राणाचे देऊनकरी मराठा जतन ॥१२॥शिवाजीचे किल्लेकिल्ले चढाया कठीणत्याचे मावळे चढतीत्यांना दोर ग लावून ॥१३॥दळीता कांडीतातान्हे बाळा आंदूळताशिवाजी मराठाआठवावा ॥१४॥काय सांगू सखीआले शिवाजीचे लोकनिघून गेले रातोरातझपाट्याने ॥१५॥वैरियांच्या हातीशिवराया देऊ तुरीवैरियांच्या तोडीशिवराया घाली भुरी ॥१६॥चिमणाजी बाजीरावहे दोघे सख्खे भाऊम्हणती वसई घेऊएका रात्री ॥१७॥चिमणाजी बाजीरावदोघा भावांची लगटशनिवारवाड्यात हत्ती आलामोठ्या आरीसकट ॥१८॥चिमाजी अप्पांनी मसलत केलीबाजीरावांनी मोडीलीनवी अंबारी जोडलीपुण्यामध्ये ॥१९॥चिमणाजी बाजी गेलेदुसरे बाजीरव कैसे झालेसारे पुणे धुंडाळीलेपैशांसाठी ॥२०॥पेंढार की आलेआले मोने मोनेमुरुडगावचे सोनेलुटीयले ॥२१॥पेंढार की आलेआले ते दुपारीबागलीणबाईची सरीलांबविली ॥२२॥आधी घेतला चंदन - वंदनमग घेतला साताराकुरुंदवाडकरांचा पेटाराचंदनाचा ॥२३॥आधी घेतला चंदन - वंदनमग घेतली रायरीकुरुंद वाडकरांची पायरीचंदनाची ॥२४॥आधी घेतला चंदन - वंदनमग घेतला अरगजाकुरुंदवाडकरांचा दरवाजाचंदनाचा ॥२५॥नारायणरावाला मारीलेहाडांचे केले फासेआनंदीबाई हासेपुण्यामध्ये ॥२६॥नारायणरावाला मारिलेहाडांचे केले दोरआणि पुणे गं शहरातआनंदीबाई थोर ॥२७॥नारायणरावाला मारिलेहाडांचे केले मणीपुण्याचे झाले धनीबाजीराव ॥२८॥नारायणरावाला मारिलेमागल्या वेशीपाशीगंगाबाई माहेराशीगेली होती ॥२९॥नारायणरावाला मारिलेआडव्या सोप्यातराणीचे वचनातरघुनाथराव ॥३०॥नारायणरावाला मारिलेमारीले दुपारीगंगाबाई माहेरीहोती तेव्हा ॥३१॥नारायणरावाला मारिलेमारिले दुपारीत्यांनी खाल्ली होतीनुकती लवंग - सुपारी ॥३२॥नारायणरावावरीघातले मारेकरीत्याचा प्रभूही कैवारीझाला नाही ॥३३॥नारायणरावाला मारिलेमुडदा ठेविला झाकोनीआली माहेरी टाकूनी गंगाबाई ॥३४॥नारायणरावाला मारिलेगंगाबाई गरभारनवा भरविला दरबाररघुनाथरावांनी ॥३५॥नारायणरावाला मारिलेगंगाबाई रडेआनंदीबाई पेढेवाटीतसे ॥३६॥नारायणरावाला मारिलेआनंदीबाईला आनंदतिने तबकी गुलकंदवाटीयेला ॥३७॥समुद्र आटलामासा करी पाणी पाणीराज्याला झाला धनीबाजीराव ॥३८॥आनंदीबाईनेपाप हो फार केलेम्हणून फावलेसाहेबांचे ॥३९॥आनंदीबाईनेलोकी भांडण लावीलेम्हणून फावलेइंग्रजाला ॥४०॥आनंदी गं बाईजशी कैकेयी दुसरीगिळले गं राज्यजसे माणिक सुसरी ॥४१॥जळला बुधवारवाडाबाराच्या ठोक्यालासाहेब लोकालावर्दी गेली ॥४२॥जळला बुधवारवाडाउडाले कऊलनेला पुण्याचा डऊलइंग्रजांनी ॥४३॥चला जाऊ पाहूपेशव्यांचा शनिवारवाडादारात चौघडाजेथे वाजे ॥४४॥चला जाऊ पाहूपुण्यातले वाडेजेथे लाखो घोडेनाचले गं ॥४५॥पुणे शहरातछपन्न सरदारभरे गं दरबारपेशव्यांचा ॥४६॥पुणे शहरातमोठमोठे वाडेलोक परी वेडेकारभारात ॥४७॥पुणे शहरातकेला पाण्याचा सुकाळपरी पुण्याचा दुष्काळचोहीकडे ॥४८॥पुणे झाले सुनेगुणे झाले उणेदेवे नारायणेन्याय दिला ॥४९॥पुणे झाले सुनेवाडे ओस पडेवैभव सारे गेलेमराठ्यांचे ॥५०॥पुण्याचे वैभवपुन्हा दिसेल ठळकतेथे आहेत टिळकदेशभक्त ॥५१॥पुण्याची पुण्याईपुन्हा ग उदेलीमूर्ती सावळी जन्मलीटिळकांची ॥५२॥स्वदेशीचा मंत्रलोकमान्य देतीमिळेल त्याने मुक्तीहिंदुस्थाना ॥५३॥बायांनो नटू नकापरदेशी गं चिटानेबुडती कारखानेसाळियांचे ॥५४॥विदेशी बांगडीनको भरु गं हातातअन्नान्न देशातहिंदुस्थानी ॥५५॥चहाचे व्यसनदारुच्या बरोबरीकपबशा घरोघरीखुळखुळती ॥५६॥चहाचे व्यसनकपबशा गं निघाल्याप्रकृती क्षीण झाल्याघेणार्यांच्या ॥५७॥माझे दारावरनंकोण गेले गरजतजयजयकार गं करीतटिळकांचा ॥५८॥टिळक सुटलेरात्रीचे साडेबारादेशोदेशी गेल्या तारादेशभक्ता ॥५९॥टिळक सुटलेरात्रीचे साडेअकराघरोघरी साखरावाटीयेल्या ॥६०॥बाळ गंगाधरदत्ताचा अवतारदेशाचा कारभारघेई माथा ॥६१॥का ग सखी गर्दीकाल जाहली रस्त्यातमिरवणूक होती येतटिळकांची ॥६२॥पहिली माझी ओवीजगाच्या पालकारक्षी टिळक बालकारात्रंदिवस ॥६३॥पैसेवाला मोठामुंबईचा टाटातेणे मुळशी पेटाबुडविला ॥६४॥पैसेवाला मोठामुंबईचा टाटामुळशीवर वरवंटाफिरविला ॥६५॥पैसेवाला मोठामुंबईचा टाटात्याच्या नाही पोटादयामाया ॥६६॥मुळशीत मोठामांडिती सत्याग्रह बुडत्या धरणीलापांडुरंग वराह ॥६७॥मुळशीच्या सत्याग्रहीउडे आधणांचे पाणीपरी सत्याग्रही भगिनीमानिती ते फुलावाणी ॥६८॥जिकडे तिकडेजाहले गांधी गांधीअंगावर साधी खादीघालतात ॥६९॥जिकडे तिकडेजाहले गांधी गांधीतुरुंगी राजबंदीलाखो जाती ॥७०॥गांधी हा गारुडीवाजवितो पुंगीइंग्रजाला गुंगीतेणे येई ॥७१॥गांधी जादूगारभ्याडा करी धीटदास्याचा आणी वीटसर्व लोका ॥७२॥जिकडे तिकडेजाहले गांधी गांधीराहणी होई साधीशिकलेल्यांची ॥७३॥कुठे गं चालल्याहजारो या ग नारीसमुद्रीचे तीरीसत्याग्रहा ॥७४॥चुलीपाशी आलागांधींचा सत्याग्रहइंग्रजाला शहघरीदारी ॥७५॥कुठे या चालल्याहजारो आयाबायाबंद मीठ लुटावयाइंग्रजांचे ॥७६॥कुठे या चालल्याबायका गाणी गातसत्याग्रह चळवळीतउडी घ्याया ॥७७॥बाया झाल्या धीटत्यांची गेली भीतीहातात झेंडा घेतीस्वराज्याचा ॥७८॥दूरच्या तुरुंगातभगतसिंगा फाशी देतीगांधी चळवळ करितीस्वराज्याची ॥७९॥पालगड गावाकाँग्रेसची भरली सभातेथे राहे हिरा उभापंढरीनाथ ॥८०॥पालगडच्या गणपतीलाबदामाचा शिरापालगड गावचा हिरापंढरीनाथ ॥८१॥माझ्या अंगणातहिरवा भाजीपालाखादीचा टोपीवालाभाईराया ॥८२॥गांधीची चळवळमुलाबाळां बायकांचीभीती जाईल सर्वांचीमनातील ॥८३॥उठली मुले बाळेत्यांना भीती कशी नाहीवंदे मातरं दिशा दाहीघुमतसे ॥८४॥एक देणारे स्वातंत्र्यप्रिय देशा हिंदुस्थानादेई उदंड आऊक्षदेवा महात्मा गांधीना ॥८५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP