बायांची गाणी - धिंगाणा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
धिंगाणा
बाय बाय बाय बाय बाय बाय बाय
बायांचा गौला आला की नाय
आता येतो मंग येतो उशीर झाला
न् घडी बायांनी धिंगाणा केला
बाय बाय बाय बाय बाय बाय बाय
बायांचा झबला झाला की नाय
आता आणतो मंग आणतो उशीर झाला
न् घडी बायांनी धिंगाणा केला
बाय बाय बाय बाय बाय बाय बाय
बायांच्या पट्ट्या झाल्या की नाय
आता आणतो मंग आणतो उशीर झाला
न् घडी बायांनी धिंगाणा केला
गोंधळ
बाई बाई बाई बाई बाई बाई बाई
देवींचा कृष्ण आला की नाही
आत्ता येईल मग येईल उशीर झाला
न् घडी देवींनी गोंधळ घातला
बाई बाई बाई बाई बाई बाई बाई
देवींचे झबले शिवून झाले की नाही
आत्ता होईल मग होईल उशीर झाला
न् घडी देवींनी गोंधळ घातला
बाई बाई बाई बाई बाई बाई बाई
देवींचे पैंजण आणले की नाही
आत्ता आणतो मग आणतो उशीर झाला
न् घडी देवींनी गोंधळ घातला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP