बायांचा गण
पहिला गण मी नमू कोणाला
धनतरी मातेला
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
दुसरा गण मी नमू कोणाला
गावतरी मातेला
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
तिसरा गण मी नमू कोणाला
गावदेवी मातेला
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
चवथा गण मी नमू कोणाला
मारूती देवाला
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
पाचवा गण मी नमू कोणाला
चेडोबा देवाला
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
सहावा गण मी नमू कोणाला
वाघोबा देवाला
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
सातवा गण मी नमू कोणाला
साती आसरांना
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
आठवा गण मी नमू कोणाला
आठव्या गवल्याल
शेंदूराचा टिला, मुकुट माथ्याला
(आठवा गवळी-कृष्ण)
देवींचा गण
पहिला गण, नमन करू कोणाचे
धनतरी मातेचे....
शेंदूराचा टिळा, तिच्या मुकुट माथ्याला
दुसरा गण, नमन करू कोणाचे
गावतरी मातेचे....
शेंदूराचा टिळा, तिच्या मुकुट माथ्याला
तिसरा गण, नमन करू कोणाचे
गावदेवी मातेचे....
शेंदूराचा टिळा, तिच्या मुकुट माथ्याला
चवथा गण, नमन करू कोणाचे
मारूती देवाचे....
शेंदूराचा टिळा, त्याच्या मुकुट माथ्याला
पाचवा गण, नमन करू कोणाचे
चेडोबा देवाचे....
शेंदूराचा टिळा, त्याच्या मुकुट माथ्याला
सहावा गण, नमन करू कोणाचे
वाघोबा देवाचे....
शेंदूराचा टिळा, त्याच्या मुकुट माथ्याला
सातव गण, नमन करू कोणाचे
सात अप्सरांचे....
शेंदूराचा टिळा, त्यांच्या मुकुट माथ्याला
आठवा गण, नमन करू कोणाचे
आठव्या गवळ्याचे....
शेंदूराचा टिळा, त्याच्या मुकुट माथ्याला