बायांची गाणी - कुलंबी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कुलंबी
कुणा एका दिवसी संभूदेव शिकारीला चालेला हो
हिडत फ़िरत न गेला कुलंब्याच्या सेताला हो
गेला माल्याच्या मल्याला
दे रं कुलंब्या पांच कणसा देवीचे पूजेला हो
बायाचे घटाला
कुणा एका दिवसी संभूदेव शिकारीला चालेला हो
पांच कणसासाठी संभूदेवाला फ़डफ़डा मारीला हो
फ़ोडूनी काढीला
धावत पलत तां गेला गिरजाई जवली हो
मांड्या मोडून पाठ काय दावतो गिरजाई देवीला हो
आलां गिरजाईला राग, गिरजाई
घोडेसुवार झाली हो
तसीच निघून गेली कुलंब्याच्या सेताला हो
धवला घोडा पाहून कुलंबी सेतात झोपेला हो
मल्यात लपला
चारी कोपरे शेधूनी कुलंबी शोधूनी काढीला हो
कुलंबी सेंडीला धरीला हो फ़डफ़डा मारीला हो
फ़ोडूनी काढीला
कुणबी
कोणे एके दिवशी शंभूदेव शिकारीला निघाला हो
फ़िरताफ़िरता गेला तो कुणब्याचा शेताला हो
गेला माळ्याच्या मळ्याला
दे रे कुणब्या पाच कणसे देवीच्या पूजेला हो
देवीच्या घटाला
कुणी एके दिवशी शंभूदेव शिकारीला निघाला हो
पाच कणसांसाठी शंभूदेवाला फ़डफ़ाडा मारले हो
कुणब्याने फ़ोडुन काढले
धावतपळत गेला शंभुदेव गिरजाईजवळी हो
मांड्या मोडून बसला आणि दाखवली पाठ गिरजाई देवीला हो
आला गिरजाईला राग, गिरजाई
घोड्यावर स्वार झाली हो
थेट निघून गेली तशीच कुणब्याच्या शेताला हो
शुभ्र घोडा पाहून कुणबी शेतात आडवा झाला हो
मळ्यात लपला
चारी कोपरे शोधून कुणबी शोधून काढला हो
शेंडीला धरून त्याला फ़डफ़डा मारले हो
फ़ोडून काढले
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP