बायांची गाणी - ढोलारा करारेला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
ढोलारा करारेला
बायांचा ढोलारा ढोलारा करारेला
तुम्ही निंबारा निंबारा म्हनता
पाला नाही त्या निंबार्याला
आमच्या बाया ग सतवानी
आमच्या देवी ग सतवानी
पाला आला त्या आला निंबार्याला
बायांचा ढोलारा ढोलारा करारेला
तुम्ही चाफ़या चाफ़या म्हनता
पाला नाही त्या चाफ़याला
आमच्या बाया ग सतवानी
आमच्या देवी ग सतवानी
फ़ुलां आली त्या आली चाफ़याला
बायांचा ढोलारा ढोलारा करारेला
तुम्ही विखरां विखरां म्हनता
पाला नाही त्या विखरांला
आमच्या बाया ग सतवानी
आमच्या देवी ग सतवानी
बोंडा आली त्या आली विखरांला
बायांचा ढोलारा ढोलारा करारेला
तुम्ही नारल नारल म्हनता
पाला नाही त्या नारलीला
आमच्या बाया ग सतवानी
आमच्या देवी ग सतवानी
नारल आली त्या नारलीला
(विखरा-एक गोल आकाराचे काटेरी बोंड/फ़्ळ. त्याच्या काट्यांना चाफ़्याची पांढरी टोचून पूजेसाठी मांडान मांडतात.)
ढोला कडाडतो
देवींसाठी ढोल कडाडतो आहे
देवींच्या पूजेसाठी तुम्ही कडूलिंबाचा पाला मागता,
पण कडूलिंबाला पालाच नाही!
आमच्या देवी सत्त्वशील आहेत
त्यांच्या सत्त्वाने कडूलिंबाला पालवी फ़ुटली
देवींसाठी ढोल कडाडतो आहे
देवींच्या पूजेसाठी तुम्ही चफ़्याची फ़ुले मागता,
पण चाफ़्याला फ़ुलेच नाही!
आमच्या देवी सत्त्वशील आहेत
त्यांच्या सत्त्वाने चाफ़्याला फ़ुले आली
देवींसाठी ढोल कडाडतो आहे
देवींच्या पूजेसाठी तुम्ही कडूलिंबाचा पाला मागता,
पण कडूलिंबाला पालाच नाही!
आमच्या देवी सत्त्वशील आहेत
त्यांच्या सत्त्वाने विखराला बोंडे आली
देवींसाठी ढोल कडाडतो आहे
देवींच्या पूजेसाठी तुम्ही नारळ पाहिजे म्हणता,
पण नार्ळच नाही!
आमच्या देवी सत्त्वशील आहेत
त्यांच्या सत्त्वाने माडाला नारळ लागले.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP