ब्रह्म जाणायाची इच्छा आहे तरी तुचि पाहे आपणाते ॥१॥ अपणाशी बरे वोळखेसी जेव्हा ॥ सर्वग तेव्हा तुचि होसी ॥२॥ म्या ब्रह्म व्हावे असी इच्छा कवणासी ॥ ते चि अविनाशी ब्रह्म जाण ॥३॥ जाण निजरूप या देहावेगळे ॥ जरि हा केवळ आत्म्याविण ॥४॥ जाण निज आत्त्मा ब्रह्म ते आपण ॥ पाहे हे चि खूण तुझीच तु ॥५॥ तुचि सांग तुझे निजरूप कोण ॥ आपल्या आपण विचारूनि ॥६॥ विचारूनि देह मी जरि म्हणशी ॥ स्वप्नीहि देखशी देह जैसा ॥७॥ जैसा स्वप्नदेह तु नव्हेशि सहसा ॥ जाण निजरूपा या देहा वेगळे ॥ जड हा केवल आत्म्याविण ॥९॥ आत्म्याविण देह शव दीसताहे ॥ प्राण तोची नव्हे निजआत्मा ॥१०॥ नसे ज्ञान प्राणाविण चिंतन ॥ तेही तूझे मन नव्हे आत्मा ॥११॥ आत्मा प्राण तरी विषयाचे ध्यान ॥ मी तू जैसे ज्ञान प्राणा नसे ॥१२॥ आत्मा नव्हे मन विषयाचे ध्यान ॥ उरे तेही मन सुषुत्पासी ॥१३॥ सुषुत्पीस काही नाहीच प्रचीती ॥ त्याही शुन्याप्रति जाणसी तू ॥१४॥ जाणसी तू ते काहीच न कळने ॥ जागृती ते जाण तोचि आत्मा ॥१५॥ आत्मा तु वोळख मनोमय कोशी ॥ आता उपदेश देयी चित्त ॥१६॥ चित्त बुद्धि मन चौथा अहंकार ॥ मायाची निर्धार स्वरूपाची ॥१७॥ स्वरूपाचा थारा चहुमाजी जेथे ॥ वाटे तुज निज पाहे ॥१८॥ पाहा ते पाहाणे आपणची आहे ॥ ते चि ब्रह्म पाहे सर्वदेहि ॥१९॥ देहि जे जे आहे ते ते हे चि पाह ॥ पाहाता तो आहे वेगळाची ॥२०॥ वेगळेची आधी हे तत्व जाणावे ॥ मग ते पाहावे सर्वां ठाई ॥२१॥ सर्वा ठायी देह इद्रियाते ॥ तेचि वर्तवीते असे पाहे ॥२२॥ पाहे हे ची सत्य सर्वत्र जाण ॥ आसत्य हे सर्व मृगजळ हो पाहाता जैसे सूर्यकिरण ॥ विश्र्व तैसे जाण सर्व ब्रह्म ॥२४॥ सर्व ब्रह्म पाहे वामनस्वरूपी ॥ त्रिविक्रमरूपी विश्र्वरूप ॥२५॥ इति श्रीवामनकृत ब्रह्मज्ञाननिरूपणं नाम समाप्तः ॥ विश्र्वेश्र्वरापणमस्तु ॥ शुभंभवतु । श्रीगंगादेव्यारपणमस्तु ॥
संमत १८८७ शके १७५३ प्लवनाम संवत्सरे वैशाखे माशे शुक्लपक्षे द्वादसि त्रितिय प्रहरे समाप्तः ॥ लिखितं स्वार्थ परार्थ वसुदेव हारि थिटे लेखक पाठकयोः शुभंभवतु ॥
याद्रिशं पुस्तकं दृष्ठा तादृशं लिखितं मया यादि शुद्धमशुद्धं वा मम दोषो न विद्यते ॥
॥ श्रीसार्बापणमस्तु ॥ ॥ श्री ॥