बायांची गाणी - पाठवणी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पाठवणी
सोनियाचा कलस दांडा, रूपियाचा रांजण मांडा रे
दारी खेल कशाचा आला....दारी खेल कशाचा आला...
आला तं येऊं दे, बायांच्या आंघोल्या होऊं दे
सोनियाचा कलस दांडा, रूपियाचा रांजण मांडा रे
दारी खेल कशाचा आला....दारी खेल कशाचा आला...
आला तं येऊं दे, बायांच्या आरत्या होऊं दे
सोनियाचा कलस दांडा, रूपियाचा रांजण मांडा रे
दारी खेल कशाचा आला....दारी खेल कशाचा आला...
आला तं येऊं दे, बायांची भोजनां होऊं दे
सोनियाचा कलस दांडा, रूपियाचा रांजण मांडा रे
दारी खेल कशाचा आला....दारी खेल कशाचा आला...
आला तं येऊं दे, बायांची पाठवणी होऊं दे
पाठवणी
सोनची कळशी तांब्या, रूप्याचा रांजण मांडा रे
दारी खेळ कशाचा आला....दारी खेळ कशाचा आला
आला तर येऊ दे, देवींची आंधोळ होऊ रे
सोनची कळशी तांब्या, रूप्याचा रांजण मांडा रे
दारी खेळ कशाचा आला....दारी खेळ कशाचा आला
आला तर येऊ दे, देवींची आरती होऊ रे
सोनची कळशी तांब्या, रूप्याचा रांजण मांडा रे
दारी खेळ कशाचा आला....दारी खेळ कशाचा आला
आला तर येऊ दे, देवींची जेवण होऊ रे
सोनची कळशी तांब्या, रूप्याचा रांजण मांडा रे
दारी खेळ कशाचा आला....दारी खेळ कशाचा आला
आला तर येऊ दे, देवींची पाठवणी होऊ रे
मुलाच्या अंगावरील देवीचे कोड बरे झाल्यानंतर त्याला विधीपूर्वक आंधोळ घातली जाते. त्या प्रसंगी हे गाणे म्हणतात.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP