अथ समष्टि व्यष्टि निरूपण प्रकरणम्
श्रीगुरु सदाशिवाय नमः ।
आत्मानात्म विवेकन मुनिर्मुच्येत बंधनात् ।
स आत्मा कीद्दशः को वानात्मावेत्यत्रचिन्त्यते ॥१॥
आत्मानात्म विवेक जो तोचि जीव आणि ईश्र्वर त्याचे ऐक्य ॥ आत्मानात्म विवेककरूनच ज्ञान जे ते उत्पन्न होते म्हणुन बोलिलो ॥ यकरिता तो आत्मानात्म जे त्याते विचारु ॥ आत्मा म्हणिजे कोणता म्हणाल तरि शरीरत्रयविलक्षण होत्साता अवस्थात्रयसाक्षी होत्साता पंचकोशव्यतिरिक्त होत्साता सच्चिदानंदस्वरूप जो तो आत्मा म्हणुन बोलिलो ॥ अनात्मा म्हणिजे कोणता म्हणाल तरि समष्टिव्यष्ट्यात्मक शरीरत्रय जे ते अनात्मा म्हणून बोलिजे ते ॥ अनात्म्याचे लक्षण कोणते म्हणाल तरि अनृतजडदुःखरूप समाष्टिव्यष्टि म्हणिजे काय म्हणाल तरि महाजन आणिवन आणि ग्राम हे जैसे तैसी समष्टि ॥ पुरुष वृक्ष आणि ग्रह हे व्यष्टि यासारिखे अनेक पदार्थ मिळोन समष्टि ॥ येकच पदार्थ व्यष्टि म्हणुन जे बोलिले तैसे समस्त प्राणियाची शरीरे जे ते समष्टि ॥ येकेक प्राणियाचे येकेक शरीर जे ते व्यष्टि म्हणुन जाणावे ॥ ते शरीर जे ते स्थूळ सूक्ष्म कारण ती प्रकारची या शरीरामध्ये समस्त प्राणियाची स्थूळशरीरे समष्टिस्थूलशरीर ॥ समस्तप्राणियाची सूक्ष्मशरीरे समष्टिसूक्ष्मशरीर ॥ समस्तप्राणियाची कारणशरीरे जेते समष्टिकारणशरीर ॥ हे समष्टिलक्षण ॥ येक येक प्राण्याचेय येक येक स्थूलशरीर व्यष्टिस्थूळशरीर ॥ येक येक प्राण्याचे येक येक सूक्ष्मशरीर व्यष्टिसूक्ष्मशरीर ॥ येक येक प्राणियाचे येक येक कारण शरीर जे ते व्यष्टिकारणशरीर ॥ याप्रकारे व्यष्टिचे लक्षण ॥ याप्रकारे समष्टि व्यष्टि म्हणुन काशास बोलावे म्हणाल तरि आत्म्यास ईश्र्वरत्व जीवत्वानिमित्य बोलावे ॥ ईश्र्वरत्व जीवत्व या निमित्तेकरून याउपरि घडेल काय म्हणाल तरि हे ईश्र्वरत्व जे ते उपाधीकरून अनादिच आहेत ॥ ऐसे जरि जाले तरी हे ईश्र्वरत्वजीवत्व जे ते उपाधीनिमित्तेकरून जाले म्हणुन नेणेत ॥ तरि कैसे जाले म्हणुन जाणताहेत ऐसे म्हणाल तरी हे ईश्र्वरत्वजीवत्व जे ते वास्तव म्हणुन जाणताहेत ॥ ऐसे जाणता दोष काय म्हणाल रि जववरि याप्रकारे वास्तव म्हणुन जाणताहेत तव वरि संसारापासुन निवृत्ति घडेना ॥ म्हणून सर्वप्रजामातृभूत ॥ ऐसी श्रुति जे ते ईश्र्वरत्व ते उपाधीकरूनच घडते ॥ म्हणून या प्रकारे समाष्टिम्हणुन बोलते ॥ ऐसे जरि कोण्या उपाधीकरून ईश्र्वरत्व जीवत्व घडते म्हणाल तरी समष्टिशरीत्रयोपाधीकरून ईश्र्वरत्व व्यष्टि शरीरत्रयउपाधीकरून जीवत्व जे ते घडते ॥ या ईश्र्वरास समाष्टिकारणशरीरमात्र पुरेना माय म्हणाल तरी पुरे ॥ तथापि उपासनेनिमित्त समष्टिस्थूलसूक्ष्मशरीर बोलिजे ते ॥ ते कैसे म्हणाल तरी मुख्याधिकारी जो त्यास समष्टिकारणशरीरोपाधिक आत्मा जो तो उपास्य म्हणुन बोलिजेतो यासच ईश्र्वर आणि अंतर्यामी अध्याकृत याप्रकारे तीनि नामे ॥ यासि समष्टिकारणशरीरचेठाइ अभिमानआहे की नाही म्हणाल तरि अभिमान अहंकारधर्म म्हणुन त्या अवस्थेचेठाइ अहंकार नाही ॥ यास्तव अभिमान आहे म्हणता नये ॥ तरि कैसे म्हणाल तरि आत्म्यास समष्टिकारणशरीर विशिष्टमात्रत्व जे ते ईश्र्वरत्व म्हणुन बोलावे ॥ या ईश्र्वराचि उपासना न करू सकेत जे त्यास अवस्थांतराते पावलाव समष्टिसूक्ष्मशरीरोपाधिक जो त्याते उपासावे म्हणुन श्रुति बोलते ॥ यास हिरण्यगर्भ सूत्रात्मा प्राण म्हणूनि तीनि नामे ॥ या समिष्टसूक्ष्मशरीरचेठाई अभिमान आहे कि नाही म्हणाल तरि अभिमानास आश्रय ऐसे स्थूलशरीर नाही म्हणुन अभिमान नाही ॥ तरि कैसे म्हणाल तरि समष्टिसूक्ष्मशरीरविशिष्टमात्रत्वच हिरण्यगर्भत्व बोलावे ॥ याचेही उपासनेचे ठाइ असमर्थ जे त्यास अवस्थांतरेते पावला समष्टिस्थूलशरीरोपाधिक जो ईश्र्वर तो उपासावा म्हणुन श्रुति बोलते ॥ यास विराट वैश्र्वानर तीनि नामे ॥ यास मष्टिस्थूळशरीराचेठाई अभिमान आहे किंवा नाही म्हणाल तरि नियमेकरून येकही शरीर नाही म्हणुन अभिमान आहे म्हणुन बोलता नये ॥ तरि कैसे म्हणाल तरि समष्टिस्थूळशरीरविशिष्टमात्रत्वच ईश्र्वरत्व म्हणून बोलावे ॥ हा अंतर्यामी ईश्र्वर जो तोच सात्विक राजस तामस गुणातें अवलंबून सृष्टि स्थिति संहाकर्ता होत्साता ब्रह्मा विष्णु रुद्र म्हणुन बोलिजेतो ॥ आणि दुष्ट निग्रह सृष्टीपरिपालणाकारणे रामकृष्णादिअवतार जेव्हां घेतो तेव्हा त्या ईश्र्वरास त्या त्या शरीरचेठाई स्रष्टृत्वाद्यभिमान आहे ॥ तो तो अभिमान नाही म्हणून बोलू म्हटिले तरि सृष्टिस्थितिसंहार जे ते घडेना तयाकरिता अभिमान आहे म्हणुन बोलावे ॥ ऐसे जरि जाले तरि या ईश्र्वरास जीवास विलक्षणता कोणती म्हणाल ॥ तरी अहंता ममतापूर्वक जीवास स्वशरीराचेठाई अभिमान आहे ॥ ऐसा अभिमान ईश्र्वरास नाही तरि काय म्हणाल तरि लोकरक्षणार्थ मात्रच अभिमान ॥ म्हणुन जीवास ईश्र्वरास ऐसी विलक्षणता आहे ॥ ईश्र्वरच प्रतिमादिकाचेठाइ उपास्य म्हणून बोलिजेते ॥ ऐसे का बोलावे म्हणाल तरि विराटउपासनेचेठाई अनधीकारि जे त्यासी त्रिमूर्तिचि उपासना करावी म्हणून बोलिले ॥ त्या त्रिमूर्तिचे उपासनेचेठाई अनधिकारी त्यास रामकृष्णाद्यवतारादिकाची उपासना करावी म्हणून त्याहि अवतारादिकाचे उपासनेचे ठाई अनधिकारी त्यास त्या त्या अवताराच्या सूचकाऐश्या ताम्रादिकाच्या प्रतिमा ज्याते उपासावे म्हणुन शास्त्र बोलते ॥ सर्व जनही त्या मूर्तिची उपासना करिताहेत त्या त्या मूर्तिद्वारा अंतर्यामीच उपासिजेतो यामूर्तीची उपासना करावी म्हणुन बोलणार जे शास्त्र त्याचे तात्पर्य काय म्हणाल तरि द्वाराद्वारा अंतर्यामीस्वरूप जाणावे ॥ म्हणुन तात्पर्य या प्रकारे समष्टिशरीत्रयोपाधिचेतनआत्मा जो त्यास ईश्र्वरत्व आले ॥ जीवत्व काशावरून आले म्हणाल तरि व्यष्टिशरीरत्रयोपाधिकरून आले ॥ जीवत्वास शरीरत्रय पाहिजे काय म्हणाल तरि पाहिजे ते कैसे म्हणाल तरि जीव जो तो अंतःकरणप्रतिबिंब म्हणून जीवत्वाचे ठाई सूक्ष्मशरीर पाहिजे ॥
स्थूळशरीर नाही तरी जीवत्व घडेना म्हणून स्थूळशरीर पाहिजे ॥ हे स्थूळसूक्ष्म कार्यरूप ऐसी जे शरीरे जे ते कारण सोडु राहु न शकेच ॥ म्हणुन या दोहीस कारण ऐसे कारणशरीर तेही पाहिजे ॥ याकरिता जीवत्वाचेठाइही शरीरत्रय पाहिजे ॥ या जीवास शरीरत्रयाचेठाई अभिमान आहे किंवा नाही म्हणाल तरि अभिमान नाही तरी कर्तृत्वादिक घडेना । म्हणुन शरीत्रयाचेठाई अभिमान आहे ॥ ऐसे जरि जाले जीव किती म्हणाल तरि तिघेजण ॥ याची नाम कोणती म्हणाल तरि सांगु ॥ जाग्रदावस्थेचेठाई व्यष्टिस्थूळशरीरचेठाई अभिमान धरणार जो जीव त्याचि नामे विश्र्व व्यवहारिक चिदाभास म्हणुनि तीनि नामे ॥ जो जीव त्याचि नामे विश्र्व व्यवहारिक चिदाभास म्हणुनि तीनि नामे ॥ स्वप्नावस्थेचेठाई व्यष्टिसूक्ष्मशरीराचेठाई अभिमान धरणार जो जीव त्याची नामे तैजस प्रतिभासिक स्वप्नप्रकल्पित हे तिनि नामे ॥ सुषुप्तिअवस्थेचेठाई व्यष्टिकारणशरीराचे ठाई अभिमान धरणार जो जीव याची नामे प्राज्ञ परमार्थिक अवछिन्न तीनिनामे ॥ याप्रकारे आत्म्यास समष्टिशरीरत्रयोपाधिकरून ईश्र्वरत्व ॥ आणि व्यष्टिशरीरत्रयोपाधिकरून जीवत्व आले म्हणुन बोलिले ॥ येकाच आत्म्यास जीवत्व ईश्र्वरत्व घडेल काय म्हणाल तरि घडते ॥ ते कैसे म्हणाल तरि देवदत्तास पुत्रापेक्षेकरून पितृत्व आणि पौत्रापेक्षेकरून पितामहत्व जैसे आले ॥ तैसेच येकच आत्मा जो त्यास व्यष्टिउपाधिचे अपेक्षेकरून जीवत्व ॥ समष्टिउपाधिचे अपेक्षेकरून ईश्र्वरत्व येउये ॥ या पितृपितामहत्वाचे ठाई किंचिज्ञत्व सर्वज्ञत्व दिसेना कि ॥ जीवत्व ईश्र्वरत्वादिकाचेठाई किंचिज्ञत्व सर्वज्ञत्वादिक दिसते की हो ॥ देवदत्तदृष्टांत कैसा घडेल म्हणाल तरि येका आत्म्यास उपाधिद्वयेकरून ईश्र्वरत्व जीवत्व येउये म्हणायाविषई हा देवदत्तदृष्टांत सांगितला ॥ आता आत्म्यास महदुपाधि किंचिदुपाधि येहीकरून सर्वज्ञत्व किंचिज्ञत्व येउये ह्मणावयाविषई दृष्टांतांतर बोलुये ॥ येकच उदक जे त्यास महदुपाधि ऐसे जे तळे तणे करून अनेक गावे पीक करावयाची शक्ति ॥ अल्पोपाधि ऐसा जो घट तेणेकरून पाकक्रिया मात्र करावयाची शक्ति ॥ अल्पोपाधि ऐसा जो घट तेणेकरून पाकक्रिया मात्र करावयाची शक्ति जैसि आहे ॥ दुसरा दृष्टांत येका अग्निस मोठा काकडा जो तेणेसी मिळुन अनेक पदार्थ भासावयाची शक्ति आणि लहान वातिसीमिळुन अल्प जवळील पदार्थ भासावयाची शक्ति जैसी आहे ॥ तैसीच आत्म्यास मोठी समष्टिशरीरोपाधी जे तीनेकरून सर्वज्ञत्वादिकशक्ति स्वल्पव्यष्टि शरीरोपाधी जे तीणेकरून किंचिज्ञत्वादिकशक्ति घडुं ये ॥ याप्रकारे जीवत्व आणि ईश्र्वरत्व उपाधीकरून आले ॥ परमार्थता जीवेश्र्वरास अभेद म्हणून श्रुति बोलताहेत ॥ विरूध्धधर्मास मिळाले जे जीवेश्र्वर यास अभेद कैसे म्हणाल तरि ॥ पूर्वोक्त दृष्टांताचेठाई विरुध्ध धर्मेकरून युक्त तळे ऐसे जे उपाधि तेणेसी मिळाले उदक व घटरूप उपाधीसी मिळालें जें उदक जें त्यास ऐक्य घडेना म्हणुन विरूद्धांश तळे आणि घट म्हणायाची उपाधी सोडुन अविरूद्ध जे जलत्व तेणेंकरून येकत्व जैसे येते ॥ विरूद्धधर्मास युक्त मोठा काकडा तेणेसि मिळाला जो अग्नि लाहान्या वातिसी मिळाला जो अग्नि या दोहिसी विरूद्ध मोठा काकडा लहान वाति या दोन्ही उपाधि टाकुन अग्नित्व मात्रककरून येकत्वज्ञान जैसे घडते ॥ तैसे विरूद्धधर्म जे सर्वज्ञत्व त्यासी मिळाला जो आत्मा त्यासी विरूद्धधर्म किंचिज्ञत्व तेणेकरून आले जें जीवत्व तैसेच सर्वज्ञत्व तेणेकरून आले जे ईश्र्वरत्व हे दोन्ही समष्टिव्यष्टिधर्म टाकुन अविरूद्धचैतन्यमात्र जो आत्मा याचे येकत्व ज्ञान घडतच आहे ॥ हा अर्थ सकळवेदांतशास्त्राचेठाइही सोयंदेवदत्त म्हणायाचे दृष्टांतपूर्वक महावाक्यार्थ जहत्अजहत्जहदजहल्ललक्षणेकरून बोलिजेत आहे ॥ या प्रकारे विचारून मीच ईश्र्वरस्वरूप निरूपाधिक म्हणुन जो जाणतो तोच मुक्त म्हणुन वेदांतसिद्धांत सहस्र समष्टिव्यष्टिरूपोयः सतुजाड्यादिलक्षणः ॥
जीवेशयोरूपाधिश्र्चा नात्मासम्यग्विवेचितः ॥१॥ समष्टिव्यष्टयुपाधिभ्या जीवईश्र्वरइत्यपि ॥ भिन्नवद्भातियः ॥१॥ समष्टिव्यष्टिव्यष्टयुपाधिभ्यां जीवईश्र्वरइत्यपि ॥
भिन्नवद्भातियः सोयमात्माभिन्नश्र्च वस्तुतः ॥२॥ मथि जीवत्वमीशत्वं कल्पितं वस्तुतो नहि ॥ इति यस्तुविजानति स मुक्तो नात्र संशयः इतिश्रीमननग्रंथे
समष्टिव्याष्टिनिरूपणत्वंसप्तमवर्णकं ॥७॥