बायांची गाणी - जीवदानी दुर्गाला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
जीवदानी दुर्गाला
चईत वैशाखाचा उन्हाला बंधवा उन्हाला किती चालू रं
पावलं झाली लालू रं
सजवावी सजवावी बंधवा भाड्यानं गाडी काय रं
सजवावी सजवावी बंधवानी भाड्यानं गाडी काय रं
चाकां सोनियाची त्यांना रूप्याच्या धुराव्या काय रं
रुप्याच्या धुराव्या त्यांना पितळंच्या साट्या काय रं
सातजणी बाया बहिणी रथात बैसल्या काय रं
आठवा हा कान्हा गऊली धुराणी बैसला काय रं
रथ काय धुमाटेला रथ धुमाटेला काय रं
धौल्याचा चाबूक कान्हानी पौल्याला मारला काय रं
धुमाटेला रथ गेला सूर्ये दूर्गाला काय रं
सूर्ये दूर्गाला हयेत सूर्याची घरां काय रं
सूर्याची घरां त्याला सोन्याची कौलारां काय रं
सोन्याची कौलारां पुढं काचूबंदी आंगणी रं
तुलसी बिरजवाना पुढं पाण्याची हाऊदा रं
पाण्याची हाऊदा आत काय सेवालू गोंडालू रं
आपटला खंजीर बायांनी दूर केली गोंडालू रं
दूर केली सेवालू बायांनी आत आंघोल्या केल्या रं
आंघोल्या सारूनी बाया दरीला निघाल्या रं
भिजकी सोडली बायांनी कोरडी लावेली रं
सात जणी बाया बहिणी रथात बैसल्या रं
रथ गेला जीवदानी दूर्गाला बायांचे माहेराला रं
जीवदानी दुर्गावर
चैत्र वैधाखाचे ऊन्ह, भावा उन्हात किती वालू रे
पायांचे तळवे झालेत लाल रे
सजवावी, सजवावी भावा भाड्याची बैलगाडी, काय रे
सजवावी, सजवावई भावाने भाड्याची बैलगाडी, काय रे
चाके सोन्याची त्यांच्या आर्या चांदीच्या, काय रे
चांदीच्या आर्या त्यांची पाठे पितळेची, काय रे
सातजणी देवी बहिणी रथात बसल्या, काय रे
आठवा हा कान्हा गवळी घुरेवर बसला, काय रे
रथ कसा सुसाट पळवळा, पळवळा, काय रे
ढवळ्याचा चाबूक कान्हाने पवळ्याचा मारला, काय रे
सुसाटला रथ गेला सूर्याच्या दुर्गावर, काय रे
सूर्य-दुर्गावर आहेत सूर्याची घरे, काय रे
सूर्याची घरे, त्यांना सोन्याची कौलारे, काय रे
सोन्याची कौलारे पुढे काचबंदी अंगण रे
तुळशी वृंदावन पुढे पाण्याचा हौद रे
पाण्याचा हौद, पाण्यात शेवाळे गोंडाळे रे
खंजीर खुपसून देवींनी दूर केले गोंडाळे रे
दूर केले शेवाळे देवींनी आत आंघोळी गेल्या रे
आंघोळी उरकून देवी दरीकडे गेल्या रे
भिजली वस्त्रे सोडली देवींनी कोरडी वस्त्रे नेसली रे
सातजणी देवी बहिणी रथात बसल्या रे
रथ गेला जीवदानी दुर्गावर देवींच्या नाहेराला रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP