विवेकसार - तृतीय वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


आत्मानात्मविवेक प्रकरण

॥ श्रीसद्गुरु समर्थ ॥

चेतनाचेतने एव श्रुतौ सम्यक्समर्थिते ।

ते द्वये मयाभिरच्येते भाषया श्रृण्वतामिह ॥

प्रपंच जो तो किती पदार्थ म्हणून विचारितों । कैसे विचार करितां म्हणाल तरि । आत्मा म्हणून । प्रपंच जो तो दोनि पदार्थ ॥ यामध्यें आत्मा प्रपंचातीत कीं । तरि प्रपंचातीत ऐसा जो आत्मा यास प्रपंचांतःपातित्व ऐसें बोलूं ये काय । म्हणाल । तरि बोलूये ॥ ते कैसे म्हणाल तरि प्रपंच चेतनाचेतनात्मक होत्साता दिसतो । यास्तव प्रपंचातीत जो आत्मा यास प्रपंचांतःपातित्व ऐसें बोलूं ये ॥ कां म्हणाल तरि आत्मा म्हणजे चेतन कीं । चेतन ऐसा जो आत्मा प्रपंचासि मिळेना तरि प्रपंच चेतनाचेतनात्मक दिसेना ॥ यास्तव प्रपंचातीतही आत्मा प्रपंचांतःपाती ऐसें बोलूं ये ॥ ऐसें जरि जालें तिर प्रपंचांमध्ये चेतन कोणतें अचेतन कोणतें म्हणाल तरि ॥ चालायाचें रांगायाचें उडायाचें ऐसें जे तें चेतन । पृथ्वी उदक वृक्षादिक जें तें अचेतन । नव्हे हो प्रपंच जो तो अनेक पदार्थरूपें दिसतांहि दोनि पदार्थ म्हणून केसें बोलावें म्हणाल तरि बोलूं ये । तें कैसें बोलूं ये म्हणाल तरि प्रपंच जो तो आत्मा म्हणून अनात्मा म्हणून दोनि पदार्थ । तो अनात्मा पदार्थ एकच कार्यरूप परिणामातें पाऊन अनेक पदार्थ जाला । त्यास मिळून आत्मा अनेकासारिखा दिसतो ॥ त्सा अनात्मासीं मिळून दिसणार जो आत्मा तो किती प्रकारें करून दिसतो म्हणाल तरि । जीव म्हणून ईश्र्वर म्हणून दों प्रकारें दिसतो ॥ जे जीवेश्र्वर तेही कित्यांप्रकारें दिसताहेत म्हणाल तरि । जीव ही अनेक प्रकारें दिसतो । ईश्र्वरही अनेक प्रकारें दिसतो । तरि जीव अनेक प्रकारे दिसला तरि दिसो परंतु एक ईश्र्वर तो अनेकविध कैसा दिसेल म्हणाल तरि दिसतचि आहे । ते कैसें म्हणाल तरि । पुण्यक्षेत्र जे त्यांचे ठाई पुरे जें त्यांचे ठाई ग्रामें जें त्यांचे ठाई घरोघर ईश्र्वर जो तो अनेक प्रकारें दिसतो । तेथें दिसायचीं अवघीं मृत्तिका शिला दारु ताम्र यांचे प्रतिमादिक दिसताहेत । ईश्र्वर दिसतो म्हणून कैसे बोलावें म्हणाल तरि बोलूं ये । ते कैसे म्हणाल तरि । ते मृत्तिका दारु ताम्र प्रतिमादिक जें तें यांच्याठाईं अवघियांसही ईश्र्वररत्व बुद्धीच आहेत । परंतु प्रतिमादिबुद्धि सर्वात्मना नाहीं । त्याचे ठांई प्रतिमादिबुद्धि असोन ईश्र्वरत्वबुद्धि नसती तरि पूजा अभिषेक उत्सवादिकांकारणें लक्षावधि द्रव्य कां वेचितील । वेचित तों आहेत । याकरितां अवघियांसही या प्रतिमादिकांचे ठांई ईश्र्वरत्वबुद्धि घेऊं ये । देहेंद्रियादिक हेय पदार्थ होय काय म्हणाल तरि होयेत । तें कैसें म्हणाल तरि । शुक्रशोणितापासून उत्पन्न झाले आहेत म्हणून मळमूत्रपुरीषामध्ये निर्माण जाले आहेत म्हणून स्रक्चंदनादिकेंकरून त्या शरीरादिकांस सुगंध संपादुं म्हटिले तरि शरीरादिकांचे स्पर्शेकरून स्रकचंदादिक दुर्गंध आणि हेय होउन जात आहेत । शरीर मृत जालें तरि जे वांचले आहेत त्सांस अर्थनाश शरीरक्लेश करवित आहे म्हणून हें शरीर अत्यन्त हेय पदार्थंच संदेह नाहीं । सांगितले जे हे अवघे दोष त्य ताम्र प्रतिमादिकाचे ठाई नाहीत म्हणून त्या ताम्रप्रतिमादिकांचे ठांई समर्पिलें गंधपुष्पादिक दुसरियास प्रसादरूपेंकरून कृतार्थ करिताहेत म्हणून । त्या ताम्रप्रतिमादिकांस एखादिया अंगहीनत्वेंकरून हानि जाली तऱ्हीं परंतु उपकारासच येत आहे म्हणून ताम्रप्रतिमादिकांचे ठांई ईश्र्वरत्वबुद्धि यावयाचें उचितच । तरि एक अनात्म पदार्थ जो तो कार्यरूपेंकरून परिणामातें पाऊन अनेकरूपें दिसतो । तेणेंसी मिळोन आणिक एक पदार्थ अनेक होऊन दिसावयाविषई दृष्टांत आहे काय म्हणाल तरि आहे । तो कैसा म्हणाल तरि । एक पृथ्वी कार्यरूपें परिणामातें पाऊन पर्वत वृक्ष वन प्राकार गोपुर मण्डप गृह कुड्य कुसूल घट शरावादिरूपेंकरून पृथ्वी दिसते त्यासी मिळून घटाकाश म्हणून मठाकाश म्हणून वृक्षाकाश म्ह . वनाकाश म्ह . गोपुराकाश म्ह . मंडपाकाश म्ह . गृहाकाश म्ह . कुसूलाकाश म्ह . जैसं दिसतें तैसें कार्यरूपेंकरून परिणामातें पावला ऐसा जो अनात्म पदार्थ जो तेणेंसी मिळोन आत्माही देवदत्त यज्ञदत्त रामकृष्ण गोविंद म्हणून अनेकरूप दिसतो ॥ हो जो पृथ्व्याकाश दृष्टान्त जो तो अवछिन्नपक्ष विषईं । प्रतिबिंबपक्षविषई दृष्टांत बोलतों । ते कैसें म्हणाल तरि एकच उदक उपाधिवशास्तव सरोवर म्हणून नदी म्ह . तळें म्ह . विहीर म्ह . आड म्ह . भांडोदक म्ह . बोलिजेते या इतकियां उदकांमध्यें सूर्य जो तो एकच प्रतिबिंबोन जैसें अनेकविधें भासतो तैसेंच आत्माहि अनात्मकार्य ऐसें जें अंतःकरण जे त्याचे ठाई प्रतिबिंबून अनेकरूप दिसतो । ऐसिया प्रकारें दिसला जण्हि अनात्मकार्य जें अंतःकरणादिक याचे धर्म जे ते आत्मा जो यास काळत्रयींहि स्पर्शत नाहींत । तें कैसें म्हणाल तरि बोलूं । या जळाचे ठाई आहेत जे शैत्य चलनादिक विकार जे ते त्या जळामध्यें प्रतिबिंबला जो प्रतिबिंब त्यास जैसे विकार स्पर्शत नाहीत । तैसेच अंतःकरणाचे ठांई प्रतिबिंबला जो जीव त्यास स्पर्शुं शकत नाहींत । त्या अंतःकरणास अधिष्ठान ऐसा प्रत्यगात्मा त्यास स्पर्शू शकत नाहीत म्हणून काय बोलावें लागतें । इतकेंच नव्हे । जैसे पृथ्वीविकार जे ते पृथ्वीस आधार जें आकाश त्यास जैसें स्पर्शुं शकत नाहींत । तैसें अनात्मस्वरूप अज्ञान जें तें अज्ञान कार्य देहेंद्रियादिक याचे धर्म जेते अज्ञानास अज्ञानकार्य देहेंद्रिक जें यास आधार प्रत्यगात्मा जो यास स्पर्शु शकत नाहींत । या प्रकारेंकरून आत्मानात्मविवेक । तो आत्मस्वरूप मीच म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत अवघे बोलताहेत । याअर्थी संशय नाहीं हा निश्र्चय ॥

श्र्लोकः ——

आत्मानात्म विवेकन पुंसः संसार निर्वृतिः

तद्विना जन्मकोट्यापि बंधच्छेदो न सिध्यति ॥

॥ इति श्री मनन ग्रंथे तृतीय वर्णकं समाप्तम ॥

श्रीरामचंद्रार्पणमस्तु । सहजानंदचरणाविंदार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP