विवेकसार - पंचदश वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥ देहत्रय विवरणम् ॥

॥श्रीगणेशाय नमः॥

मार्तामह महाशैलं महस्तदपितामहम् ।

जगतः कारणं वन्देकण्ठादुपरिवारणम् ॥१॥

प्राण्यास किती शरीरें म्हणून विचार करितों ॥ या विचारास प्रसक्ति काय प्रयोजन काय म्हणाल तरि ॥ बोलूं ॥ स्थूळशरीरमात्र अवघियांसही प्रत्यक्षेंकरून आत्मभूताहि भासते ॥ आणिखी काही भासत नाही म्हणून या विचारास प्रसक्ति आहे इतुकेच नव्हे ॥ वेदान्त्याहून व्यतिरिक्त अवघेहि जे ते इन्द्रियें भासलीं जरी प्रत्येक्षेकरून भासायाचे येक शरीरमात्रच आणिखीं शरीरें नाहींत म्हणुन बोलताहेत ॥ येणेंकरूनिही विचाराचि प्रसक्ति आहे ॥ या विचारेंकरून समस्त देहही ते देहादिनिष्टविकार जे तेही आत्म्यास काळत्रयाचेठाइंही स्पर्शु शकत नाहींत म्हणून भासते ॥ याप्रकारें भासायाचे या विचारास फळ ॥ या करितां या विचारास प्रसक्तिही प्राप्त जालें म्हणून प्राण्यास किती शरीरे म्हणून विचार करिजेतो ॥ प्राण्यास किती शरीरे म्हणाल तरि तीनि शरीरें ॥ ते कोणती म्हणाल तरि स्थूळ सूक्ष्म कारण हे तीन शरीरे ॥ स्थूळ शरीरास शरीरलक्षण आहे म्हणून स्थूळ शरीर असो ॥ सूक्ष्म कारण शरीर जे त्यास शरीरलक्षण जे तें कैसें घडतें म्हणालि तरि ॥ त्यासही शीर्यते इति शरीरं म्हणायाचें लक्षण आहे म्हणून शरीरत्व आहे ॥ हें सूक्ष्मकारण दोन्हीं शरीरें जे ते स्थूळशरीरासारिखें प्रत्यक्षेंकरून दिसत नाहीत ॥ म्हणून हें सूक्ष्म कारण दोन्ही शरीरें जें तें नाहीं ऐसे बोलुं म्हणाल तरि ॥ हे दोन्ही शरीरेंही शास्त्राचेंठाइं आहेत म्हणून प्रसित्धच बोलिली आहेत ॥ श्रेष्ठीं अंगिकार केला आहे म्हणूनही हे सूक्ष्मकारणशरीरें जें तें नाही म्हणून बोलतां नये ॥ ऐसे तरि येकेका प्राण्यास स्थूलशरीरें किती सूक्ष्मशरीरे किती कारणशरीरे किती म्हणाल तरि ॥ स्थूळ शरीरे अनंत ॥ सूक्ष्मशरीरे येकेक कारणशरीर येकेक ॥ हे तिन्ही शरीरे यासही शरीरत्व जे ते तुल्यहोउन असतां ॥ येकेका प्राण्यास स्थूळशरीरे अनंत कां व्हावी ॥ सूक्ष्म कारणशरीर येकेक कां व्हावें ॥ म्हणाल तरि बोलुं ॥ स्थूळशरीर कर्मजन्य म्हणून अनंत जाहालीं ॥ सूक्ष्मशरीर जे तें कर्मजन्य नव्हे म्हणून कारणशरीर कर्मजन्य नव्हे म्हणूनही येकेक जाहालें ॥ याप्रकारे सूक्ष्मशरीर कर्मजन्य नव्हे म्हणून कारणशरीर कर्मजन्य नव्हे म्हणून बोलिले ॥ यावरून सूक्ष्मशरीरास प्रकारांतरेंकरून जन्यत्वही कारणशरीरासशरीरत्वही कैसे घडेल म्हणुन भासते ॥ भासले तरि भासो म्हणाल तरि ॥ कारणशरीरास जन्यत्व कैसे ॥ जन्यत्व अंगिकार करणें जे तेणेंकरून शरीरत्व नाहीसें जालें ॥ नाहींसे होइल तरि हो म्हणाल तरि प्राण्यास तीनशरीरें म्हणून बोलिल्यास विरूत्ध येइल ॥ आता सूक्ष्मशरीरास प्रकारांतरेंकरून उत्पत्ति अंगिकार केलियां जीवाचें अनादित्व जातें ॥ सूक्ष्म शरीरास उत्पत्ति अंगिकार केलियानें जीवाचे अनादित्व किंन्निमित्य जाते म्हणाल तरि आत्म्याचे जीवत्व सूक्ष्मशरीर जे त्यास उत्पत्ति बोलतां जीवाचें अनादित्व भंग होतचि आहे ॥ जीवास अनादित्व सित्धिकारणें सूक्ष्मशरीरास उत्पत्तिअंगिकार न करू म्हणाल तरि सूक्ष्मशरीरास उत्पत्ति बोलणार ऐसें श्रुत्यादिक जे त्यास विरोध येतो ॥ इतकेंच नव्हे सूक्ष्मशरीरास जन्यत्व अंगिकार केलियाने सूक्ष्मशरीरास अनित्यत्व येऊन आत्म्याचे अनादित्व निरसुनि जातें ॥ याकारणास्तव श्रुत्यादिकांस अर्थसित्धि व्हाव्याकारणे ही आत्म्यास अद्वितीयत्व सित्धीकारणेंही सुक्ष्म शरीरास उत्पत्ति अंगिकार केलियानें जीवाचें अनादित्व भंग होऊन जाते ॥ हे नव्हतां लोकांचेठाइं जे जन्य होत्साते आहेत ते अवघेही कर्मजन्य ऐसें देखिलें आहेत ॥ याकारणास्तव सूक्ष्मशरीरास जन्यत्व अंगिकार करितां सुक्ष्मशरीर कर्मजन्य म्हणून अंगिकार करावें लागेल ॥ नाहींतरि दृष्टविरोधी प्राप्त होईल तरि हो म्हणाल तरि हे युक्त नव्हे ॥ हा जो विरोध जो यातें परिहार कराव्याकारणें सुक्ष्मशरीरास कर्मजन्यत्व अंगिकार केलियाने कर्मजन्य ऐसे जें स्थूळ शरीर जे यास अनेकत्व देखिलें आहे म्हणून येकयेक प्राण्याचे सुक्ष्मशरीरासही अनेकत्व आलें पाहिजे ॥ आले तरि एवो म्हणाल तरि येकेका प्राण्यास येकेक सुक्ष्म शरीर म्हणून बोलिल्यास विरोध येतो ॥ येईल तरि येवो म्हणाल तरि ॥ पूर्वी येकच म्हणून बोलून आतां अनेकत्व म्हणून बोलिल्यासही पूर्वी कर्मजन्य नव्हे म्हणून आता कर्मजन्य म्हणून बोलिल्यासही विरोध भासताहेत ॥ याप्रकारें येक दोष परिहार करूं जातां दुसरा दोष प्राप्त होतो ॥ म्हणून याविचारातें टाकुन अणखी कांही बोलु म्हणावें तरि आणखी काही बोलावया असत नाहीं ॥ म्हणून आतां सुक्ष्मशरीर कर्मजन्य ऐसें बोलिल्यांसच जिवाच्या अनादित्वासही सुक्ष्मशरीर येक म्हणाल यासही पूर्वी सुक्ष्मशरीर कर्मजन्य नव्हे म्हणून बोलिल्यासही विरोध नव्हेसारिखें पुढें निरुपितों ॥ आतां कारणशरीरास जन्यत्व न बोलुन शरीरत्व लक्षण जे त्यातें बोलतो कैसें म्हणाल तरि स्थूलसुक्ष्म शरीरें जे त्यास जन्यत्व जें त्यातें अंगिकार करून त्यास शरीरत्व अंगिकार केलें ॥ कारणशरीरास जन्यत्व अंगिकार न करितां कैसे शरीरत्व बोलिजेतें म्हणाल तरि त्यासही शीर्यत म्हणायाचें शरीरलक्षण आहे म्हणून शरीरत्व जें तें बोलूंये ॥ ऐसें तरि अनादि ऐसीजे वस्तु जे तीसि नाश आहे काय म्हणाल तरि आहे कैसें म्हणाल तरि बोलूं ॥ घटादिकाचा प्रागभाव जो तो अनादि होउन असिला जरी त्या घटादिकाच्या उत्पत्तीकरून नाश जैसा आहे प्रकृतिपुरुष संयोग जो तो अनादि होउन असिला जरीं त्या प्रकृतिपुरुषाचे विवेकेकरून त्या संयोगास नाश जैसा येतो तैसेंच अनादि ऐसें जें अज्ञान म्हणायाचें कारण शरीर जे त्यासही ब्रह्मात्म्यैक्यत्वज्ञान जे तेणेकरून नाश येउंये म्हणून त्यास शरीरत्व अंगिकारायाचें विरूत्ध नाहीं ॥ याच प्रकारें सुक्ष्मशरीरास उत्पत्ति अंगिकार केलियानें येकही विरोध नाहीं कैसा नाही म्हणाल तरि सुक्ष्मशरीरास उत्पत्ति अंगिकार केला आहे म्हणुनि त्यासही उत्पत्ति जे तीतें बोलनार ऐशा ज्या श्रुत्या त्यास विरोध नाहीं ते सुक्ष्मशरीर जे तें आत्मकार्य होत्साते आहे म्हणून कारण ऐसा जो आत्मा याहुन व्यतिरिक्तत्वें करून नाहीं म्हणून आत्म्याच्या अद्वैतत्वास हाणिही नाहीं प्रळयकाळाचेठाइंही सुक्ष्मशरीर कारणात्मना आहे म्हणून ते सुक्ष्मशरीर उपाधीक ऐसा जो जीव संस्कार तोही आहे याकारणास्तव जीवाचे अनादित्व भंगही नाहीं ॥ ऐसे तरि याप्रकारें सुक्ष्मशरीर जे तें प्रळयाचेंठाइं आहे ॥ तरि त्यास उत्पत्ति बोलता नये ॥ ते कैसें बोलता नये म्हणाल तरि लोकांचेठाइं मृदादिकाचेठाइं नाहीं तेथ घटादिक जे त्याची उत्पत्ति देखिली आहे ॥ विद्यमान जे मृदादिक त्याची उत्पत्ति देखिली नाहीं म्हणून बोलाल तरि तैसें बोलतां नये ॥ ते कैसे बोलता नये म्हणाल तरि बोलूं ॥ नाहीं ते वस्तु म्हणतां असत् त्या असतास उत्पत्ति बोलतां शशविषणादिकातेंही उत्पन्न जालें पाहिजे ते उत्पन्न होत नाहीत म्हणून असदास उत्पत्ति बोलतां नये आणिखीं कैसें म्हणाल तरि आहे ते वस्तु सत् तीसच उत्पत्ति बोलावी ॥ म्हणायाचें लोकिकीं देखिलें आहे ते कैसें म्हणाल तरि घट करावा म्हणून प्रवर्तणार जो पुरुष मृत्तिकाच घेऊन येतो वस्त्र विणावें म्हणून प्रवर्तणार जो पुरुष तो तंतुच संपादितो दहिलोणी संपादावे म्हणून प्रवर्तणार जो पुरुष तो दुधातेंच संपादितो तेला पाहिजे म्हणून प्रवर्तणार जो पुरुष तो तिळाते संपादितो या मृदादिकाचे ठाइ घटादिक जे तें नाहीत ॥ तरि तो तो त्यातें नियमेंकरून काशास संपादिल ॥ नाही तरि संपादिना कीं ॥ संपादितो हे या कारणास्तव आहे त्या वस्तुसच उत्पत्ति बोलावी ॥ नाहीं त्या त्या वस्तुची उत्पत्ति बोलिल्यानें या कार्यास हें कारण या कार्यास हेच कारण म्हणायाचा नियम नाहींसा जाला ॥ म्हणुन तंतुपासुन घट उत्पन्न जाला पाहिजे मृत्तिकेपासुन पट उत्पन्न जाला पाहिजे उदकापासुन दहिलोणी उत्पन्न जालें पाहिजे वाळुपासून तेल उत्पन्न जाले पाहिजे ॥ याप्रकारे उत्पन्न होणें देखिलें नाही म्हणूनही त्यास त्यास नियत ते कारण जे तें यापासून ते ते कार्य उत्पन्न व्हाव्याचें देखिलें आहे ॥ म्हणुनही ॥ म्हणुन आहे जे वस्तु तेच उत्पन्न होते म्हणून बोलावें ॥ त्या त्या कार्यास कारण ऐशा ज्या वस्तु ज्या त्या आहेत म्हणून त्याही याप्रकारें उत्पन्न व्हाव्या म्हणून बोलतां नये काय बोलता नये म्हणाल तरि त्याची उत्पत्ति प्रत्यक्षकरून दिसत नाही म्हणून हे घटादिक जे यास उत्पत्ति सांगितल्यासारिखें त्यास कारण ऐसें मृदादिक जे त्यास उत्पत्ति सांगितल्यासारिखें त्यास कारण ऐसें मृदादिक जे त्यास उत्पत्ति बोलतां नये ॥ हें कारणभूत मृदादिक जें याची येकयेका ठाइं उत्पत्ति दिसली जरी पृथ्व्यादिकाची श्रुत्यादिकेंकरून उत्पत्ति ऐकिली जरी सर्वकारण ऐसा जो आत्मा जो त्यास उत्पत्ति आहे म्हणायाविषइं येक प्रमाण तरी नाही म्हणूनही अनवस्था दोष प्राप्त होतो म्हणूनही सर्वकारण आत्मा जो त्यास उत्पत्ति बोलता नये ॥ अहो आहे त्या वस्तुस उत्पत्ति बोलाव्याची युक्ति युक्त नव्हे म्हणून बोलतां नये तें कैसे घडेना म्हणाल तरि ॥ या बोलिल्या ज्या युक्ति ज्या येहींकरून असदास उत्पत्ति बोलता नयेसें जालें म्हणून सदास उत्पत्ति बोलावी सद म्हणिजे आहे ते वस्तु तेच सद ॥ त्यास उत्पत्ति कैसी बोलता येईल म्हणाल तरि पूर्वी नामरूपात्मकेकरून न दिसून कारणात्मक होत्सातें बीजादिकाचेठाइं असणार जे वृक्षादिक त्यास नामरूपात्मकेंकरून भासायाची जैसीं उत्पत्ति तैसे प्रळयकाळाचेठाइंही नामरूपात्मक न होत्साता असायाचें सुक्ष्म शरीरादिक जे त्यास नामरूपात्मकेंकरून न होत्साता असायाचें सुक्ष्म शरीरादिक जें त्यास नामरूपात्मकेंकरून भासायाची उत्पत्ति ऐसें तरि ॥ कार्यकारणास भेद कैसा म्हणाल तरि अनभिव्यक्त नामरूपात्मकेकरून असायाचें कारण अभिव्यक्त नामरूपात्मक होउन असायाचें कार्य याप्रकारें कार्यकारणास भेद आहे ॥ काळत्रयाचेठाइंहीं कार्य कारणात्मकेकरून आहे म्हणायाविषइं संदेह नाही सित्ध ॥ याप्रकारे असतांही अनभिव्यक्त नामरूपात्मक होत्सातें असायाचें कार्याकारेंकरून भासायाविषइं कुल्लाळादि व्यापार जे त्यास असद आश्रय नव्हे म्हणूनही अन्याश्रय जे व्यापार तेणेंकरून अन्याची उत्पत्ति बोलतां अतिप्रसंग होतो म्हणूनही कुल्लाळादि व्यापार व्यर्थ होतो ॥ कुल्लाळादिव्यापार जे त्यास व्यर्थत्व बोलता नये म्हणूनही कार्य जे ते कारणात्मकेकरून असतांही कुल्लाळादि व्यापारातें अपेक्षायाचें युक्तच ॥ अहो पूर्वी बोलिल्या ज्या युक्ती तेहींकरून काळत्रयाचेठाइं कार्य जे तें कारणात्मकेकरून आहे त्याकारणास्तव प्रळयाचेंठाइंही आत्म्यास जीवत्वाविषइं उपाधिभूत सुक्ष्मशरीर जें तें कारणात्मेंकरून आहे त्या कारणास्तव जीवाचे अनादित्व भंगही नाही ॥ त्या सूक्ष्मशरीराची नामरूपात्मकेकरून भासायाची उत्पत्ति ऐसा अंगिकार केला आहे म्हणून श्रुत्यादिकास विरोध नाहीं ॥ हे दोष जे ते त्याप्रकारें परिहार केलें ॥ जरी लोकाचेठाइं जन्य ज्या वस्तु ज्या त्यास कर्मजन्यत्व जे ते अनेकत्व जे ते देखिलें आहे म्हणून सूक्ष्मशरीरही जन्य होउन असता त्यासही कर्मजन्यत्वही अनेकत्वहीं यावें म्हणायाचा दोष जो तो परिहार केला नाही ॥ ऐसें म्हणाल तरि त्याचा परिहार करूं ॥ कैसा परिहार कराल म्हणाल तरि त्या सुक्ष्मशरीरास कर्मजन्यत्व अनेकत्वही अंगिकार करून की हे दोष परिहार करावे तैसे अंगिकार करितां ॥ पूर्वीं सूक्ष्मशरीर कर्मजन्य नव्हे म्हणून बोलिल्यास विरोधभास तो म्हटिले तरि ॥ हे जे विरोध जे त्यातेंही ते जे विरोध जे त्यातेंही म्हटिलें तरि ॥ जे जे विरोध जे त्यातेंही ते जे विरोध जे त्यांतेंही परिहार करितों कैसे परिहार करिता म्हणाल तरि जन्य जितुकें तितुकें कर्मजन्य अंगिकार करावा ॥ तें जन्य जें तें सामान्यकर्मजन्यत्वें अंगीकृत म्हणून विशेषकर्मजन्य म्हणून दो प्रकारिचें ॥ याप्रकारें असतां ॥ सुक्ष्मशरीरास सामान्य कर्मजन्यत्व आहे ॥ म्हणून जन्यकर्मजन्यत्व अंगिकार केला आहे जरी विशेषकर्मजन्यत्व अंगिकार केला नाही ॥ म्हणून पूर्वी सुक्ष्मशरीर जे तें कर्मजन्य नव्हे म्हणून बोलिल्यास विरोध नाहीं सामान्यकर्मजन्य ऐसी जे वस्तु इस व्यवहाराचेठाइं येकत्वही विशेषकर्मजन्य ऐसी जे वस्तु तीस अनेकत्वही लोकाचेठाइं देखिले आहे म्हणून सुक्ष्मशरीर जें तें सामान्यकर्मजन्य होऊन असतांही विशेषकर्म जालें नाही म्हणुन सुक्ष्मशरीर जें तें येकच म्हणुन बोलिल्यास विरोध नाही या प्रकारें सामान्यकर्मजन्य होत्साती ऐसी जे वस्तु तिस येकत्व जें तें विशेषकर्मजन्य वस्तु जे तीस अनेकत्वही कोठें तरी देखिले आहे काय म्हणाल तरि लोकांचेठाइं देखिलें आहे तें कोठें देखिले आहे म्हणाल तरि पृथ्व्यादिकाचेठाइं देखिले आहे ॥ पृथ्व्यादिकास कर्मजन्यत्व दिसते तरि नाही कैसे बोलावे म्हणाल तरि जगसंपूर्णही जन्य म्हणूनही जीवास भोग्य म्हणूनही जगास कर्मजन्य ऐसेंच बोलावें जीवास भोग्य जालें तरिच जग कर्मजन्य व्हावें काय म्हणाल तरि व्हावेंच तें कैसे म्हणाल तरि बोलूं अवघ्या कर्मास ही सुखदुःख कींफळ ॥ तें सुखदुःख जे तें अनुकुळ प्रतिकुळ वस्तु ज्या त्यातें अवलंबून येत आहेत याकारणास्तव जगनिष्ट जे पदार्थ या मध्यें कित्तेक पदार्थ कित्तेकास अनकुळ होउन सुखाकार होत्साते आहेत म्हणूनही त्या जीवाचीं कर्में जें तें आपणास फळभूत ऐसीं जे सुखदुःखें जें त्यास साधन ऐसें आकाशादिक जे त्याची उत्पत्ति जे तितें संपादुन घेऊन जीवास सुखदुःखें जें त्यातें देत आहेत ॥ या कारणास्तव जग संपूर्ण कर्मजन्य बोलावे ॥ स्थितिकाळाचेठाइं की जीवही त्याचीं कर्मेंही दिसताहेत प्रळयकाळाचेठाइं तरि त्याची कर्मेंही दिसत नाहीत ॥ याप्रकारे असतां जीवांची जे कर्मे जे तेहीकरून आकाशादि जग जे ते उत्पन्न जालें म्हणून कैसे बोलावें म्हणाल तरि बोलूं येतें ॥ कैसे बोलूं ये म्हणाल तरि बोलूं प्रळयाचेठाईंही जीव संपूर्ण आपल्याला उपाधीसहीत सुषुप्तिचेठाइं जैसे आहेत तैसे संस्कारात्मना आहेत तैसीं कर्में तेणेंकरून आकाशादि जग जें तें उत्पन्न जालें म्हणायाचे घडते याप्रकारें अंगिकार न केलियानें पूर्वकल्पाचे ठाइं जीवाही केली जे कर्मे त्यास फळच नाहींसे जाले पाहिजे पूर्वकल्पाचेठाइं न केली ऐसी जे कर्मे त्याचे या कल्पाचेठाइं फळ जालें पाहिजे ॥ इतकेच नव्हे श्रुत्यादिकासही व्यर्थता येइल ॥ येक कारणही नसतां जग उत्पन्न जालें म्हणून बोलतां मुक्तपुरुष जे त्यासही उत्पत्तिप्राप्त जाली पाहिजे ॥ जगाचेठाइ मनुष्यदेवतीर्यकब्राह्मणक्षेत्रीयवैश्य इत्यादिक व्यवस्था ज्या ज्या नाहींशा जाल्या पाहिजेत ॥ हे दोष येतील तरि येवोत म्हणाल तरि ऐसें बोलाव्याचे उचित नव्हे म्हणून प्रळयाचे ठाइही संस्कारात्मकेंकरून असायाचें जीवाचीं जें कर्मे तेंहीकरून आकाशादि जग जें तें उत्पन्न जाले म्हणायाविषइं संदेह नाही ॥ या प्रकारें आकाशादिक जग जें तें कर्मे करून उत्पन्न जाहालें जरी स्वगतचि विकार जे ते असताही प्रळयाचे ठाइं लयातें पाउन असुन त्या त्या सृष्टीचे ठाइं ते आकाश जे ते आकाश होउनच वायु जो तो वायु होउनच तेज जे तेज होउनच जळ जे तें जळ होउनच पृथ्वी जे ते पृथ्वि होउनच जैसे उत्पन्न होत आहेत ॥ तैसेंच सूक्ष्मशरीर जे ते प्रळयाचेठाइ लयाते पावले असुनही त्या त्या जीवाचीं कर्में जें तेहीकरून पूर्वकल्पाचे ठाइं जैसे होतें तैसे प्रतिकल्पाचेठाइंही उत्पन्न होत आहे ॥ याप्रकारें उत्पन्न जालें जरी स्वगतविकारवंत होत्सातेंही सूक्ष्मशरीर जें तें येकेक्या प्राण्यास मुक्तिपर्यंत येकेकच ॥ याप्रकारें बोलतां मुक्ति अनंतरे सुक्ष्मशरीरे जे ते अनंत होत्सातीं असायाचे भासते ऐसें म्हणाल तरि मुक्तिनंतरें सुक्ष्मशरीर जे ते आकाशासारिखे सामान्य कर्में जे तेणें करुन उत्पन्न जाहले आहे म्हणून येकेक्या प्राण्यास येकेक शरीर म्हणून बोलिले तें युक्तच ॥ नव्हे हो याप्रकारें बोलिले जे तें विरोध भासतो ॥ तो विरोध कोणता म्हणाल तरि आकाशादिक जे ते सर्व प्राण्याच्या कर्मेकरून उत्पन्न जाला म्हणून त्या आकाशादिकास सामान्यकर्मजन्यत्वही प्रळयपर्यंतही येक होउन असायाचेंही प्रतिकल्पाचेठाइं जैशाचे तेसे उत्पन्न होव्याचेंही युक्तच ॥ त्या त्या प्राण्याची सुक्ष्मशरीरे तरि समस्तप्राण्याची कर्में जे तेहीकरून उत्पन्न तरि जाली नाहीत ॥ त्यास सामान्यकर्मजन्यत्व जे त्यातें येकयेकाप्राण्यास येकयेक शरीर म्हणायाचें प्रतिकल्पाचेठाइं जैशाचे तैसें उत्पन्न होतें म्हणायाचें मुक्तिपर्यंत नित्य म्हणायाचें कैसें बोलायाचें ॥ कैसें बोलावें म्हणाल तरि बोलूयें ॥ ते कैसे म्हणाल तरि बोलुं ॥ आकाशादिकासारिखें त्या त्या प्राण्याची सूक्ष्मशरीरें जें तें समस्त प्राण्याची कर्में जे तेहीकरून उत्पन्न होउन त्या त्या प्राण्यास सृष्टि आदिकरून प्रळयपर्यंतही स्थूळशरीरद्वारा सुखदुःखें जे त्यातें देणार ऐसी जें कर्में जे तेहीकरून त्या त्या प्राण्याची सुक्ष्मशरीरें उत्पन्न होताहेत ॥ म्हणून मुक्तिपर्यंतही त्या त्या प्रळयाचेठाइं संस्कारात्मना असायाचीं ॥ तें तें सुक्ष्मशरीरे जे त्याते आश्रयून आसायाची कर्में जे ॥ तेहीकरून त्या त्या सृष्टिचेठाइं त्या त्या प्राण्याची सुक्ष्मशरीरे जे तें तैसी उत्पन्न होत आहेत म्हणून ॥ त्या सुक्ष्मशरीरास सामान्यकर्मजन्यत्वही ॥ येकेका प्राण्यास सुक्ष्मशरीर येकेक म्हणायाचेही मुक्तिपर्यंत नित्य म्हणायाचेही बोलुये ॥ लीन ऐसी जे वस्तु जे ते कर्माते अपेक्षुन उत्पन्न होते म्हणायाविषइं सामान्यकर्म जे त्यापासुन उत्पन्न जाली ऐसी जी वस्तु जे ते नाना रूपे होउन अनेक होउन असायाविषइं दृष्टांत आहे काय म्हणाल तरि आहे ॥ बोलूं ॥ काष्ठपाषाणादिकाचे ठाइं लीन ऐसा जो अग्नि जो त्यांची मंथनादिरूप ऐसें जे कर्म जे तेणेकरून जैसी उत्पत्ति तैसें कारण रूप होउन आहे ऐसे सुक्ष्मशरीर जे त्यासही कार्याकारेंकरून भासायाचें कर्में करून ॥ याप्रकारें बोलिले जे तेणेकरून कार्य जे ते असद म्हणायाचे निराकरण केले ॥ आतां सामान्यकर्म जे तेणेकरून उत्पन्न जाली जे वस्तु ते येकेक म्हणायाविषइं विशेषकर्म जे तेणेकरून उत्पन्न जाली जे वस्तु ते अनेक म्हणायाविषइं दृष्टांत बोलतो ॥ कुल्लाळ जो तेणे नानाविध भांडें जे त्याते करावे म्हणून संपादिला ऐसा जो मृत्पिंड जो येकच ॥ तो मृत्पिंड अनेकरूपें जें कर्में जें तेहीकरून सिद्ध केला जरी तें कर्में अवघींही त्या मृत्पिंडापासून उत्पन्न जालीं ॥ ऐसी भांडें जे जे त्या अवघियासहि समान हात्साती आहेत म्हणूनही पिंड सामान्यकर्मजन्य याकारणास्तव तो मृत्पिंड येकच ॥ त्या मृत्पिडेंकरून केलें जं भांडे त्यामध्यें येक भांडे करायाची क्रिया जे तीनेकरून आनखी येक भांडें जे ते करिजेत नाहीं ॥ म्हणून ते भांडी अवघीही विशेष कर्मजन्यच ॥ याकारणास्तव तें भांडें जे ते नानारूप होत्सातीं अनेक आहेत म्हणायाविषइं सर्वानुभव सिद्ध ॥ याप्रकारें सुक्ष्मशरीर जे ते सामान्यकर्में जालें म्हणून ते येकयेक शरीर म्हणायाचे स्थूळशरीर विशेषकर्मजन्य आहे म्हणून येकेका प्राण्यास अनंत म्हणायाचे घडतें ॥ आणिखीही याविषइं विशेषदृष्टांत आहे काय म्हणाल तरि आहे ॥ तें कैसें म्हणाल तरि लोकाचेठाइं देवदत्तास कर्मवशास्तव नानाविध वस्त्रें जे ते प्राप्तहोताहेत ॥ तें वस्त्रें जें तें येकावस्त्रास येकवस्त्र असत नाही म्हणून ते वस्त्रें जैसी विशेष कर्में जें तेहीकरून जैसी प्राप्त होताहेत ॥ एसी स्थूलशरीरें तेही येकेक्या प्राण्यास विचित्र होत्सातीं अनंत होत्साती येत आहेत म्हणून ते स्थूळशरीरें जे तें विशेष कर्मजन्य म्हणून जाणाव्यास योग्य ॥ त्या देवदत्ताची तें तें विशेषकर्में जें तेहीकरून वस्त्रें जे ते येत आहेत ते जें वस्त्रें जें तेहीकरून याव्याची सुखदुःखे जें त्यास साधनभूत ऐसें जे स्थूळशरीर येकच होउन आहे म्हणून त्यावस्त्रातें अपेक्षुन स्थूळशरीर जे ते जैसी सामान्यकर्मजन्य जाले तैसें सुक्ष्मशरीर जें तें येकेका प्राण्यास येकेका होउन आहे ॥ म्हणुन तेही सामान्यकर्मजन्य ऐसें जाणायास योग्य ॥ याकारणें बोलिल्याकरून काय सित्धि जाली म्हणाल तरि ॥ सुक्ष्मशरीरासच स्थूळशरीराचे ग्रहणही त्याचा त्यागही सित्ध जाला ॥ ते कैसे म्हणाल तरि दृष्टांताचेठाइं स्थूळशरीरासच वस्त्राचे ग्रहणकरणेंही त्याचा त्याग करणेंही प्रत्यक्षकरून जैसें देखिले आहे ॥ तैसेच सुक्ष्मशरीरासही स्थूळशरीराचा परिगृहेही त्याचा त्याग म्हणायाचें जाणूयें ॥ याप्रकारे आहे म्हणून सुक्ष्मशरीरास स्थूळशरीराचे ग्रहण करणेंच जन्म ॥ त्या स्थूळशरीरासी यानंतर समंध नाही ते टाकावें तें मरण ॥ याप्रकारें असतां सुक्ष्मशरीरासच प्रत्यक्ष करून जन्ममरण जे तें नाही ॥ म्हणून भासतें ॥ याप्रकारे भासत असतां आत्म्यास जन्ममरणाची प्रसक्ति नाही म्हणून जाणुये ॥ अहो ऐसें बोलतां त्या सुक्ष्मशरीरासच स्थूळशरीर जे ते अनंत म्हणून सांगितले एैसे भासतें ॥ भासले तरि भासो ऐसें म्हणाल तरि पूर्वी प्राण्यास स्थूळशरीरे अनंत म्हणून बोलून आता सुक्ष्म शरीरास स्थूळशरीरें अनंत म्हणुन बोलता ॥ पूर्वि बोलिल्यास आता बोलिल्यास विरोध कीं एैसे तरि ॥ सुक्ष्मशरीर जे तेचि प्राणीशब्दास अर्थ म्हणून बोलूं म्हणाल तरि तैसेही बोलता नये का बोलता नये म्हणाल तरि पूर्वी प्राण्यास सुक्ष्मशरीर जें तें ऐकेक म्हणून बोलून आतां सूक्ष्म शरीरच प्राणी शब्दास अर्थ म्हणून कैसे बोलावें ॥ याप्रकारें दोनि विरोध जे ते भासताहेत म्हणसील तरि विरोध जो तो जैसा न भासे तैसें बोलूं ॥ प्राणि शब्दास आत्माच अर्थ त्या आत्म्यासच कारणशरीर ऐसें आहे नाम ज्याचें ऐसे जें अज्ञान तेणेकरून प्राप्त सूक्ष्मशरीराध्यासद्वारा अनंत ऐसी जें शरीरें जे तें याव्याची होत्सातीही त्या स्थूळशरीरानिष्ट ऐसें जे जन्ममरणादिक जे तें प्रसक्त जाल्यासारिखें भासतें ॥ कैसे भासते म्हणाल तरि दृष्टांताचेठायीं स्थूळशरीरेंकरून वस्त्रादिक जे ते ग्रहण करावयाचेंही आणि टाकावयाचेंही प्रत्यक्ष करून दिसले जरी त्या स्थूळशरीरव्यतिरिक्त होत्साता त्या स्थूळशरीराचेठाईं अध्यास जो तेणेकरून देवदत्त ऐसें नाम ज्यास ऐसा जो जीव जो त्या स्थूळशरीरद्वारा वस्त्रग्रहण - त्यागादिक जे तें जैसा भासतें तैसे अज्ञानेंकरून प्राप्त ऐसे जे सूक्ष्मशरीराध्यासद्वारा आत्म्यासही अनंत एैसी जे स्थूलशरीरे जें तें याव्यांची जाव्यांची ऐसी मोहास्तव दिसताहेत ॥ विचार करितां स्थूळशरीरासच जन्ममरण जें तें प्रत्यक्षेकरून देखिलें आहे ॥ म्हणून सूक्ष्म शरीरास स्थूळ शरीर जें त्यासी अध्यासावेगळें जन्ममरणादिक जें तें नाही ॥ सूक्ष्म शरीरासच जन्ममरणादिक जे ते नाहिसे जाले म्हणून आत्म्यास मोहोमात्र वेगळे करून जन्मकरणादिक जे ते नाही म्हणाव्याचे बोलावें कार्य ॥ हा बोलिला जो प्रकार येणेंकरून प्राण्यास स्थूळ शरीरें अनंत सूक्ष्म शरीर येक येक म्हणुन कारणशरीर जे ते येक म्हणुनही बोलाव्याचें युक्तच ॥ येणेंकरून काय सिद्ध जाली म्हणाल तरि शरीरत्रयही प्राणिशब्देंकरूनहि बोलिजेल ऐसा जो आत्मा नव्हे म्हणून सिद्धि जाली ॥ कैसें म्हणाल तरि लोकाचेठाइं येकजण आणिखी येकांतें तुज रुद्राक्षमाळा किती म्हणून पुसिल्यानें तीनि म्हणून सांगतो ॥ याचप्रकारें प्राण्यास किती शरीरें म्हणून विचार करितां तीन शरीरें म्हणून भासतें ॥ याप्रकारें भासणें जें तेणेंकरून काय सिद्धि जाली म्हणाल तरि ॥ दृष्टांताचेठाइं रुद्राक्षमाळा आदिकरून त्याते धरणार जे ते जैसे माळादिक नव्हेत त्या रुद्राक्षादिनिष्ट विकार जे ते धरणार जे त्यातें जैसें स्पर्श करूं शकत नाहींत तैसेंच दार्ष्टांतिकाचेठाइंही स्थूळसूक्ष्मकारणशरीरें तन्निष्ट विकार जे ते प्राणिशब्द जो तेणेकरून बोलिला ऐसा जो आत्मा त्यातें स्पर्श करूं शकत नाही म्हणून भासतें ॥ इतकेच नव्हे ॥ लोकाचेठाई देवदत्तादिकास गृही म्हणून क्षेत्री म्हणून धनी म्हणून व्यवहार देखिला आहे ॥ याप्रकारें आत्म्यासही शरीरी म्हणून देही म्हणून प्राणी म्हणून व्यवहार जो लोकाचेठाइंही वेदांताचेठाइंही दिसतो ॥ याप्रकारें असतां या दृष्टांताचेठाइं गृही म्हणून क्षेत्री म्हणून धनी म्हणून भासाच्या देवदत्तादिक जे ते गृहादिक जैसे नव्हेत त्या गृहादिनिष्टविकार जे ते त्यातें जैसे स्पर्शु शकत नाहींत ॥ तैसे शरीरी देही प्राणी म्हणून उपाधीकरून भासाव्याचा आत्मा जो तोही ते शरीरप्राणादिक नव्हे ॥ त्या शरीरादीकनिष्टविकार जे तेही आत्म्यातें काळत्रयाचे ठाईंही स्पर्शु शकत नाहीत ॥ याप्रकारे शरीरत्रयहीं आत्मा न होउन शरीरत्रयनिष्ट विकार जे तेही नाहीत ॥ ऐसे असतांही सामान्येंकरून भासताहेत ॥म्हणून विशेषेकरून स्थूळशरीरासारिखे ॥ सूक्ष्म कारण दोन्हीं शरीरें जे ते भासत नाहीत म्हणून वारंवार विचार केला जरी ते शरीरें जे तें आत्मा नव्हेत ॥ ऐसें भासाव्याचें कठिण आहे ॥ म्हणून ही शरीरें जे ते तीनच ॥ हें शरीरें आत्मा नव्हेत ॥ शरीरत्रयनिष्टविकार जे ते आत्म्यातें स्पर्शुं शकत नाहीत म्हणून दृढत्वेंकरून भासाव्याविषइं विशेष युक्ति आहे ते बोलूं ॥ स्थूळशरीर समस्त प्राण्यासही प्रत्यक्षच म्हणून हें स्थूळशरीर आहे नाहीं म्हणायाविषइं कोणासही संदेह नाही सिद्ध ॥ अहो चर्वाक पामर जे त्याहून व्यतिरिक्त जे त्यास हे स्थूळशरीर आत्मा म्हणाया उचित नव्हे ॥ कैसे उचित नव्हे म्हणाल तरि सूक्ष्मशरीराचेठाइं अध्यासेंकरून जीवत्वातें पावला जो आत्मा त्या सूक्ष्मशरीरद्वारा स्थूळशरीरध्यासेंकरून प्राप्त ऐसें पुत्राद्यपेक्षेकरून पित्रादिशब्द जे येहीकरून बोलिजेतो याप्रकारें पित्रादिशब्द जे तेहीकरून वाच्य ऐशासारिखें भासणार आत्मा जो तो स्थूळशरीराहून भिन्नच ॥ त्या पितरादि शब्देंकरून स्थूळशरीरच बोलिले ते कार्य ॥ ते पित्रादिक मेल्यांनंतर पित्रादिक शब्द जे त्यास अर्थ होऊन चर्वाक पामर जे त्यास आत्मा म्हणून अभिमत ऐसें जे स्थूळशरीर जें तें असिलें पाहिजे ते पित्रादिक मृत्यु पावले म्हणून न बोलिले पाहिजे ॥ तैसे तरि न बोलतां राहत नाहीत म्हणून हे स्थूळशरीर या व्यतिरिक्त होत्साता आत्मा म्हणून चर्वाक पामर जे तेंहि अंगिकार केला पाहिजे इतुकेंच नव्हे ॥ आणिखी युक्त्यंतरेंकरूनही या स्थूळशरीराव्यतिरिक्त होत्साता आत्मा म्हणून भासतो ॥ तो कैसा भासतो म्हणाल तर बोलूं ॥ त्या पित्रादि शब्दास अर्थासारिखे भासले जे पित्रादिकांची स्थूळशरीरे जे ते मरून पडिली असतां त्यातें पोटाळूव रडत होत्साते असणार जे पुत्रादिक जे ते आमतें मध्यें सोडून रीण दीधलें घेतले हें स्थूळ न सांगून आमच्या तोंडी माती घालून आमचे बाप आदिकरून मेले म्हणून सांगताहेत ॥ इतुकेच नव्हे आणिखि बंधुजन जे तेही स्नेहीत जे तेही येऊन तुमचे बाप आदिकरून गेले कीं आहाहा म्हणून दुःखातें बोलतां बापा गेले आई गेली बाप गेला माय गेली आमचा सांगात गेला याप्रकारें आमचे सांडूनी आवघेहि गेले आतां आम्हास गति कायजी म्हणून रडूरडू सांगताहेत ॥ हे सांगितले जे कोण्याप्रकारें आहे म्हणाल तरि ॥ तुमचे मामा आदिकरून आले होते की ते गेले काय पुसिल्यानें आमतें न सांगतांच आपण नेसले धोत्रही सोडून टाकून गेले म्हटल्यासारिखे आहे ॥ या कारणास्तव त्या दृष्टांताचेठाइ मामे आदिकरून जे ते नेसली धोत्रें तेहींसी मिळून भासले जरी त्या धोत्रातें टाकुन गेले जे तेच मामे आदिकरून शब्द जे त्यास जैसा आर्थ ॥ तेही त्यागिली जे धात्रें जे तेंचि मामे आदि शब्द जे त्यास जैसा अर्थ नव्हेच ॥ तैसे या स्थूळशरीरातें टाकुन कर्मांनुसारेंकरून लोकांतरास गेले तेच या पित्रादि शब्दास अर्थ होत्साते भासताहेत ॥ हें स्थूशरीर जे ते त्या पित्रादि शब्दास अर्थ होउन भासत नाही ॥ ऐसे तरि या स्थूळशरीरापासून निघुन गेले ते त्या पित्रादि शब्दास अर्थ होयेत ॥निघुन गेल्यापूर्वी तेथें असायाचे स्थूळशरीर जे तेंच पित्रादि शब्दास अर्थ म्हणून बोलूं तरि तैसेही बोलतां नये ॥ तैसें बोलिलें तरि ते धोत्रे टाकुन गेले मामे आदि जे ते धोत्रेंच जाले पाहिजेत ॥ इतकेंच नव्हे आणिखी येका गृहामधे असुन ते गृह त्यागुन गेला जो पुरुष जो तो त्या गृहीहुन गेल्यापूर्वी गृहच जाला पाहिजे ॥ तैसे तरि बोलता नये ॥ त्या धोत्रास मिळुन असणारे ऐसे जे मामे आदि जे ते त्या धोत्रास मिळुन असिले जरीं मिळुन नसिले जरी ते धोत्रे जैसे ते नव्हेत ॥ गृहामधुन गेला जो पुरुष जो तो त्या गृहाते टाकुन गेला अथवा असता तो गृह जैसा नव्हे ॥ तैसेच पित्रादिक जे ते या स्थूळशरीरामध्यें असतांही स्थूळशरीरातें टाकुन गेले जरी त्या पित्रादि शब्दास स्थूळशरीरास टाकुन गेले जे तेच अर्थ ॥ हे स्थूळशरीर जे ते अर्थ नव्हे ॥ इतकेच नव्हे पित्रादि शरीर जे त्याच्या मरणाहुन पूर्वी पित्रादिशब्दास अर्थ म्हणुन मानुन होता ॥ त्या शरीरातें उदासीन येकवचन बोलिले जरि त्या शरीराचेठाइ क्षत केले जरि त्यास अनेक दोष प्राप्ति म्हणून शास्त्र बोलतें ॥ तैशा शरीराते नेउन जाळिती ॥ त्या पित्रादि शब्दास हे स्थूळ शरीर जे तेच अर्थ जालें जरि त्या शरीरातें जाळणार जे पुत्रादिक त्यास पितृहत्यादिक दोष जे ते आले पाहिजेत ॥ ते दोषच जरि जाले त्या पुत्रादिकास अनंतकोटि नरक जे ते जाले पाहिजेत ॥ इतके च नव्हे लोकाचे ठाइं जन जे तेही हे पितृमातृहत्या करणार म्हणुन दुषण ठेवून त्यासि गोष्टि न सांगुन असावें ॥ ऐसें तरि दिसत नाही ॥ म्हणूनही त्या पित्रादि शरीरात जाळणार ऐसे जे पुत्रादिक जे त्यास नरकादिक जे त्यातें शास्त्र बोलिलें नाहीं ॥ म्हणुनही हे स्थूळशरीर जे ते पित्रादिशब्दास अर्थ नव्हे ॥ ज्या शरीरातें पित्रादिशब्दास अर्थ म्हणून मानुन अनेक उपचार जे तेहीकरून पुजित आला त्या शरीराते मरणानंतर दहन केलियां त्या पुत्रादिकास प्रत्यवाय दोष जे त्यातें शास्त्र सांगतें ते पुत्रादिक जे ते देह जे त्यास दहनादिक क्रिया ज्या त्याते केल्या जरि त्या स्थूळशरीरापासून निघुन लोकांतरास गेले जे ते पित्रादिक जे त्यास प्रेतत्वविमोचनरूप ऐसा अतिशय जो त्यातें त्या शरीरातें जाळणार जे पुत्रादिक त्यास प्रत्यवाय नाही म्हणुन शास्त्र बोलते ॥ कैसे म्हणाल तरि अन्य देशीचे राजे जे आपले सैन्यासहीत पर्जन्यकाळीं येखादे स्थळी छाया धरून राहिले असता तेथुन राजे पुढे गेल्यानंतर त्यास कल्याण जालें पाहिजे म्हणुन त्याचे भृत्य जे ते त्या छायेते मोडुन जैसे टाकिताहेत ॥ ते मोडुन जरि न टकित तरि राज त्यातें जैसी सिक्षा करितो ॥ तैसेच मरुन पडिले आहेत ऐसे जे पित्रादिक शरीर जे त्याते पुत्रादिक जे तेंहि संस्कार केले जरी ते पित्रादिक जे त्यास अतिशययय जो त्यातेही दहन केल्यास प्रत्यवाय दोष नाही म्हणुनही जाणुये ॥ लोकाचेठाइं जन जे मरुन पडिले जे पित्रादिक शरीरे जे त्यास संस्कार करणार ऐसे जे पुत्रादिक जे त्यातें पुत्रादिकास बरी गति संपादली म्हणून स्तुति करिताहेत ॥ संस्कारातें न करणार जे त्यातें दूषिताहेत ॥ येणेकरूनही त्या पित्रादिक शब्दास या स्थूळशरीरापासुन निघुन लोकांतरास गेले जो तोच अर्थ म्हणुन भासतो ॥ या बोलिल्या ज्या युक्ति तेहीकरून त्या पित्रादिक शब्दास हे स्थूळशरीर अर्थ नव्हेसा जाला ॥ तरि या स्थूळशरीरातें पित्रादि म्हणुन काशास शुश्रूषा करिताहेत म्हणाल तरि ॥ स्थूळशरीरामध्यें असणार जो त्याचे प्रीतिनिमित्त शुश्रूषा ( करिताहेत इतुकेच परंतु त्या स्थूळशरीराच्या प्रीतीकारणें शुश्रूषा - हा जास्त मजकूर एका प्रतीत आहे .) करित आहेत ॥ ते कैसे म्हणाल तरि राजगृहामध्यें राजा असतां त्या राजाच्या प्रितीकारणें राजगृहास चांदवे आदिकरून अळंकारादिक जे ते जैसे करिताहेत त्या राजगृहाच्या प्रितिकारणे चांदवे आदिकरून अळंकारादि जे ते जैसे करित नाहींत ॥ तैसे स्थूळशरारीते शुश्रूषा करणार जे तेही त्या स्थूळशरीरामध्यें असणार जो त्याच्या प्रीतीकारणे त्या स्थूळशरीराची शुश्रूषा करित आहेत याा कारणास्तव स्थूळशरीर जे ते मोहेंकरून पित्रादि शब्दास अर्थासारिखे भासलें जरि या स्थूहशरीरामध्यें असणार जो तोच त्या पित्रादि शब्दास अर्थ ॥ इतुकेच नव्हे ग्रामांतरास गेला जो त्याचे धोत्र चोरानें नेले तरि ते गोष्टि ऐकुन त्यास त्याचे पुत्रादिक जे ते आणखी दुसऱ्या धोत्रातें जैसे कोणाहाती पाठविताहेत ॥ तैसे मरुन लोकांतरास गेले जे पित्रादिक जे ते नग्न होत्साते जात आहेत त्यास नग्नप्रछादनाकारणे येथे ब्राह्मणास वस्त्रादिक दिल्याने ते वस्त्र त्यास पावते म्हणून शास्त्र जे ते बोलत असतां त्यांचे पुत्रादिक जे ते येथे ब्राह्मणास वस्त्र देत आहेत ॥ येणेकरूनही हे स्थूळशरीर त्या पित्रादि शब्दास अर्थ नेघे ऐसे भासले ॥ इतकेच नव्हे मरून गेले पित्रादिक त्याच्या उद्देशेकरून मेल्यादिवसापासून संवत्सरपर्यंत दशदिनक्रिया महिन्या महिन्याची मासिकें त्यानंतर त्यांचे पुत्रादिक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत प्रतिसंवत्सरी त्यातें उद्देशून श्राद्धें मध्ये मध्ये अष्टकादिक श्राद्धें पुण्यक्षेत्रे जे त्याचेठाइ तीर्थश्राद्धे करिताहेत ॥ तें सांगितले जव अवघेही भस्म होउन गेले जे स्थूळशरीर जे तें पित्रादिशब्दास अर्थ जरि जालें तरि हे घडेना या स्थूळशरीरापासून निघुन लोकांतरास गेले जे तेच पित्रादिशब्दास अर्थ जरि जालें ॥ तरि ऐसें घडे ॥ या कारणास्तव हें स्थूळशरीर जे ते पित्रादिशब्दास अर्थ नव्हे ॥ बोलिल्या ऐशा ज्या युक्ती ज्या तेंहीकरून स्थूळशरीर पित्रादिशब्दास अर्थ नव्हेल तरि न व्हो ॥ येणेकरून सूक्ष्मशरीराची सिद्धि तुम्हास काशाकरून जाली म्हणाल तरि ॥ या स्थूळशरीरातें टाकुन देऊन लोकांतरास गेले तेच सूक्ष्मशरीर म्हणून आम्हासि सिद्धि जाली ॥ याप्रकारें बोलती पित्रादिशब्दास हे सूक्ष्मशरीरच अर्थ म्हणून सांगितल्यासारिखें जालें ॥ ऐसे तरि त्या पित्रादि शब्दास चेतन की अर्थ ॥ सूक्ष्मशरीर अचेतन की ॥ अचेतन ऐसे जे सूक्ष्मशरीर पित्रादिशब्दास कैसा अर्थ होइल म्हणाल तरि बोलूं ॥ चेतन म्हणतां आत्मा तो आकाशाचेपरि व्यापक म्हणून त्यास लोकांतरगर्मंनादिक जे तें घडेना ॥ म्हणून तो निरएव म्हणून कर्मादिसंस्काराश्रयत्व घडेना ॥ म्हणून कर्मादिसंस्काराश्रयत्वास आश्रय ऐसें एक अंगिकार न केलियानें कृतनाश अकृताभ्यार्गंमादि दोष जे ते येत आहेत म्हणूनही ॥ कर्मादिसंस्काराश्रय ऐसें जे सूक्ष्मशरीर जें तेंच लोकांतरास जाव्याचें आणि याव्याचें म्हणून अंगिकार करावा ॥ ऐसें जरि जालें मराव्याचे उत्पन्न व्हावयाचें लांकांतरास जाण्याचेही लोकांतरीहुनि याव्याचेही ॥ पुण्यपाप कराव्याचेंही चेतन धर्माचेपरि कैसे भासते म्हणाल तरि ॥ व्यापक ऐसा जो आत्मा जो त्सास सूक्ष्म शरीरास प्रधान अवएद ऐसे जे अंतःकरण त्याचेठाई प्रतिबिंबद्वारा त्या सूक्ष्म शरीरास अध्यास आला येणेंकरून अग्नीसी तादात्मेकरून आयःपिंड जो तो जैसा अग्निसारिखा भासतो तैसे ते सूक्ष्मशरीर जे तेहि चेतनासारिखें भासतें ॥ या सूक्ष्मशरीरासी तादात्मेंकरून स्थूळशरीर जे तेहि चेतनासारिखे भासतें ॥ या सूक्ष्मशरीरासी तादात्मनेंकरून स्थूळशरीर मोहास्तव चेतनासारिखें दिसते ॥ या कारणास्तव मरण उत्पन्न होणे इत्यादिक धर्मं जे ते मोहास्तव चेतनधर्माचेपरी दिसताहेत ॥ या कारणास्तव स्थूळशरीरही सूक्ष्मशरीरही कारणशरीरही अंतःकरणाचेठाइंचा आत्मा प्रतिबिंबही या इतक्यास अधिष्टानभूत चैतन्य जे तेंही इतकीही मिळुन मोहास्तव पित्रादिशब्दास अर्थ होउन भासताहेत ॥ विचार करिता ते तितकींही त्यास त्यास वाचक ऐसे जे शब्द तेहीकरून बोलिजेते म्हणून पित्रादिशब्दास यामध्ये येकही अर्थ होत्साता दिसत नाहीत ॥ जन्ममरणादिक जे स्थूळशरीरासच प्रत्यक्षेकरून देखिलें आहे म्हणून गमागमादिक्रियाश्रयत्व जें तें परिछिन्न ऐसी जे वस्तू जे तीसच प्रत्यक्षेकरून देखिलें आहे म्हणून पुण्यादिक्रियालक्षण विकाराश्रयत्व जे ते विकारी ऐसी जे वस्तू जे तीसच सिद्ध होउन आहे ॥ म्हणूनही द्रष्टा नित्य व्यापक चैतन्यस्वरूप ॥ ऐसा जो आत्मा त्यास हे बोलिले ऐसे जे धर्म जे यामध्यें येकही धर्म नाही म्हणून भासते ॥ पूर्वोक्त स्वरूपभूत ऐसा जो आत्मा त्यास मोहेंकरून प्राप्त ऐसे जीवत्व जें तेही लोकांतरास गमनागमनादिक जे तेही पित्रादिशब्दवाच्यत्व जे तेही ज्याचेठाइं अध्यासद्वारा आलें आहे तेंच स्थूळशरीर व्यतिरिक्त सूक्ष्मशरीर म्हणून जाणाव्यायस योग्य ॥ आणिखीं युक्त्यंतरेकरूनही स्थूळशरीराहून सूक्ष्म शरीर जे ते भिन्न म्हणूनच भासतें ॥ ते युक्त्यंतर कोणतें म्हणाल तरि बोलूं ॥ आतां विचित्र होत्साते नानाविध होत्साते ऐसे जे व्यापार जे व्यापार जे ते जेणेकरून करिजेतें तेच सूक्ष्मशरीर ॥ हे व्यापार अवघेही स्थूळशरीरें करूनच करिजेत आहेत म्हणून बोलूं ॥ तरि प्रेतशरीरेकरून व्यापार जाले पाहिजेत ॥ तैसे देखिजेत नाहीं ॥ म्हणुन स्थूळशरीराहुन व्यतिरिक्त ऐसे सूक्ष्मशरीर जे तेणेकरून करिजेत आहे ऐसे भासतें ॥ ऐसे काशास बोलावें ॥ आत्माच सकळ धर्मातेंही करितो म्हणून बोलू तरि ॥ आत्मा व्यापक होत्साता आहे म्हणून आकाशादिकांचेठाइं असणार आत्मा जो तेणेही कर्म केले पाहिजे ॥ तैसे करीत नाही म्हणुन आत्मा कर्म करितो म्हणून बोलता नये ॥ एसे तरि आकाशादिकाचे ठाइं असणार आत्मा जो तेणे कर्म न केले न करो स्थूळशरीरास मिळुन असणार जो आत्मा तो कर्म करिताहे म्हणून बोलूं तरि ॥ प्रेतशरीरास मिळुन असणार जो आत्मा तेणेंही कर्म केले पाहिजे तैसे करिजेत नाहीं ॥ म्हणून स्थूळशरीरासी मिळुन असणार जो आत्मा तो कर्म करितो म्हणुन बोलता नये ॥ एसे तरि आत्म्यास मिळुन असणार जे स्थूळशरीर की कर्म करिते म्हणून बोलूं तरि ॥ व्यापक ऐसा जो आत्मा त्यासी मिळुन असायाचें प्रेतशरीर जे त्यानेंही कर्म केले पाहिजे ॥ तैसे देखिजेत नाही ॥ या कारणास्तव आत्म्यासी मिळुन असायाचें स्थूळ शरीर जे ते कर्म करितें म्हणून बोलता नये ॥ याप्रकारें केवळ स्थूळ शरीर जे ते कर्म करितें म्हणून बोलता नये ॥ याप्रकारें केवळ स्थूळ शरीर जें ते कर्म करणार ऐसें देखिले नाही ॥ केवळ सद्रूप जो आत्मा जो तोही कर्म करणार ऐसें देखिले नाही ॥ स्थूळशरीरास मिळुन असणार आत्मा जो त्यातें कर्म करणार ऐसे देखिले नाही आत्म्यासी मिळुन असणार जे स्थूळशरीर तेही कर्म करावयाचे देखिलें नाही ॥ याप्रकारे असतांही नानाविध ऐसी जे कर्मे ते तें करणार ऐसे तदसते ॥ हे कर्मे अवघीही जेणेकरून करिजेते तेच सूक्ष्मशरीर ॥ सद्रूप आत्मा तरि व्यापक होत्साता आहे म्हणून निरएव निर्विकार होत्साता आहे ॥ अद्वितीय होत्साता आहे म्हणूनही तो येकासि मिळत नाही ॥ त्याहुन अन्य ऐसी वस्तू नाही म्हणून त्यास येकही मिळुन असत नाही ॥ कर्में अवघेंही कारकसापेक्ष होत्सातीं आहेत म्हणून आत्मा येकही कर्म तरी न करितांही तैशा आत्म्याचेठाइं अनादि होत्साते कल्पित अविद्या म्हणायाचें अज्ञान जे तेणेकरून कल्पित ऐसें अपंचीकृत पंचमहाभूतद्वारा कल्पीत्त होत्साती आत्मसत्तेस्तव सदा सारिखें भासायाचें सूक्ष्मशरीर मिळुन समस्त कर्म जे त्यातें करिते ॥ याप्रकारें असायाचे सूक्ष्मशरीर जें तें स्थूळशरीररासारिखें काही दिसत नाही ॥ न दिसले तरि हे सूक्ष्मशरीर जे ते स्थूळशरीरासी मिळुन कर्म जें तें केले जरी ते कर्म जे ते सूक्ष्मशरीरेकरून करिजेते म्हणून कैसे जाणावें म्हणाल तरि बोलूं ॥ हे सूक्ष्मशरीर जे तें सूक्ष्म म्हणून स्थूळशरीरासारिखें दिसत नाही लोकाचेठाइं जे जे वस्तु कर्मास कर्ता होत्साती आहे ते वस्तजु येकांतें आश्रायुन कर्मातें ( करावयाचेंही तैसें कर्म जे ते केलें जरी ज्या ज्या वस्तूतें आश्रायुन - असा जास्त मजकूर एका प्रतीत आहे ) करिताहेत तें ॥ तें कर्म जे तें आश्रायि जो तेणेकरून करिजेल ऐसें अग्न्यादिकाचेठाइं भासते ॥ तैसे सूक्ष्म शरीरही स्थूळशरीरातें आश्रयून सकळ कर्मे जे ते केली जरी आश्रइ ऐसें सूक्ष्मशरीर जे त्याचीच कर्मे समस्तही ॥ याकारणास्तव या कर्मद्वारा स्थूळशरीरासारिखें सूक्ष्मशरीर जे ते हि या स्थूळ शरीराहुन भिन्न ॥ ऐसें विचार कर्ता जो पुरुष त्यास भासतें ॥ माझें चक्षु माझे श्रोत्र माझे वाक् माझे प्राण माझे अंतःकरण माझी बुद्धि म्हणायाच्या अनुभवेंकरूनही स्थूळशरीराहुन भिन्नत्व करून सूक्ष्मशरीर येक भासतें ॥ याप्रकारें कार्यरूप ऐसी जे स्थूळसूक्ष्मशरीरे जे तेहीकरून यास कारण होत्सातें ॥ आत्म्यास जीवत्वविषइं ईश्वरत्वविषई जगत्कारणत्वविषई उपाधि होत्साते अवयवादिक जे तेहीकरून अनिर्वचनीय होउन श्रुत्यादिक जे तेहीकरून प्रकृतिमाया अविद्या म्हणून प्रतिपादिले ॥ ऐसें कारण शरीर जें तें येक आहे म्हणुन बोलिलें जें ॥ तें इतकेंच नव्हे मी अज्ञानी मी जड मी काही जाणत नाही म्हणायाचा अनुभव जो तेणेंकरूनही कारणशरीर येक आहे म्हणुन बोलिजेते ॥ याप्रकारेंकरूनही समस्त प्राण्यास तीनि शरीरें आहेत म्हणून निश्र्चय केला ॥ याप्रकारें आत्माही या तींशरीरातेंही जाणनार ऐशातेही या तींशरीरातें मिळुन असतांही आकाशाचेपरि या शरीरासी न मिळुन असनाऱ्याचेवाणी काळत्रयाचेंठाइं आहे म्हणून सद्रूप एसाही ॥ समष्टिव्यष्टिरूप ऐसा तो शरीरत्रयात्मक प्रपंचनिष्ट पदार्थांमध्ये येक पदार्थकरूनही आपण न भासून आपण समस्त पदार्थातेंही जाणतो म्हणून चिद्रूप ऐसा ॥ परमप्रेमास्पद म्हणून स्वानंदरूप ऐसा ॥ भासताहेच ॥ या प्रकारिचा आत्मा मी म्हणून मुमुक्षु जो तेणे जाणुये ॥ कार्य ऐसे जे शरीरत्रय तेही कारण ऐसे जे शरीरत्रय तेही कारण ऐसे जे पृथ्व्यादिक जे तेही प्रत्यक्षेकरून भासत असतां श्रुत्यादिक जे तेहीकरून प्रतिपादिलें ॥ ऐसें जे अद्वितीयत्व जें तेही परिपूर्णत्व जे तेही आत्म्यास कैसे घडे म्हणाल तरि घडे ॥ ते कैसे म्हणाल तरि समष्टिव्यष्ट्यात्मक ऐसें जें शरीरत्रय तेंच प्रपंच म्हणायाचें त्या आत्म्याचे ठाइं आरोपित होत्सातें आहे म्हणून रज्वादिकाचेठाइं आरोपीत ऐसे जे सर्पादिक जे त्यास जैसे रज्जुमात्रस्वरूप ॥ तैसे आत्म्याचेठाइंही आरोपीत ऐसा जो प्रपंच त्याचें आत्माच स्वरूप ॥ आत्मव्यतिरिक्तेकरून वस्त्वंतर नाही या कारणास्तव आत्म्यास सद्वितीयत्वापादक वस्त्वंतर नाही म्हणुन आत्मा अद्वितीयच संदेही नाही ॥ जेव्हां आत्म्यास अद्वितीयत्व सिद्ध जालें तेव्हाच परिपूर्णत्वच सिद्ध जालें ॥ ते कैसे म्हणाल तरि आत्मास भ्रांतीकरून परिछेदकासारिखें दिसणार ऐसें जे देशकाळ वस्तू जे तें व्यतिरिक्तें करून नाहीसें जालें म्हणून त्रिविधपरिछेदशून्यत्वस्वरूप ऐसे जे परिपूर्णत्व जे तेच सिद्ध जालें ॥ या प्रकारिचा जो आत्मा तोच मी म्हणुन मुमुक्षु जो तेणे जाणूये ॥ याप्रकारें जो जाणतो त्यास काळत्रयाचे ठाइं प्रपंच जो तो नाहीं ॥ ऐसें जालें जरी प्रारब्ध जें तें जोपर्यंत आहे तोपर्यंतही देहेंद्रियादि प्रपंच जो तो मिथ्याभूत होत्साता असूंये ॥ तैसे भासणें जे तेणेंकरून जीवन्मुक्तीस मिथ्याभूत होत्साते जे सुखदुःखप्रतीति जे तीनेंकरून बाध नाही ॥ मिथ्या म्हणता कोणते म्हणाल तरि रज्जुसर्पाचेपरि स्वाधिष्टानज्ञान जे तेणेकरून बाधेतें पावावयाचेंही स्वप्नमनोराज्यादिकांचे परि पाहत असतां नाशातें पावावयाचेंही ॥ मृगजळाचेंपरिं अनिर्वचनीयही ॥ घटादिकाचेपरी सत्ताराहित्य होत्सातें भासावयाचेंही ॥ शास्त्राचेठाइं बोलिले मिथ्यात्वलक्षण जे तें हें समष्टिव्यष्ट्यात्मक देहोंद्रियादिप्रपंच जो याचेठाइं आहे ॥ याकारणास्तव पारमार्थिकस्वरूप ऐसा जो आत्मा तोच परतत्व ॥ आत्म्याहून भिन्नासारिखें भ्रांतिस्तव भासायाचें जग जे ते मिथ्या म्हणाव्याचेविषइं संदेह नाहीं ॥ या कारणास्तव जो कोणी शास्त्रार्थ साधनसंपन्न होत्साता परमार्थाद्वितीय परिपूर्णसच्चिदानंद ऐसा आत्मा मी मज व्यतिरिक्तकरून जग नाहींसे भासले जरी हे मिथ्याभूत जे जग एणेंकरून मज स्पर्शच नाही ॥ म्हणून संशय असंभावना विपरीतभावनादिक जे तेहीकरून रहित होत्साता जो जाणतो तो जीवन्मुक्त ॥ तोच विद्वांस ॥ सकळशास्त्र जें तेहीकरून तोच प्रतिपादिजेतो तोच समस्तांसही पूज्य म्हणून शास्त्र सिद्धांत ॥ या अर्थी संशय नाही सिद्ध ॥

॥ श्रीराम समर्थ ॥

स्मृतेः सकल कल्याण भाजनं यत्र जायते ॥

पुरुषस्तमजं नित्यं व्रजामि शरणम् हरिम् ॥

ऐसा जो आत्मा तोच परतत्व ॥ आत्म्याहुन भिन्नासारिखें भांतिस्तत्व भासायाचें जग जें तें मिथ्या म्हणाव्याचे विषइं संदेश नाहीं ॥ याकारणास्तव जो कोणी शास्त्रार्थसाधनसंपन्न होत्साता परमार्थाद्वितीय परिपूर्णसच्चिदानंद ऐसा आत्मा मी मजव्यतिरिक्तकरून चें जें तें आपणास देताहेत तेच कृतार्थ म्हणूनही या शरीरातें जो रक्षितो त्यास परलोक सिद्ध आहे आमचें दर्शन ज्यास प्राप्त होते त्याची पापें संपूर्ण नाशातें पावताहेत आमची पादरेणु जे तीतें जो मस्तकीं धरितो तोच कृतार्थ म्हणुनही आमचेठाइं इतकी महिमा नाही जरि अवघेही आमची उपासना किन्निमित्य करितील उपासना तरि करिताहेतकीं या कारणास्तव आम्हीच मोटे संदेह नाहीं ॥ बहुप्रकारे बोलावयाचे काय आहे ॥ या शरीरातें वंचना करून मनोवाक्कायेकरून इश्वरभावेंकरून जे कोण्ही पूजा करताहेत त्यास मोक्ष करस्थ संदेह नाही सिद्ध याप्रकारें अनर्थरूप याव्याची ऐसी जे चित्तवृत्ती तीचे नाम जे तीस असुर वासना प्रतीबंध म्हणून बोलिजेते हा प्रतिबंध तो तो महाअनर्थ म्हणून अनात्मविषय आत्मज्ञानास विरोधी म्हणून हे मुमुक्षु जो तेणेही प्रतिबंध जो तो विचारून टाकाव्याचें योग्य ॥ हा प्रतिबंध जो तो असतां श्रवणादिक जे ते जो करितो त्यास त्या जन्माचेठाइं ज्ञान नव्हे ॥ ऐसें तरि श्रवणादिक जे ते जो करितो त्यास या जन्माचेठाइं ज्ञान नव्हे ॥ ऐसें तरि श्रवणादिक जे ते व्यर्थ होताहेत काय म्हणाल तरि नव्हेत ॥ अश्वमेघादि ऋतु अन्य केले त्यास जे लोक प्राप्त त्या लोकाप्रति जाउन बहुकाळ भोग जे त्यातें अनुभउन त्यानंतर ब्रह्मनिष्ट कुळाचेठाइं उत्पन्न होतो ॥ उत्पन्न जाल्यानंतर संसारासक्त होत्साता असिला जरीं पूर्वजन्मवशास्तव श्रवणादिकाचेठाइं आसक्ति करितो ॥ त्यानंतर आपणास प्रतिबंध जे तें आहेत काय म्हणून विचार करून प्रतिबंधाची निवृत्ति करून श्रवणादिक करून जे ते श्रवणादिक जे तेहीकरून ज्ञान संपादून मुक्त होतो म्हणून श्रुतिस्मृतिइतिहासपुराणादिक जे ते बोलताहेत याप्रकारें करून जो प्रतिबंधाते दुरि करून श्रवणादिक जे जे तेहीं करून ज्ञान संपादिजे तो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ श्रवणमनननिदिध्यासन जे त्यातें संपादितो ॥ श्रवण म्हणतां समस्त वेदांत जे त्याचे षड्विधिलिंगेकरून ब्रह्मस्वरूप ऐसा जो आत्मा त्याचेठाइं तात्पर्य म्हणून बुद्धीचा निश्र्चय जो तोच श्रवण म्हणुन बोलिजोतो ॥ मनन म्हणजे श्रृत्यर्थाते ऐकुन ऐकिला जो अर्थ त्यास युक्तिकरून येकवाक्यता करून चिंतन करणे ॥ त्यास मनन म्हणून बोलिजते निदिध्यासन म्हणता विजातीय ऐसे जे कामक्रोधादिक अज्ञान यातें टाकुन सजातीय ऐसें जें अहं ब्रह्मास्मि अहंब्रह्मास्मि म्हणायाचें निरंतर चिंतन जे ते निधिध्यासन म्हणून बोलिजेत ॥ याचे प्रयोजन कोणतें म्हणाल तरि बोलूं ॥ सर्वदा श्रवण जे ते सकळ संशयातें दुरि करितें सर्वदा मनन जे तें असंभावनेतें दूरी करितें सर्वदा निदिध्यासन जे ते विपरितभावनेते दुरि करितें ॥ प्रतिबंधबाहुल्य ज्यास आहे त्याने सर्वदा हे तिन्ही करावी ॥ प्रतिबंधनिवृत्ति सूक्ष्म आहे बुद्धि ज्याची त्यास श्रवणकाळाचेठाइं मनननिदिध्यासन सिद्धि होते ॥ ते कैसी म्हणाल तरि बुद्धिवंत जो तो गुरु जे त्सासी श्रवणकर्त्तेकाळीं युक्ति ज्या तेहीकरून वाक्यार्थालोचन करून अर्थास येकवाक्यता करितो तेच त्यास मनन जालें ॥ चित्त विषयाचे ठाइं न जाऊन श्रवणमननच करून संशयादिरहित होत्साते ऐसे जें स्वरूप जे याचेठाइं चित्तास येकाग्रें करून स्थिर करितो म्हणून निदिध्यासही सिद्धच ॥ जो कोणी मूढ होत्साता प्रतिबंधसहीत आहे त्यानें श्रवणमनननिदिध्यासन जे ते वारंवार करावें ॥ जो सूक्ष्मबुद्धि होत्साता प्रतिबंधरहित आहे या श्रवणकाळाचेठाइं मनननिदिध्यासन सिद्ध होतें या अर्थाचेठाइं संशय नाही सिद्ध ॥ संशय असंभावना विपरीतभावना कोणता म्हणाल तरि मार्गाचेठाइं जाणार पुरुष जे तेणें दीर्घाकार ऐसा जो स्थाणू जो त्यातें पाहून हा स्थाणु किंवा पुरुष ऐसी याव्याची चित्तवृत्ती तीस संशय म्हणुन नाम ॥ असंभावना म्हणतां येथे स्थाणु याव्यास कारण काय स्थाणु येऊं न शके म्हणून याव्याची चित्तवृत्ति तीचे नाव असंभावना ॥ विपरीत भावना म्हणतो हा सर्वात्मना स्थाणु नव्हे पुरुष म्हणून निश्र्चय करून ऐसी जे चित्तवृत्ति तीचे नाम विपरीत भावना ॥ याचप्रकारें द्राष्टांतिकाचेठाइंही प्रमाणगत संशय म्हणून प्रमेयगत संशय म्हणून प्रमाणगत असंभावना म्हणून प्रमाणगत विपरीतभावना म्हणून दो प्रकारिचें ॥ प्रमाणगत संशयातें निरोपितों ते कैसि म्हणाल तरि श्रुतिप्रमाण जे ते कर्मातें प्रतिपादिजेतें अथवा सिद्ध ऐसे जे प्रत्यक् ब्रह्म यातें प्रतिपादितें म्हणून याव्याची चित्तवृत्ति इस प्रमाणगत संशय नाम ॥ प्रमेयगत संशय म्हणता ब्रह्म जे ते जगत्कारण अथवा प्रधान जगत्कारण ॥ जग नाही भासलें जरी हे मिथ्याभूत जें जग येणेंकरून मज स्पर्शच नाहीं संशय असंभावना विपरीतभावनादिक जे तेणेसी रहित होत्साता जो जाणतो तो जीवन्मुक्त तीच विद्वांस सकळ शास्त्रें जे तेही करून तोच प्रतिपादिजेतो तोच समस्तांही पूज्य म्हणून शास्त्रसिद्धांत या अर्थी संशय नाही सिद्ध ॥

इति देहत्रयविवरणप्रकरण पंचोदशो वर्णक समाप्तम् ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP