विवेकसार - षोडश वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥ श्रीगणेशाय नमः ॥

तापत्रयाचें स्वरूप जें त्यातें निरोपितों तापत्रय कोणते म्हणाल तरि आध्यात्मिक ताप म्हणून ॥ अधिभौतिक ताप म्हणून ॥ अधिदैविक ताप म्हणून तीप्रकारिचे ॥ अध्यात्मिक ताप म्हणतां शरीरातें ॥ अधिष्ठुन याव्याचे क्षयरोग शीतज्वर शनिपात शिरोवेथा उदरवेथा मूळव्याधि आदिकरून रोगादिक जे ते तेहीकरून ऐसे जे दुःख जे त्यास अध्यात्म ताप ऐसे नाम ॥ अधिभौतिक ताप म्हणतां मनुष्य जे तेहीकरून हस्ती जे तेहीकरून व्याघ्रादिक जे अरण्यपश्वादिक जे तेहीकरून श्वानसुकरादिक जे जे ग्रामश्वापदादिक जे तेहीकरून याव्याचे दुःख तें आधिभौतिक ताप म्हणौन नाम ॥ अधिदैविक ताप म्हणतां शीतेंकरून उष्णेकरून अग्नीकरून जळेंकरून पर्जन्येंकरून वीजेकरून वायु जो तेणेंकरून गोपुरमंडपदेवालयादि अचेतन जे तेहीकरून येणार जे दुःख जे त्यास अधिदैविक ताप म्हणून नाम ॥ याप्रकारेंकरून तापत्रयाचें स्वरूप ॥ हे तापत्रय जे ते शरीरत्रयासच परंतु देहोंद्रिकांचा साक्षी जो मी मज नाही ॥ म्हणून जो जाणतो तोच मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ ज्ञानास प्रतिबंधक ऐसे जे प्रतिबंधत्रय जे त्यातें चि ॥ त्याची निवृत्ति जे ॥ तीतें निरूपितों ॥ प्रतिबंधत्रय कोणते म्हणाल तरि ॥ भूतप्रतिबंध । वर्तमानप्रतिबंध । भविष्यप्रतिबंध । म्हणून त्रिप्रकारिचे आहेत यामध्यें भूतप्रतिबंध कैसा म्हणाल तरि निरोपितो ॥ बहुकुटुंबी ऐसा जो येक ब्राह्मण जो तो तेणें जीवनार्थ येका म्हसीतें संपादिले ॥ त्यानंतर त्या म्हैसीचे दुध दही तूप ते विक्रय करून त्या द्रव्येंकरून पुत्रभार्यादिक जे त्यांते संरक्षण करित होत्साता ॥ सर्वदा त्या म्हैसीतें गवत सरक्या येहीकरून संरक्षण करून तदेकनिष्ट होउन होता ॥ याप्रकारे कित्तेक काळ क्रमिले ॥ त्यानंतर कर्मवशास्तव पुत्रभार्यादिक जे ते नाशाते पावले ॥ त्यानंतर येक आपण उरला नंतर विचारी पडून हा संसार सत्य म्हणून विश्वासलों होतो स्वप्नासारिखा नाशातें पावला ॥ संसाराचेठाइं त्यास तुच्छत्वबुद्धि येउन आतां संसाराचेठाइं राहूं नये म्हणून वैराग्य निर्माण होउन सन्यास करून सद्गुरुपासीं श्रवणादिक केले ॥ ते गुरुजे तिही सांगाव्याचा अर्थ जितुका तितुका काही सांगितला ॥ याप्रकारे असतां येका समयाचे ठाइं गुरु जे ते शिष्यातें बलाउन आजिवरि श्रवणादिक केलें ॥ की कृतकृत्य ॥ म्हणून चित्ताचेठाइं आहे किंवा आणिखी काही कर्तव्यता आहे ॥ म्हणून पुसतां तो शिष्य जो तो आणिखी कांही पाहात नाही पूर्वाश्रमाचेठाइं आपण येक म्हैस होती ते म्हैस मृत होउन गेली ते म्हैसच श्रवणकाळाचे ठाइंही मननकाळाचेठाइंही निदिध्यासनकाळाचेठाइंही साक्षात्कार होऊन आहे इतकेच ॥ परंतु आणखि काही देखत नाही ॥ गुरुस यथार्थ सांगितले म्हणून ते गुरु जे तेही हा भूतप्रतिबंध म्हणून विचार करून या प्रतिबंधाते दूरि करावयाकारणें त्या म्हैसीचेठाइ स्नेहातें अनुसरूनच उपदेश केला ॥ तो उपदेश केलाप्रकार बोलूं ॥ गुरु जे तेही येरे शिष्या म्हणून पाचारून साक्षात्कार जाली ऐसी जे ते अतिप्रियमात्र जे ते मीच म्हणून चिंतन करी ऐसा उपदेश केला याप्रकारे चिंतन करिता ते नामरूप जे तें भासेनासे जालें ॥ न भासे ऐसे जाल्यानंतर सच्चिदानंदस्वरूप ऐसा तोच मी म्हणून साक्षात्कार होउन कृतकृत्य जाला ॥ म्हणून लोकाचेठाइ प्रसिद्ध अस्ति भाति प्रिय म्हणून नामरूप म्हणून पंचावएव जे तीहीसी मिळुन आहे ॥ नामरूप दोनी जे त्यातें दुर करून याप्रकारें विद्यारण्यस्वामी जे ते प्रतिबंधत्रय जे त्याते त्याचि निवृत्ति जे तीते पंचदश प्रकरणाचेठाइं निरोपिले ॥ वर्तमानप्रतिबंध कोणता म्हणाल तरि बोलूं विषयासक्तिलक्षण प्रज्ञामांद्य कृतर्क विपर्यय दुराग्रह म्हणून चौप्रकारिचे आहेत ॥ विषयासक्तिलक्षण म्हणता समस्तविषयाचे ठाइंही रूढ आसक्ति ॥ प्रज्ञामांद्य म्हणता सांगितला जो अर्थ तो सर्वात्मना बुद्धीच्याठाइं आरूढ न व्हाव्याचे ॥ कुतर्क म्हणतां गुरुने सांगितला जो अर्थ त्यास विपरीत अर्थातें बोलावे ॥ विपर्यय दुराग्रह म्हणता मी श्रोत्री मी पंडित मी विरक्त म्हणुन देहेंद्रियादिकाचे ठाइं आत्मबुद्धि ॥ हे चारिही वर्तमान प्रतिबंध म्हणुन निरुपिले याचि निवृत्ति कैसी म्हणाल ॥ तरि शम दम उपरति तितिक्षादिक जे येहीकरून विषयासक्ति लक्षण जाते ॥ पुनः पुनः श्रवण जे तेणेंकरून प्रज्ञामांद्यत्व जातें ॥ मनन जे तेणेंकरून कुतर्क जातो ॥ निदिध्यासन जे तेणेकरून विपर्यय दुराग्रह जातो ॥ याप्रकारेकरून प्रतिबंधाचा नाश होत असतां मुमुक्षु जो त्यास मीच आत्मस्वरूप म्हणुन बुद्धिचेठाइं निश्र्चय होतो ॥ आगामी प्रतिबंध म्हणता कोण्यावेळेस येतो कळेना ॥ तो प्रतिबंध जो पापकर्म तेणेकरून येतो ॥ त्यातें कैसे जाणावें म्हणाल तरि उपस्थीत ऐसे जे पापकर्म जे तें मुमुक्षु जो त्यास एका विषयाचेठाइं रूढ होत्साती दयारूप होत्साती आसक्ति जे तीतें निर्माण करिते तो भावी प्रतिबंध म्हणुन जाणुन मी अकर्ता असंग ऐसा जो मी त्या माझे हे आसक्तीते भावी प्रतिबंध म्हणुन जाणुन मी अकर्ता असंग ऐसा जो मी त्या माझे हे आसक्ति काय करू पाहाते ॥ म्हणुन त्या आसक्तीनें न गणुन राहिला जरि ते आसक्ति जे त्यास कित्तेक जन्माते न देता राहेना ॥ तो भावी प्रतिबंध जो तो जन्मातें देतो म्हणुन कोठें बोलिलें आहे म्हणाल तरि ॥ श्रुतिस्मृतिपुराणादिकाचेठाइं बोलिले आहे ॥ रामदेवास येक जन्म दिधला ॥ भरतास तिनि जन्म दिधले ॥ आणिखी कितेकास अनेक जन्म दिधले ॥ म्हणुन बोलिले ॥ या कारणास्तव मुमुक्षु जो तेणे प्रतिबंधत्रयातें बरे विचारून प्रतिबंध न ये ऐसे करावें ॥ न केलियाने त्यास कितेक जन्म येत आहेत संदेह नाही सिद्ध ॥ जन्माचेठाइं नाशातें पाऊन जात आहेत त्यास याच जन्मी मुक्ति ॥ या प्रतिबंधत्रयामध्ये येक प्रतिबंध असिला जरि त्यास या जन्माचेठाइं मुक्ति नाही सिद्ध ॥ अध्यात्मक

अधिभूत अधिदेवत कोणते म्हणाल तरि बोलूं ॥

श्रोत्र अध्यात्म शब्द अधिभूत दिशा अधिदैवत ॥

त्व अध्यात्मक स्पर्श अधिभूत वायु अधिदैवत ॥

चक्षु अध्यात्मक रूप अधिभूत आदित्य अधिदैवत ॥

जिव्हा अध्यात्मक रस अधिभूत वरुण अधिदैवत ॥

घ्राण अध्यात्मक गंध अधिभूत अश्विनौ अधिदैवत ॥

वाक् अध्यात्मक वक्तव्य अधिभूत इंद्र अधिदैवत ॥

पाद अध्यात्मक विसर्ग अधिभूत उपेंद्र अधिदैवत ॥

पायु अध्यात्मक विसर्ग अधिभूत मृत्यु अधिदैवत ॥

उपस्थ अध्यात्मक आनंद अधिभूत प्रजापति अधिदैवत ॥

मन अध्यात्मक मनन अधिभूत चंद्र अधिदैवत ॥

बुद्धि अध्यात्मक निश्र्चय अधिभूत ब्रह्मा अधिदैवत ॥

अहंकार अध्यात्मक अभिमान अधिभूत रुद्र आधिदैवत ॥

चित्त अध्यात्मक धारणा अधिभूत क्षेत्रज्ञ अधिदैवत ॥

तम अध्यात्मक विकार अधिभूत इश्वर अधिदैवत ॥

हे इतुकीही मिळुन जाग्रत स्वप्न सुषुप्ति अवस्था जाल्या ॥ अवस्थात्रयास साक्षी होत्साता निर्विकार होत्साता आनंदस्वरूप होत्साता मी आत्मा म्हणून जो जाणतो त्यास जन्म नाही म्हणुन वेदांत सिद्धांत ॥ नवविधा संस्कार निरूपितो ते कैसे म्हणाल तरि ज्ञाता ज्ञान ज्ञेय म्हणून ॥ भोक्ता भोग्य भोग म्हणुन कर्ता कारण क्रिया म्हणुन हे नवविधा संस्कारही आणखीं पक्षांतर बोलतो ॥ पंचमहाभूतेही ज्ञानेंद्रियेहीं कर्मेंद्रियहीं प्राणादिकपंचकही मनादिचतुष्टहीं स्थूळशरीर हें त्रिविधकर्मही अवस्थात्रयही यास कारण ऐसे जे अज्ञान तेहीमिळुन नवविध संस्कार बोलिले जे तो यासच नवविधा प्रपंच म्हणून बोलिजेत ॥ हा नवविधा संस्कार जो तो अहंकारासच साक्षीस्वरूप जो मी मज नाही ॥ म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणुन वेदांत अवघेही बोलताहेत या अर्था संशय नाही सिद्ध ॥ ज्ञानेंद्रियाणि खलु पंच तथापराणि । कर्मेंद्रियाणि मन आणि चतुष्टयंच ॥ प्राणादिपंचकमथो वियदादिपंच । कामश्र्च कर्म च तमः पुरमष्टमीयुः ॥१॥ याचा अर्थ ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रिये मनादिचतुष्टमय प्राणादिपंचक वियदादिपंचक काम कर्म व अज्ञान या आठास पूर्य म्हणून नाम ॥ वैराग्य बोध उपरति याचे हेतु स्वरूप कार्य यातें याचि अवधि जे तीतेंही निरूपिजेत आहे ॥ हे वैराग्य बोध उपरति जे ते विवेकी जे त्यांचे ठाइं येकयेकास साह्य होउन प्रायशः मिळुन असताहेत ॥ कर्मवशास्तव येकयेका समयाचे ठाइं येखादे पुरुषाचेठाइं नाहीसे असूयें ॥ ते वैराग्य बोध उपरति जे त्यास हेतु कोण स्वरूप काय कार्य कोणते म्हणून विचार करून प्रत्यकेंकरून मुमुक्षु जो तेणें जाणूयें ॥ त्यामध्यें वैराग्याचे हेतु स्वरूप कारण कोणतें म्हणाल तरि ॥ समस्त ऐसें जे विषय त्याचेठाइ दोषदृष्टि जे ते हेतु ॥ त्या विषयाचेठाइं तुच्छत्वबुद्धि येउन देहधारण व्यतिरिक्त ऐसे जे विषय जे त्यातें वांताशनमुत्रपुरिषादिक याचेंपरि नलगे म्हणून त्याग करावयाचे स्वरूप ॥ त्या विषयांते नानुभवुन किन्निमत्य त्याग केला म्हणुन फिरउन त्याचे ठाइं असक्ति न येउन असाव्याचें कार्य ॥ हे तिन्हीही वैराग्याची असाधारण हेतुस्वरूप कार्य ॥ बोधास हेतुस्वरूप कार्य कोणते म्हणाल तरि श्रवण मनन निदिध्यासन जे तें हेतु त्या श्रवणादिकेंकरून देहेंद्रियप्रपंच जो याहून आत्मस्वरूप जे तें वेगळे करून अद्वितीय आत्मस्वरूपच मी ॥ देहेंद्रियादिक प्रपंच मी नव्हे हा प्रपंच भासला जरि काळत्रयाचेठाइंही म्हणून बुद्धीचेठाइं दृढनिश्र्चय जो तो याव्याचें बोधास स्वरूप मागत्यान परतून आत्मस्वरूप ऐसे जे देहोंद्रियादिक जे मी म्हणून येउन असायाचें कार्यं ॥ हे तीन्हीही बोधाची असाधारण हेतुस्वरूप कार्य ॥ उपरति तिची हेतुस्वरूप कार्य कोणते म्हणाल तरि यमनियम जे ते हुतु । चित्तनिरोधस्वरुप । सर्व व्यवहार नाश कार्य ॥ हे तीन्हीही उपरतिस असाधारण हेतुस्वरूप कार्य ॥ याप्रकारें वैराग्य बोधोपरति जे ते अन्योन्यसांकर्य न होता बोलिले ॥ वैराग्य बोधोपरति जे ते तीन्हि मोक्षास समप्राधान किंवा एक दोनि प्रधान येक उपसर्जन ॥ किंवा येक प्रधान दोनि उपसर्जन ॥ म्हणाल तरि साधनांतरे नापेक्षुन प्रत्यक्षेंकरून मोक्षातें देतो म्हणून बोधच येक प्रधान ॥ वैराग्य उपरति दोन्ही जे ते बोधास साधन ॥ हे तीन्हीही येका पुरुषाचेठाइं असिलि जरि तरि मोठ्या तपाचे फळ ॥ येका पुरुष विशेषाचेठाइं येकास कर्मदशास्तव प्रतिबंध होतो ॥ ज्या पुरुषास वैराग्य उपरति जे ते पूर्ण होउन आहेत आणि बोध नाही त्यास मोक्ष नाहीं ॥ ऐसें तरि वैराग्योपरति व्यर्थ होत आहेत काय म्हणाल तरि व्यर्थ होत नाहीत तरि काय म्हणाल तरि वैराग्योपरति जे ते तप जालें म्हणुन तेणेकरून पुण्यलोकवास जे ते आहे ॥ ज्या पुरुषास बोध जो तो पूर्ण होउन आहे वैराग्योपरति जे ते नाही त्यास मोक्ष सिद्ध ॥ ऐसें तरि हे वैराग्योपरति जे ते याचे प्रयोजन कोणतें म्हणाल तरि प्रत्यक्ष दुःखनिवृत्ति न होय ॥ जन्मांतर अपेक्षा पडेल ॥ ऐसें तरि वैराग्यबोधोपरतिचा अवधि कोठवरि ॥ म्हणाल तरि ब्रह्मलोक तृणाकारबुद्धि होय तवपर्यंत वैराग्याची अवधि ॥ अज्ञानकाळीही देहेद्रियादिसंघात जो तो मीच म्हणुन दृढनिश्र्चय आल्यासारिखें आत्मत्व बुद्धि न येउन तैसे आत्मस्वरूपच मी म्हणून दृढनिश्र्चय ये तोपर्यंत बोधाची अवधि ॥ सुषुप्तिचेपरि जागृतवस्थेचेठाइं मुमुक्षु जो तो समस्त विषय जे त्यातें विसरून असायाचे जेव्हा सिद्ध होतें तों पर्यंत उपरतीची अवधि ॥ याप्रकारे वैराग्य बोधोपरति जे याचें तार्तम्य जे त्यातें अवधि जे तीतें बोलिल्यासारिखें जालें ॥ प्रारब्ध जे ते नानाविध होउन आहेत ॥ विवेकी जो त्याचे व्यापार जे त्यातें पाहुन शास्त्रार्थ याप्रकारें आहे ॥ हे याप्रकारें व्यवहार करीत आहेत ॥ म्हणून भ्रमाव्याचें प्रयोजन नाहीं ॥ त्याच्या त्याच्या कर्मेंकरून ते ते नानाविध व्यापार जे तेहींसीं मिळुन असिले जरी ज्ञान जे ते ज्ञानफळ ऐसी जे मुक्ति जे तेहि अवघियांस समान म्हणून शास्त्र सिद्धांत ॥ ज्ञानास प्रतिबंध ऐसें जें वासनात्रय जें त्यातें निरूपितो ॥ ते कोणते म्हणाल तरि लोकवासना देहवासना शास्त्रवासना म्हणून त्रिप्रकारिची ॥ यामध्यें लोकवासना म्हणजे कोणते म्हणाल तरि लोकाचेठाइं समस्त जे तेही निंदा न करित असिलें पाहिजे ॥ समस्त जे तिहि सर्वदा स्तुतीच केली पाहिजे ॥ या प्रकारिचा अभिनिवेश जो तो लोकवासना म्हणून बोलिजेतो ॥ हा जो लोकवासनारूप प्रतिबंध जो याची निवृत्ति कैसी म्हणाल तरि बोलूं ॥ म्या येकाकरून निंदेतें न पाउन आसावें आपली अवघींही स्तुतीच करावी म्हणाव्याचें इश्वरासहीं संपादिले जात नाही म्हणून अज्ञ जन जे ते निंदा करितील तरि करोत ॥ स्तुति कराल तरि करोत ॥ या निंदास्तुतीकरून आपणास आणि काय लाभ काय म्हणून जाणाव्याचेंच त्या प्रतिबंधास निवृत्ति ॥ ऐसें तरि इश्वराचींही निंदा करणार आहेत काय म्हणाल तरि आहेत ते कैसे म्हणाल तरि सर्वलोकेश्वर ऐसा जो चतुर्मुख ब्रह्मा त्यातें शंकर जो त्याचा पुत्र स्वामि कार्तिक जो तेणें सिक्षिला आहे म्हणुन त्या ब्रह्मदेवाची महिमा न जाणनार ऐसे जें पाखंडि जे ते तैशातेही निंदिताहेत ॥ इतकेच नव्हे समस्तासही आत्मस्वरूप लक्ष्मीपति एसा जो विष्णु जो तो सर्व जिवामध्यें येक जीव म्हणूनही शीव जो तेणेकरून सिक्षेते पावला आहे म्हणूनहीं निश्र्चय करून त्याची महिमा न जाणनार ऐसे जे पाखांडी जे ते तैस्यातेंहीं निंदिताहेत ॥ इतकेच नव्हे ॥ समस्तांसही गुरु होत्साता सुहृद होत्साता असणार जो महादेव जो तो दक्षप्रजापत्यादिक जे तेही करून दुषिला आहे ॥ म्हणून जाणून त्याचे महिमेतें न जाणनार ऐसें जे मध्यपाखांडी जे तैशातेंही निंदिताहेत ॥ तैसीच अंतर्यांमी जो यातेंही निरीश्वर सांख्य जे ते कित्तेक मिमांसक ज तेही अंतर्यामी नाही म्हणून निंदा करिताहेत ॥ याचप्रकारें इश्वर म्हणुन संमत ऐसें जे रामकृष्णादिक जे ते शुशुपाळादिक जे येहोकरून निंदेते पावले आहेत ॥ म्हणून पुराणादिकाचेठाइं देखिले आहे यास्तव पामर बहिमुर्ख ऐसे जे जन जे ते आमुतें निंदा न करित ऐसें म्हणायाचें बोलावें काय ॥ ऐसे असतां हे निंदा कोणाची म्हणुन विचार करिता आत्म्याची म्हणुन बोलिल्यानें अद्वितीय परिपूर्ण सर्वात्मक ऐसा जो आत्मा त्याची निंदा कोणीही करू न शके ॥ का करू न शके म्हणाल तरि तो आत्मा सर्व प्राण्याचेही स्वरूप म्हणून आपणास आपण निंदिल्यासारिखें होतें ॥ होइल तरि हो म्हणाल तरि लोकांचेठाइं अन्य अन्यातें निंदितां देखिले आहे ॥ लोकाचेठाइं येखादा आपल्या स्वरूपातें आपणच निंदितील तरि त्या निंदेकरून आम्हास आणि काय म्हणून जाणाव्याचें उचित ॥ ऐसे तरि देहातें निंदिताहेत म्हणून बोलिल्या तो देह जो तो मुमुक्षु जे तेहीकरून पूर्वीच निंदिला आहे म्हणून त्या देहातें पर जे तेही निंदा केली जरि ते निंदा मुमुक्षु जो त्यास लाभच ॥ तें कैसे म्हणाल तरि एकाचा शत्रुस दुसऱ्यानें निंदिल्यानें निंदा करणार जो त्सास जैसा प्रिय ॥ तैसेंच विवेकी जो तेणें आपल्या देहातें निंदा करणार जो तो आपणास प्रिय म्हणून जाणाव्यास योग्य ॥ या तीहीं शरीरामध्यें स्थूळशरीर निंदेसच योग्य उरली दोनि शरीरें जे ते दृश्य नव्हेत म्हणून निंदेस विषय नव्हेत ॥ हे शरीरेंच निदेस विषय नव्हेसी जालीं ॥ म्हणून सर्वातीत ऐसा ॥ समस्तांचा आत्मा स्वरूप ऐसा ॥ असंग ऐसा ॥ साक्ष स्वप्रकाशस्वरूप ऐसा ॥ जो मी जो मज कोणतीही निंदा स्पर्श करूं शकत नाही ॥ ऐसें बोलावें काय म्हणून विचार करणार पुरुष जो त्याचा लोकवासनास्वरूप प्रतिबंध जो तो नाशातें पावतो ॥ प्रपंचातीत परमानंदस्वरूप ऐसा जो मी जो मज कोणीहीकरून स्तुति केली जे ते अतिशयातें उत्पन्न करील म्हणून विचारयुक्त जो पुरुष जो याचा हर्षस्वरूप ऐसा जो विकार जो तो नाशातें पावतो ॥ या अर्थीं श्रुती स्मृती इतिहास पुराणे जे ते प्रमाण ॥ देहवासना म्हणतां कोणती म्हणाल तरि ॥ आयुष्य संपादावें म्हणुन आरोग्य संपादावे म्हणून लावण्य संपादावे म्हणुन ॥ येणार अभिनिवेश जो त्याचें नाम देहवासना ॥ आयुष्य म्हणतां कोणते म्हणाल तरि जिवंत असणार जे शरीर यास चिरकाळावस्थान ॥ देहाची स्थिति कर्माधीन असतां ते देहस्थतिही पुरुषप्रयत्नेंकरून संपादणे घडेना ॥ ऐसें घडेना ऐसें बोलतां नये ॥ लोकाचेठाइं कित्तेक योगाभ्यासेंकरून दीर्घकाळ आयुष्य जे त्यातें संपादिताहेत ॥ म्हणून पुराणादिकाचेठाइं ऐकिले आहे ॥ म्हणून बोलिलेत जरि ॥ योगाभ्यास जो तो अनात्मविषयच याकरितां ज्ञान जे तें नयेसे करितो ॥

याकारणास्तव देह कर्माधीन म्हणुन कर्मे जें तें जोपर्यंत असतें तोपर्यंत देह असतो ॥ या कारणास्तव देह बहुकाळ असावा म्हणाव्याविषीं मजकरून यत्न जो तो करावयाचें प्रयोजन नाहीं म्हणून मुमुक्षु जो तो उपेक्षा करावयाचें उचित ॥ हा अर्थ श्रुति स्मृति इतिहास पुराणेंकरून बोलिला आहे ॥ याचप्रकारें आरोग्य जे ते पुरुष जो तेणे संपादावयाचें न घडे ॥ ते कैसे म्हणाल तरि आरोग्यही कर्माधीन म्हणून पुरुषयत्न करून सिद्ध व्हावयाचें न घडे ॥ सिद्ध जालें जरि मुमुक्षुस त्यापासून लाभ कोणता आणि कोणती ॥ या आरोग्यसिद्धीकरून उत्पन्न जाला हर्षस्वरूप ऐसा जो विकार जो तोही ॥ आरोग्य सिद्धि जाली नाही म्हणुन उत्पन्न जाला जो दुःखस्वरूप विकार जो तोही ॥ अंतःकरणासच ॥ अंतःकरणसाक्षी मी जो मज हे विकार जे ते नाहीत ॥ म्हणून विचार करून आरोग्यसिद्धि जाली पाहिजे म्हणून जाणाव्याविषइं मुमुक्षु जो तेणें अभिनिवेश करूं नये ॥ हाच अर्थ श्रुति स्मृति इतिहास पुराणे जे तेहीकरून सांगितला आहे ॥ तैसेच अति लावण्यप्राप्ति ॥ पुरुष जो त्याचेठाई काळांतरि कुरूपप्राप्ति जे तीतें देखिलें आहे म्हणूनही लावण्य यावें म्हणावें याविषइं यत्न केला जरी तो यत्न व्यर्थ होउन जाव्याचें देखिले आहे म्हणूनही लावण्य कोणाच्या हातेंही संपादाव्याचें घडेना ॥ ते लावण्य संपादावें ऐसा अभिनिवेशपूर्वकरून याव्याची प्रवृत्ति जे ते समस्त ऐसी ॥ पारलौकिक प्रवृत्ति जे तीस विघातक होत्साती असुन अनर्थपरंपरा जे तीस हेतु जाली ॥ म्हणून ते लावण्य जे ते सिद्धि जाली पाहिजे म्हणाव्याविषइ अभिनिवेश जो याची मुमुक्षु जो तेणें उपेक्षा करायाचें उचित ॥ हाच अर्थ श्रुति स्मृति इतिहास पुराणें येहीकरून प्रतिपादिला आहे ॥ शास्त्रवासना म्हणतां शास्त्रपठणविषइं शास्त्रपठणविषइं शास्त्रानुष्टानविशइं व्यसन ॥ शास्त्रविषय ऐसा जो वासनारूप प्रतिबंध जो तो मोक्षसाधन ऐसें जें यातें प्रतिबंधन म्हणुन कसें बोलावें ॥ म्हणाल तरि भारद्वाज नारदादिक जे ते आदिकरून वेदशास्त्र जे ते त्यातें साकल्येंकरून अभ्यासूं म्हणून उपक्रम करून बहुदुःखातें पाउन असाध्य म्हणून मानुन सोडुन दिधलें ॥ ऐसें श्रुत्यादिकाचेठाइं ऐकिले आहे ॥ म्हणूनही वेदांत व्यतिरिक्त ऐसा जो अन्यशास्त्राभ्यास जो तो आत्माविचारास विरोधी म्हणुन तो प्रतिबंध म्हणुन बोलूं ये ॥ या कारणास्तव शास्त्रपठणही शास्त्रज्ञानही साकल्येकरून संपादावयाचें घडेना म्हणून मुमुक्षु जो तेणे त्यातें साकल्येंकरून संपादावें ऐसा अभिनिवेश जो तो टाकाव्याचें उचित ॥ लोकाचेठाइं शास्त्राभ्यास केला जरी त्यास पूर्वी अभ्यास केला त्याच्या विस्मरणेंकरून दुःखच भासतें ॥ आपण दुसऱ्यांसी वादुन जिंकिलें जरी हारिले जरी दुःखच भासते ॥ या कारणास्तव शास्त्राभ्यास जे ते सर्वथा अनर्थ हेतु म्हणून मुमुक्षु जेणे अन्यशास्त्रापासुन उपरति पावनें योग्य ॥ ऐसें विविचारुन अन्यशास्त्रापासुन उपरतीतें पावला जरी शास्त्रविषयवासनालक्षण प्रतिबंध जो तो नाशातें पाउन जातो ॥ म्हणून श्रुतिस्मृतिइतिहासपुराणें जें तेहीकरून प्रतिपादिजेतो ॥ जो कोणी याप्रकारे विचार करून हे प्रतिबंध जे त्यातें नयेसें करून आत्मा प्रतिपादक ऐसा जो शास्त्रार्थविचार तेणेंकरून ज्ञानातें संपादितो तो मुक्त म्हणून शास्त्रसिद्धांत ॥ आसुरवासना ऐसा जो प्रतिबंध जो यातें निरुपितो ॥ तो प्रतिबंध जो तो आपल्याठाइं नाहींसारिखा भासला जरी एक्यासमयाचेठाइं पराचा आचार जो त्यातें पाहिल्यानंतर आक्षेपादिक जे तेहीकरून तो प्रतिबंध जो तो प्रगट होतो ॥ ते कैसे म्हणाल तरि अरे भ्रष्टा आचार जो तो ऐसा करावा काय ॥ भ्रष्ट होउन गेलास ॥ संदेह नाही ॥ अरे तुज आचार सांगितला जो गुरु कोण तोही भ्रष्टच संदेह नाही ॥ अरे उद्यांपासुन आम्हांसमोर येऊं नको ॥ उठून जायरे ॥ म्हणूनही ॥ अरे अमते नमस्कार करून कृतार्थ होय म्हणूनही ॥ आमचें पादतीर्थ घेउन पुणीत होउन जायरे म्हणून आमची शुश्रुषा करणें याहून वेदांतविचारामध्यें काय आहे म्हणूनही ॥ आमची उपासना करसील जरि तुज सकळाभिष्ट सिद्धि होते म्हणूनही ॥ नमस्कार करूं नको म्हणुनही ॥ अरे त्यांसी बोलिलास त्यास नमस्कार केला तुं आम्हांजवळ येउं नको अरे आमतें परवा न करून आम्ही आल्या उठला नाही ॥ त्यास आयुष्य इतक्या उपरि पुरें म्हटिलें ॥ आणि येक त्याचें भस्म होउन गेला ॥ ऐश्वर्यमदेंकरून आमचा परामर्ष करितां गेला ॥ त्या ऐश्वर्य आजिच्यानें समाप्ति म्हणून बोलिलों तैसेंच ऐश्वर्य गेलें ॥ अरे आम्हापासीं मंत्रोपदेश घेउन आमतें न गणितां जातोस ॥ तूं भस्म होउन जासील म्हणून बोलिलों तैसेच तो भस्म होउन गेला ॥ म्हणून आमची महिमा तुम्हासारिखें जाणतील तरि जाणाते इतकेंच परंतु आणखि कोणी जाणू शकेना ॥ आम्ही भूत भविष्य वर्तमान काळवृत्तांत अवघेही जाणतो म्हणूनही पहिले अनेकास रक्षिले आतांही अनेकास रक्षितो यानंतर अनेकास रक्षणार ॥ आम्ही अनेक द्रव्यें संपादिलीं तें तितुकेंही दान केले ॥ आपले मन ज्या पदार्थास इच्छितो तो पदार्थ पुढें येउन उभा राहातो ॥ आपणास इतुकें द्रव्य आहे इतके द्रव्य येणार आहे म्हणूनही ॥ हा माझ्या हातें मेला हे मस्तीस आले आहेत या इतकियातें संव्हार करावयाकारणें जातों ॥ हें तुझ्या चित्तास आलें पाहिजे म्हणूनही ॥ यज्ञ करावा तरि म्यांच करावा ॥ ब्राह्मणभोजन केलें तरि म्यांच करावें ॥ दान केलियां म्यांच करावें ॥ मजयेव्हडे सामर्थ्यही मजयेव्हडी बुद्धिही माझेठाइंही गुणही लोकामध्यें गुण कोणास आहेत ॥ आपण मंत्रशास्त्राचे ठाइं मोठा म्हणूनहीं ॥ येक जन माझा द्वेषी होता त्यास मंत्र येक उपदेश केला तेणेंकरून तो भस्म होउन गेला ॥ आणिखीं येक शुश्रूषी होत्साता होता त्सास येक मंत्रउपदेश केला त्यास ऐश्वर्य प्राप्त जालें ॥ आणखी एक मरून जावा म्हणून येक मंत्रउपदेश केला ॥ तो त्या मंत्रातें तीनि दिवस जपून भस्म होउन गेला ॥ पूर्वी कितेक मोटे होते त्यास आपणाइतकी महिमा नाही याकारणास्तव अवंचक जों आमची शुश्रुषा करितो तोच कृतार्थ ॥ द्यावाचें जे तें आपणासच देताहेत तेच कृतार्थ म्हणुनहि ॥ या शरीरातें जो रक्षितो त्यास परलोकसिद्धि आहे ॥ आमचे दर्शन ज्यांस प्राप्त होते त्यांची पापें संपूर्ण नाशातें पावताहेत ॥ आमची पदरेणु जे तीतें जो मस्तकीं धरितो ॥ तोच कृतार्थ म्हणुनहिं ॥ आमचे ठाई ईतकी महिमा नाहीं जरि ॥ अवघेहि आमची उपासना किन्निमित्त करितील ॥ उपासना करिताहेत कीं ॥ या कारणास्तव आम्हीच मोटे संदेह नाही ॥ बहुप्रकारें बोलायाचें काय आहे ॥ या शरीरातें वंचना करून मनोवाक्कायेंकरून ईश्वर भावनें करून जो कोणी पूजा करिताहेत ॥ त्यास मोक्ष करस्थ ॥ संदेह नाही सिद्ध या प्रकारें अनर्थरूप याव्याची ऐसी जे चित्तवृत्ति जे तीस असुरवासना प्रतिबंध म्हणुन बोलिजेतें ॥ हा प्रतिबंध जो तो माहाअनर्थ हेतु म्हणुन अनात्मविषय ॥ आत्मज्ञानास विरोधी म्हणुनहि मुमुक्षु जो तेणे हा प्रतिबंध जो तो विचारून टाकाव्याचे योग्य ॥ हा प्रतिबंध असतांच श्रवणादिक जे ते जों जों करितो त्यास ह्या जन्माचे ठाइं ज्ञान नव्हे ॥ ऐसे तरि श्रवणादिक जे ते व्यर्थ होताहेत काय म्हणाल तरि नव्हेत ॥ आश्वमेघादिक ऋतु जान्हे केले त्यास जे लोक प्राप्त त्या लोकाप्रति जाऊन बहुकाळ भोग जे त्यातें अनुभउन त्यानंतर ब्रह्मनिष्ठ कुळाचेठाईं उत्पन्न होतो ॥ उत्पन्न जाहाल्यानंतर ॥ संसारासक्त होत्साता असिला जरी ॥ पूर्वजन्मवशास्तव श्रवणादिकाचे ठांई आसक्ति करितो ॥ त्यानंतर आपणास प्रतिबंध जे ते आहेत काये म्हणून विचार करून प्रतिबंधाची निवृत्ति करून ॥ श्रवणादिक करून ते जे श्रवणादिक जे तेंहिकरून ज्ञान संपादून मुक्त होतो म्हणून श्रुति स्मृती ईतिहासपुराणादिक जे ते बोलताहेत ॥ या प्रकारेंकरून जो प्रतिबंधाते दूरि करून श्रवणादिक जे तेंहीकरून ज्ञान संपादितो तो मुक्त म्हणून वंदान्तसिद्धांत ॥ श्रवण मनन निदिध्यासन जे त्यातें निरूपितों ॥ श्रवण म्हणतां समस्त वेदांत जे त्याचें शड्विधालिंगेकरून ब्रह्मस्वरूप ऐसा जो आत्मा त्याचे ठाईं तात्पर्य बुद्धीचा निश्र्चय जो तोच श्रवण म्हणून बोलिजेतें ॥ मनन म्हणजे श्रुत्यार्थातें ऐकून ॥ ऐकिला जो अर्थ त्यास युक्तिकरून एकवाक्यता करून चिंतना करणें त्यास मनन म्हणून बोलिजेते ॥ निदिध्यासन म्हणतां ॥ विजातिय ऐसें जे कामक्रोधादिक अज्ञान यातें टाकून सजातीय ऐसें जें अहं ब्रह्मास्मि अहं ब्रह्मास्मि म्हणायाचें नैरंतर्यचिंतन जे तें निदिध्यासन म्हणून बोलिजेतें ॥ याचें प्रयोजन कोणते म्हणाल तरि बोलूं ॥ सर्वदा श्रवण जें तें सकळ संशयातें दूरि करितें ॥ सर्वदा मनन जें तें असंभावनेते दूरि करितें ॥ सर्वदा निदिध्यासन जे तें विपरति भावनेतें दूरि करितें ॥ प्रतिबंध बाहुल्य ज्यास आहे त्यान्हे सर्वदा हे तीन्ही करावी ॥ प्रतिबंधनिवृत्त सूक्ष्म आहे बुद्धि ज्याची त्यास श्रवणकाळाचे ठाईं मनन निदिध्यासन सिद्धि होते ॥ तें कैसे म्हणाल तरि ॥ बुद्धिमंत जो तो गुरु जे त्यापासीं श्रवणकर्तेकाळीं युक्ती ज्या तेंहीकरून वाक्यार्थालोचन करून ॥ अर्थास एकवाक्य करितो तेंच त्यास मनन जाहालें ॥ चित्त विषयाचे ठाईं न जाउन श्रवणमननेंचेकरून संशयादिरहित होत्सातें ऐसें जे स्वरूप याचेठाईं चित्तास येकाग्र करून स्थिर करितो म्हणून निदिध्यासन हि सिद्धच ॥ जो कोणी मूढ होत्साता प्रतिबंधसहित आहेत त्याने श्रवणमनननिदिध्यासन जे ते वारंवार करावें ॥ जो सूक्ष्मबुद्धि होत्साता प्रतिबंधरहित आहे ॥ त्यास श्रवणकाळाचेठाईं मनननिदिध्यासन सिद्धि होते या अर्थाचे ठांई संशय नाही सिद्ध ॥संशय असंभावना विपरीतभावना कोणती म्हणाल तरि दृष्टांतपूर्वकेंकरून निरूपितो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि मार्गाचे ठाईं जाणार पुरुष तेणें दीर्घाकार ऐसा जो स्थाणू जो त्यातें पाहून हा स्थाणू किंवा पुरुष ऐसे याव्याची जे चित्तवृत्ति तीस संशय म्हणून नाम ॥ असंभावना म्हणता येथे स्थाणू याव्यास कारण काय स्थाणू येऊं न शके म्हणून याव्याची चित्तवृत्ति तिचें नाम असंभावना ॥ विपरितभावना म्हणतां ॥ हा सर्वात्मना स्थाणू नव्हे पुरुष म्हणून निश्र्चय येकरूप ऐसी जे चित्तवृत्ति तीचे नाम विपरीतभावना ॥ याचप्रकारें दार्ष्टांतिकाचे ठाईंही प्रमाणगतसंशय म्हणून ॥ प्रमेयगतसंशय म्हणून प्रमाणगत असंभावना म्हणून ॥ प्रमेयगत असंभावना म्हणून ॥ प्रमाणगत विपरीतभावना म्हणून प्रमेयगत विपरीत भावना म्हणून दोप्रकारिचें ॥ प्रमाणागत संशयातें निरूपितो ॥ ते कैसे म्हणाल तरि ॥ श्रुतिप्रमाण जें तें कर्मातें प्रतिपादितें अथवा सिद्ध ऐसें जें प्रत्येक ब्रह्म जें त्यातें प्रतिपादितें म्हणून याव्याची चित्तवृत ईस प्रमाणगत संशय नाम ॥ प्रमेयगतसंशय म्हणतां ब्रह्म जें तें जगत्कारण अथवा प्रधान जगत्कारण म्हणून याव्याचें प्रमेयगतसंशय नाम ॥ प्रमाणगत असंभावना म्हणता ब्रह्म सिद्ध वस्तू आहे ॥ प्रमाणांतरेंकरून पृथिव्यादिकाचेपरी विषय जाले असतां श्रुति ज्या त्या सिद्धब्रंह्मातें कैसें प्रतिपादितील न प्रतिपादितील ऐसें म्हणायाचा निश्र्चय जो तो प्रमाणगत असंभावना ॥ प्रमेयगत असंभावना म्हणिजे जगाहून ब्रह्म विलक्षण होउन आहे ॥ जगास ब्रह्म कारण होउं न शके प्रधानादिक जे ते जगत्कारण म्हणायाचा निश्र्चय ॥ जो तो प्रमेयगत असंभावना ॥ प्रमाणगत विपरीतभावना म्हणिजे ब्रह्म जें तें सिद्ध वस्तू आहे श्रुत्यादिकास सिद्धवस्तूच्या प्रतिपादनाचे ठाइं तात्पर्य नाहीं ॥ इतुकेच नव्हें श्रुति ज्या त्या सिद्ध ब्रह्मातें प्रतिपादिताहेत जरि पुरुषाची प्रवृत्ति निवृत देखिजेत नाही ॥ प्रयोजन नाहीसे जालें ॥ लोकाचे ठाइं प्रवृत्तिनिवृत्तिपूर्वक पुरुषार्थ देखिला आहे या कारणास्तव समस्त वेदांत जे ते कर्मपरच म्हणायाचें निश्र्चय जो तोच प्रमाणगत विपरीतभावना ॥ प्रमेगत विपरितभावना म्हणिजे लोकांमध्यें तंतुपट्टाचेठाइं कार्यकारणास सारूप्य देखिले आहे तैसेंच अशुद्धादि विकारासिं मिळुन आहे जग जे त्यास कारण ब्रह्म ऐसे जे तेही अशुद्धादिकासीं मिळून असावे तैसे असिजेत नाही या कारणास्तव प्रधानादिक जे तेच जगत्कारण म्हणायाचे बुद्धीचेठाइं निश्र्चय जो तेच प्रमेयगत विपरीत भावना ॥ याप्रकारें अंतःकरणाचेठाइं जीवरूपेंकरून आपण येक ऐसें भासाव्याचें जे तें आपण जगद्विलक्षण ऐसें जे ब्रह्म ते आपण होय किंवा नव्हे म्हणायाचें प्रत्यगात्मविषयसंशय ॥ तैसेच कर्तृत्वाद्यनेकधर्मयुक्त होत्साता परिछिन्न होत्साता जननमरणादिकेंकरून युक्ता होत्साता आपण जो आपणास विपरीत लक्षणें जें तें आहेत ज्यास ऐसे ब्रह्मस्वरूपत्व जें तें कैसे घडेल घडेनाच म्हणायाचा निश्र्चय जो तो प्रत्यगात्मविषय असंभावना ॥ याचप्रकारे आपण अकर्ता जरि जाहालो आपणाते उद्देशुन या कर्मातें करा ॥ त्या कर्मातें करू नका ॥ याते पाहुये ॥ याते पाहु नका ॥ याते गृहण करा ॥ यातें ग्रहण करू नका ॥ यातें भक्षा यातें भक्षूं नका ॥ ऐसें विधिरूप शास्त्र जे ते कैसे प्रवर्तेल प्रवर्तेना ॥ या कारणास्तव मी कर्ता संदेह नाही म्हणून या कर्तृत्वास उपयोग्य ऐसे जे अभिमानादिक जे त्यास स्वधर्मप्रतीतिलक्षण जे तें प्रत्यगात्मविषय विपरीतभावना ॥ याप्रकारें संशय असंभावना विपरीतभावना ज्या यातें विचारून हे न ये सारिखें दूरि करून ज्ञानातें संपादितो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ श्रूतीचें तात्पर्य निर्णय करायाची षड्विध लिगें जे त्यातें निरोपितों ॥ उपक्रम म्हणून उपसंहार म्हणून अभ्यास म्हणून अपूर्व म्हणून फळ म्हणून अर्थवाद म्हणून उपपत्ति म्हणून सा प्रकारिचे ॥ यामध्यें उपक्रमोपसंहार हे दोन्ही मिळुन येक लिंग ॥ उरलीं जें तें प्रत्यक् लिंगें या साहीकरून श्रुतीचें तात्पर्य निर्णय करिजेत ॥ म्हणून यास लिंग ऐसे नाम ॥ उपक्रम म्हणतां श्रृष्टीहुन पूर्वी हे नामरूपात्मक जग जे तें न होत्साते सत्तामात्र होत्सातें होतें म्हणून प्रतिपादावयाचे उपक्रम ॥ उपसंहार म्हणिजे हे भासाव्याचें सर्व जग जें तेंही त्या सदाचे स्वरूप तेंच सत्य तोच आत्मा म्हणायाचें प्रतिपादन जें तें तोच उपसंहार ॥ हे दोन्ही ही अद्वितीयात्मस्वरूपातें प्रतिपादिताहेत म्हणुन प्रथम लिंग ॥ अभ्यास म्हणतां तूं ब्रह्म तूं ब्रह्म म्हणून नववार उपदेश ॥ तो उपदेशचेतनाप्रति ॥ त्या चेतनाच्या स्वरूपासच अद्वितीयात्मत्वातें बोधिते म्हणून हा अभ्यास जो तोच दुसरें लिंग ॥ अपूर्व म्हणिजे अष्टप्रमाणामध्येंही उपनिषत्प्रमाणेंच ( करून ) आत्मा जो तो लक्षणेंच करून जाणिजेतो ॥ इतर प्रमाणें जें तेही करून जाणिजेत नाही म्हणायाचें अपूर्वत्व ॥ हे अपूर्वत्व जे ते अद्वितीयात्म्याचे ठाइं सिद्ध होऊन आहे म्हणून हे तिसरें लिंग ॥ फळ म्हणतां अद्वितियात्मज्ञाना जे त्यास प्रारब्ध जोपर्यंत नाशातें पावलें नाही तोपर्यंत देहेंद्रियादिप्रपंचही मिथ्यारूपेंकरून भासाव्याचें ॥ या प्रारब्धास निःशेष नाश जेव्हां येतो तेव्हां जग जें तें सर्वात्मना न भासुन अद्वितीयात्मस्वरूपत्वेंकरून असावे म्हणाव्याचें प्रतिपादन जे तें फळ ॥ हें चौथे लिंग ॥ अर्थवाद म्हणिजे ज्या वस्तूच्या ऐकण्याकरून नाइलिकी जे वस्तु ते ऐकिजेते ॥ ज्या वस्तूच्या मननेंकरून मननास विषय नाही ऐसी जे वस्तु मनन करिजेतें ॥ ज्या वस्तूतें जाटिल्यानंतर जे नाही जांटिलें तेही जाणिजेते तो अर्थवाद ॥ या अर्थवादास स्वार्थाचेठाइं तात्पर्य नाही म्हणून अद्वितीयात्मस्वरूपाचे ठाइं तात्पर्य म्हणून यास अर्थवाद म्हणुन नाम ॥ हे पांचवे लिंग ॥ उपपत्ति म्हणिजे मृत्तिकेपासून उत्पन्न जाले घटशरावादिक जे त्यातें ॥ सुवर्णापासुन उत्पन्न जाले कटकमुकुटादिक जे त्यातें ॥ लोखंडापासुन उत्पन्न जाले खड्गादिक जे त्यातें ॥ कारणाहुन वेगळें भासलें जरी या कार्याचा उच्चार मात्र विनाकरून अर्थ नाही म्हणून कारणव्यतिरिक्त कार्य नाही म्हणायाची युक्ति उपपत्ति म्हणिजेते ॥ ते प्रसिद्धेंकरून भासाव्याचें जग जे तेही प्रत्यगात्मस्वरूप जे ब्रम्हविकार म्हणून ॥ तद्दष्टांतस्वरूप ऐसी जे युक्ति ते जगास प्रत्यगात्म्याहुन अभिन्नत्व जे त्यातें प्रतिपादित होत्साते प्रत्यगात्म्यास अद्वितीयत्व जे त्यातें सुचविते ॥ म्हणून हे साहावें लिंग ॥ याप्रकारें षड्विध लिंगेकरून श्रूतीचें तात्पर्य ॥ याप्रकारे जो निर्णय करितो त्यास श्रवणमात्रेंकरून अद्वितीयात्मज्ञान जे ते होतें ॥ संदेह नाही सिद्ध ॥ चतुर्विशति तत्वें जे त्याते निरूपितों ते कोणतीं म्हणाल तरि ज्ञानेंद्रियपंचक कर्मेंद्रियपंचक प्राणादिपंचक शब्दादिपंचक मनादिचतुष्ट्य हे अवघी मिळुन चतुर्विशति तत्वें म्हणून बोलिजेतें ॥ या चतुर्विवशति तत्वासहीं विलक्षण होत्साता असंग होत्साता ऐसा साक्षी मी म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ छतीस जें त्यातें निरूपितों ॥ हें बोलिले जें चोविस तत्वें तेही ॥ पंचीकृतभूतें शरीरत्रयें अवस्थात्रयें अज्ञान इतकीं मिळुन छतीस तत्वें ॥ जो कोणी या छतीस तत्वातें विचारून या तत्वास विलक्षण होत्साता असंग ऐसा साक्षी जो तो मी म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ शाहान्नव तत्वातें निरूपितों ॥ आतां सांगीतली छतीस तत्वें तेही षड्भाव विकार षडुर्मि षड्कोश अरिषड्वर्ग जगत्रय गुणत्रय गुणत्रय कर्मत्रय वचनादान गमन विसर्गानंद संकल्पाध्यावसायाभिमान अवधारणा मैत्र्यादिचतुष्टय दिग्वार्तादिकरून चौदा अधिदैवते ॥ जे तें हें इतकीं मिळुन शाहाणी तत्वें म्हणून बोलिजेतें ॥ या तत्वास विलक्षण होत्साता साक्षी मी म्हणुन जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ ब्रह्मचर्यातें निरूपितो दर्शनं स्पर्शनं केलिः कीर्त्तनं गुह्यभाषणं संकल्पोध्यवसायश्र्च क्रियानिवृत्तिरेवच ॥ एतन्मैथुनमष्टांगं प्रवदंति मनीषिणः ॥ विपरीतं ब्रह्मचर्य मनुष्टेयं मुमुक्षुभिः ॥२॥ याचा अर्थ दर्शन म्हणतां स्त्रिया ज्या त्यातें अनुरागेंकरून पाहाणें ॥ स्पर्शन म्हणिजे प्रीतीकरून तीस स्पर्शन करणे ॥ केळी म्हणिजे प्रीतीपूर्वक विनोद करणे ॥ कीर्तन म्हणिजे प्रीतीपूर्वक तीतें ऐसी तैसी वर्णनें ॥ गुह्य भाषण म्हणिजे प्रीतपूर्वक तीसीं येकांती गोष्टि सांगणे ॥ संकल्प म्हणिजे प्रीतीपूर्वक इसीं मिळुन असावें म्हणून चिंतणे ॥ अध्यावसाय म्हणिजे प्रीतीकरून तीतें अवश्य तैसेंच करितों म्हणून निश्र्चय करणें ॥ क्रियानिवर्त्तन म्हणिजे प्रीतीकरून स्त्रीसंभोग अनुभवाव्याचे ॥ या आठातेंही मैथुन ऐसें बोलताहेत ॥ मोटे जे ते हे अठही नसणें ब्रह्मचर्य म्हणून ॥ हें ब्रह्मचर्य जें तें मुमुक्षु जो तेणे अभ्यासाव्यास योग्य म्हणून बोलताहे ॥ हें ब्रह्मचर्य ज्यास आहे त्यास विचारद्वारा ज्ञान येउये म्हणून शास्त्रसिद्धांत ॥

अजिव्हः षंढकः पंगुरंधो बधिर एव च ॥

मुग्धश्र्च मुच्यते भिक्षुः षड्भिरेतैर्न संशयः ॥१॥

अर्थ ॥ अजिव्ह म्हणजे जिव्हा नाही तो अजिव्ह नव्हे ॥ तरि कोणता म्हणाल तरि हे मज प्रिय हे मज प्रिय नव्हे म्हणून न बोलून कर्तृत्वाद्यभिमानरहित होत्साता भक्षुन असत्य न बोलून मितभाषी होत्साता जो आहे तो अजिव्ह म्हणुन बोलिजेतो । षंढ म्हणजे सिश्र नाहीं ज्यास तो षंढ नव्हे ॥ आणीखिं कोणता म्हणाल तरि सद्यः उत्पन्न ऐशा शिशुतें सोळा वर्षाची युवती जे तीतें शतवर्षांची वृद्धा जे तीतें पाहुन तिहिचेठाईं समचित्त होत्साता निर्विकार होत्साता जो आहे तो षंढ म्हणून बोलावा ॥ पंगु म्हणिजे कोणता म्हणाल तरि ॥ पांगुळ जो तो पंगु नव्हें ॥ आणिक कोण म्हणाल तरि भिक्षेनिम्मित्य प्रामाप्रति जाणे मलमुत्रपुरीषादि विसर्जनार्थ बाहेरि जाणे ग्रामांतराप्रति जावें म्हणुन इच्छा जाली जरि योजनामात्र अधिक न जाणे याप्रकारें जो आहे तो पंगु म्हणून बोलिजेतो ॥ अंध म्हणिजे आंधळा नव्हे ॥ आणिक कोणता म्हणाल तरि बैसला जरी संचार केला जरी ज्या सन्याशाची दुष्टि च्यारि जूं प्रमाण भूमि सोडुन पुढें जात नाहीं तो सन्यासी अंध म्हणून बोलिजेतो ॥ बधिर म्हणिजे बहिरा नव्हे ॥ आणिखीं कोणता म्हणाल तरि हितवाक्य जे त्यातें ॥ अहित वाक्य जे त्यातें ॥ बहुत रम्य वाक्य जें त्यातेंही दुःखकर वाक्य जे त्यातेंहि ऐकिलें जरी ॥ जो कोणी हिताहित जे त्यातें ग्रहण न करून आहे तो बधिर म्हणून बोलिजेतो ॥ मुग्ध म्हणतां कोणता म्हणाल तरि मूढ मुग्ध नव्हे सौंदर्यवानही मुग्ध नव्हे आणिखी कोणता म्हणाल तरि समस्त विषय जे ते सन्निध असतांही ॥ इंद्रियपटुत्वयुक्त असतांही ॥ त्या विषयातें अनुभवाचेठाइं समर्थ असताही ॥ ज्यास निद्रा करणार जो त्याचे परी जो आहे तो मुग्ध म्हणून बोलिजेतो ॥ हे साही ज्यास आहेत तो श्रवणद्वारा ज्ञान संपादुन मुक्त होतो शास्त्रसिद्धांत ॥ आतां सत्यविध चैतन्य बोलिजेंतें ॥

शुद्धमीश्वरचैतन्य जीवचैतन्यमेवच ॥

प्रमाता च प्रमाणं च प्रमेय च फलं तथा ॥१॥

इति सप्तविधं प्रोक्तं भिद्यते व्यवहारतः ॥

मायोपाधिविनिर्मुंक्तं शुद्धमित्यभिधीयते ॥२॥

मायासंबंधतश्र्चेशो जीवो विद्यावशस्तथा ॥

अंतःकरणसंबंधत्प्रमातेत्यभिधीयते ॥३॥

तथा तद्वृत्तिसंबंधात्प्रमाणमिति कथ्यते ॥

अज्ञानपि चैतन्यं प्रमेयमिति कथ्यते ॥४॥

तथा ज्ञातं च चैतन्यं फलमित्यभिधीयते ॥

याचा अर्थ ॥ शुद्ध चैतन्य म्हणून इश्वरचैतन्य म्हणून जीवचैतन्य म्हणून प्रमातृचैतन्य म्हणून प्रमाणचैतन्य म्हणून प्रमेयचैतन्य म्हणून फलचैतन्य म्हणून व्यवहाराचेठाइं येकच चैतन्य या साताप्रकारेंकरून बोलिजेंतें ॥ ते सात प्रकार जे त्याचा भेद जो त्यातें बोलतों ॥ मायेसी न मिळालें जें चैतन्य तें शुद्ध चैतन्य म्हणून बोलिजेतें ॥ मायेसी मिळालें जे चैतन्य ते इश्वरचैतन्य म्हणून बोलिजेतें ॥ अविद्येसीं मिळाले जें तें जीवचैतन्य म्हणून बोलिजेतें ॥ अंतःकरणेंसि मिळालें जें चैतन्य ते प्रमाता म्हणून बोलिजेते ॥ तैसेच अंतःकरणवृत्तिसि मिळालें जें चैतन्य प्रमाणचैतन्य म्हणून बोलिजेत ॥ न कळे ऐसें जें चैतन्य तें प्रमेयचैतन्य म्हणून बोलिजेतें ॥ कळे ऐसे चैतन्य ते फळचैतन्य म्हणून बोलिजेते । याप्रकारें येक होत्साता पूर्ण ऐसा जो आत्मा उपाधिभेदेकरून अनेकविध होत्साता बोलिजेतो त्या उपाधिते दुरि करून अद्वितिय परिपूर्ण ऐसा जो आत्मा मी म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥

पंचभ्रमाते निरूपितो ॥

प्रत्यगात्मा परमेश्वराद्भिन्नइति भ्रमः ॥ आत्मनि

प्रतीयमानं कर्तृत्वादिकंवास्तवमिति भ्रमः ॥

शरीरत्रयावछिन्नात्मा संगीति भ्रमः ॥

जगत्कारणस्य ब्रह्मणोविकारित्वं भ्रमः ॥

कारणाद्भिन्न प्रपंचस्य सत्यत्वं भ्रमः ॥

या भ्रमातें निवर्तक जे त्यांतें बोलूं ॥

बिंब प्रतिबिंब दृष्टांतेन भेदभ्रमो निवर्तनीयः ॥

स्फटिक लोहित दृष्टांतेन पारमार्थिककर्तृत्व भ्रमो निवर्तनीयः ।

घटाकाश मठाकाशदृष्टांतेन संगीतिभ्रमो निवर्तनीयः ॥

रज्जुसर्पदृष्टांतेन जगत्कारणस्य ब्रह्मणोविकारित्व भ्रमो निवर्तनीयः ॥

स्वर्णलोह दृष्टांतेन कारणाद्भिन्न प्रपंचस्य सत्यत्वभ्रमो निवर्तनीयः ॥

याप्रकारेंकरून पंचभ्रमाची निवृति ॥ हें पंचभ्रम जे ते अज्ञानेंकरून आले आहेत म्हणून विचारून जे कोणी भ्रमनिवारक ऐसे जे ज्ञान संपादिताहेत ते मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ प्रालब्धत्रयाते निरोपितो ॥ ते कोणते म्हणाल तरि ॥ इच्छा प्रारब्ध म्हणून अनिच्छा प्रारब्ध म्हणून ॥ परेछा प्रारब्ध म्हणून ॥ तिप्रकारिचे प्रारब्ध तेंही विवेक्या अविवेक्याचया प्रारब्धासी भेद आहे ॥ ते कैसे म्हणाल तरी दृष्टांतपूर्वकेकरून निरूपितो ॥ अविवेक्याचि इच्छा अश्विनमासिचे मेघासारिखी ॥ ते कैसी म्हणाल तरि अश्विनमासाचेठाइं स्वल्प मेघ दिसतो तो मेघ जो तो सर्वत्र व्यापुन कुंभ द्रवणादिकासारिखे वर्षाव करून पीक सडुन जाय ऐसें करून घराच्या भिंती पाडुन जाय ऐसें करून परास अनेक अनार्थांते जैसे करितो ॥ तैसे त्या अज्ञानासही स्वल्प इच्छा उत्पन्न होते ते उत्पन्न जाली जे इच्छा त्या मेघासारिखें सर्वत्र व्यापुन परास अनेक दुःखें जे त्यातें करून त्यास इहलोकाचेठाइं सुख नाहीसें करून परलोक नाहींसा करून नरकातें संपादिते ॥ विवेक्याची इच्छा तरी मकरमासाचेठाइं मेघ जो तो सर्वत्र व्यापून असिला जरीं स्वल्पें वर्षुन सस्यादिकांचा नाश न करून प्राण्यास अनर्थ न करून नाशाते पावतो ॥ तैसे विवेक्याची इच्छा जे ते मकरमासाचे मेघासारिखें कर्मवशास्तव बहुप्रकारे आल्यासारिखें दिसतें ॥ आलीं जरी पुष्कळ ऐसा जो विवेक जो त्यास्तव परास उपद्रव न देउन अपल्या परलोकास हाणि न संपादुन देहधारणमात्राचेठाइं इच्छा होते ॥ या प्रकारेंकरून विवेक्याचे प्रारब्ध अविवेक्याचे प्रारब्ध ॥ याचा भेद ॥ आता प्रारब्धाते सामान्येकरून निरूपिले ॥ याउपरि विशेषे करून निरूपितो ते कैसे म्हणाल तरि ॥ अविवेकी जे ते लोकाचेठाइं अपथ्य करून मरून गेले तेही ॥ चोरी करून शिरछेद होऊन मेले तेही ॥ राजस्त्रियांसी गमन करून देह कर्वती दिधलें तेही ॥ इतक्यातेही पाहून आम्हींही या कार्याते करूं नये केले तरि आम्हासहीं ते अनर्थ जे ते येतीलच म्हणून स्वानर्थ कळला असुनही ते किती नाहीं ॥ ते असमर्थ होते आपण समर्थ म्हणून लेखून त्या व्यापाराचेठाइं वर्तुन शिरछेद होउन जात आहेत ॥ याप्रकारें अविवेक्याची इच्छा प्रारब्ध ॥ विवेक्याचे प्रारब्ध तरि तैसे नव्हे ॥ तरि कैसे म्हणाल तरि ॥ विवेकी ते जे प्रवृति अवघी अनर्थकर म्हणून विचारून लोकाचेठाइं अर्थासक्त जे संसारी ते अर्थाचे संपादाव्याचेठाइं त्याच्या रक्षणाचेठाइंही त्या अर्थाचे नाशाचेठाइंही दुःखी होणार जो त्यातें पाहुन आम्ही या अर्थाचे ठाइं आसक्ति करू नये केली जरी त्यास जैसे दुःख प्राप्त जाले तैसेच आपणासही दुःख प्राप्त होईल म्हणून विचार करून समस्त विषयाचे ठाइं आसक्तितें टाकून यदृछालाभसंतुष्ट होत्साता राहतो ॥ त्यास शरीरधारणामात्र उपयोगी ऐशा ज्या क्रिया ज्या त्याचेठाइं शौच्यादि क्रिया ज्या याचे ठाइं इच्छा उत्पन्न होते ॥ इतकेंच परंतु अन्यत्र इच्छा उत्पन्न होत नाहीं ॥ याप्रकारें विवेक्याचें इच्छाप्रारब्ध ॥ अनिछाप्रारब्ध तरि विवेक्या अविवेक्यास समान होउन आहे ॥ ते कैसे म्हणाल तरि डोइस लागाव्याचें पायास ठेंच लागाव्याचें पर्जन्य करून भिजायाचेंही उष्णेंकरून तापातें पावावयाचेंही क्षयरोगादिकरून व्याधी ज्या त्याही ॥ विज पडायाचेंही देवालय मंडप गोपुर प्राकार हे आगावरि पडायाचेंही ॥ इतक्यादिककडून येणार जे दुःखे जे येणेकरून याव्याचे दुःख जें विवेक्यासहीं अविवेक्यासही समान होत्साती आहेत ॥ याच्या अनुभवास अनेछाप्रारब्ध म्हणुन नाव ॥ परेछज्ञप्रारब्ध जे त्यातें निरूपितों ॥ ते परेछाप्रारब्धही विवेक्या अविवेक्यास समान होत्साते आहे ते कैसे म्हणाल तरि येक पुरुष जो तो मौने करून बैसला असतां आणिखि येक जो तो येउन त्याते नमस्कार करून त्वां हें कार्यं केलें पाहिजे म्हणून बहुत प्रार्थना करित असता दाक्षिण्येंकरून तें कार्य करून त्यापासून आली जे सुखदुःखें जे त्यातें अनुभवितो ॥ हा अनुभव जो तो विवेक्यास अविवेक्यास समान समान हे परेछा प्रारब्ध ॥ या प्रकारें करून प्रारब्धत्रयातें विचारून या प्रारब्धत्रयाचा अनुभव अहंकारासच ॥ परंतु अहंकार साक्षी जो तो मी मज नाही म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ संचित प्रारब्ध आगामी यातें याचा जो नाश जो त्यातें दृष्टांतपूर्वकेकरून निरूपितो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि येका ब्राह्मणास दाहा क्षेत्रे होती ॥ त्या दाहा क्षेत्री आपणच वाहात होता ॥ येका येका क्षेत्रास हजार हजार खंडिप्रमाणे वर्षास दहाहजार खंडी धान्य प्राप्त होय ॥ त्यामध्यें हजार खंड खाव्यास घरी ठेवी ॥ पांचसे खंडी बींनिमित्य ठेवी ॥ आनखी पांचशे खंडी धर्माकरिता ॥ आणखी हजान खंडी वेव्हारास खर्चायास आणिखी सिदा यादिक द्याव्या निमित्य हजार खंडीचा विकरा करि ॥ याप्रकारेंकरून खर्च जातां वर्षास सा हजार खंडी उरेत हे उरले जे सा हजार खंडी जे जतन करी ॥ याप्रकारें वर्षास सा हजार खंडी उरता तें अवघेही जतन करून ठेउन धारण चढेल तेव्हा विकीन म्हणून निश्र्चय करी ॥ या धान्यास संचित म्हणुन नाम ॥ घरि भक्षायास ठेवलें हजार खंडी त्यास प्रारब्ध म्हणून नाम ॥ मोड धांडा जाला कणिस निघालें पिकलें पीक यास आगामी म्हणून नाम ॥ याप्रकारें असतां येका समयाचेठाइं कळह प्राप्त झाला ॥ त्या काळीं पर राज्याचे येउन संचित धान्यातें घेउन गेले ॥ येणार जें पीक जे तें चोर पाइक घेउन गेले । उरले जे धांडे जे होते घोड्यास पशूस कापुन घातले ॥ त्यानंतरे तो ब्राह्मण जो तो विचार करीत होत्साता ग्रहाचेठाइं असणार जो पदार्थ जे त्यातें भूमिमध्यें निक्षेप करून यत्नेंकरून अनुभवीत होत्साता होता ऐसा असिल्यानंतर बंधुजन जे ते येउन भक्षायास काय करिता म्हणून पुसिल्याने संचित बहुत होतें तितुकेंही पर राज्याचे येउन घेउन गेले ॥ येणार पीक जे ते चोर पाइक घेउन गेले धांडे अवघे अश्वादिक पशुस घातले ग्रहाचेठाइं काहीयेक जतन करून ठेविले हातें त्यातें भक्षित होत्साते आहो म्हणून बंधुजन जे त्यास सांगतो ॥ येणेंकरितां काय सुचले म्हणाल तरि ॥ संचित आगामी जे यास नाश बोलिल्यासारिखें जालें प्रारब्ध जे त्यातें अनुभवून क्षयातें पावावें ॥ ऐसें सांगितल्या सारिखे जालें ॥ जैसे दृष्टांताचेठाइं संचित प्रारब्ध आगामी जैसे तैसेच द्राष्टांतिकाचेठाइं समस्त प्राण्यासही संचित प्रारब्ध आगामी यातें स्पष्टत्वेंकरून निरूपितो ॥ तें कैसे म्हणाल तरि लोकाचेठाइं अनादि ऐसा जो जीव तो पुण्यपापकर्मे जे ते बहुजन्मास कारण होत्सातीं आहेत याप्रकारें जन्मावधी करित करीत असतां ते तें पुण्यपापकर्म जे ते अवघीं राशि होउन आहेत ॥ यास संचित ऐसे नाम ॥ त्यानंतर मरणातें पावतो ॥ पावल्यानंतर आणिखी जन्म घ्याव्यानिमित्त ते ते संचित जे त्यामध्यें कित्तेक संग्रह करितो ॥ ते संग्रहकर्म जे तें भावी शरीर जे त्यास कारण ॥ ऐसी जे पंचीकृत पंचमहाभूतें जे त्यातें शरीराकारेंकरून परिणामातें पाउन त्या शरीरेंकरून कित्तेक कर्में जे ते त्यातेंकरून त्या कर्मद्वारा आणिक कर्मावाचून कित्तेक सुखदुःखें जे त्याते देते ॥ यास प्रारब्ध ऐसे नाम ॥ प्रारब्धफळातें अनुभवीत होत्साता मरणपर्यंत कराव्याचे पुण्यपाप जे त्यास आगामी म्हणून नाम ॥ हेंही त्या संचितामध्येंच मिळताहेत ॥ जीव जे ते याप्रकारें करून कर्म जे त्याते अनादि करित येत असता हे संचित जें ते वृद्धितें पावयेतें ॥ याकारणास्तव याच्या जन्मास अवधि नाहीं ॥ या जन्मास अवधि केव्हा होइल म्हणाल तरि बोलूं ॥ याप्रकारेंकरून कर्मेंकरून कर्में जे ते करित येतां येका जन्माचेठाइं येक पुण्यकर्म जें त्याच्या परिपक्वास्तव यास संसार न ये ऐसें करावें ऐसा विवेक जो तो उत्पन्न होतो ॥ तो कैसा म्हणाल तरि मी काम्यकर्में जें यातेंच करिन जरि ॥ मज चित्तशुद्धि होउं न शके ॥ आपणास संसारनिवृत्ति न होय म्हणुन विचारून काम्यकर्में जे त्याते सोडुन विहित ऐसी जें कर्में जे त्यातें इश्वरार्पण बुद्धीच करून करीत येतो ॥ त्या कर्मेंकरून भक्ति येते ॥ भक्तिद्वारा चित्तशुद्धि येते ॥ चित्तशुद्धिद्वारा सद्गुरु लाभ होतो ॥ त्या सद्गुरुपासी असुन शुश्रूषापूर्वक श्रवण मनन निदिध्यासनादिक करितो ॥ ते श्रवणादिकेंकरून ज्ञान संपादितो ॥ ज्ञान जेव्हा होतें त्या ज्ञानाग्नीकरून अज्ञान दग्ध होउन जातें ॥ अज्ञान जेव्हां दग्ध जाले तेव्हा अज्ञानकार्य ऐसें जे संचीतकर्म जे तेही दग्ध होउन जातें ॥ ज्ञान आल्यानंतर केलें जे कर्म पुण्यपाप जे तें अकर्ता जो हा यास स्पर्शु शकत नाही ॥ ऐसे तरि त्या पुण्यपाप कर्मास गति काय म्हणाल तरि या ज्ञानास जो स्तवितो तो पुण्यकर्मातें घेउन जातो ॥ यातें जो दुषितो पापाकर्मातें घेउन जातो ॥ प्रारब्ध तरि अनुभवुन क्षीण करावें ॥ यास वेगळाच नाश बोलता नये ॥ बोले तरि बहुदोष प्राप्त होतील या अर्थाचेठाइं संमतिवचन ॥

प्रारब्ध भोगतो नश्येद्ब्रह्मज्ञानेन संचितम् ॥

आगामी द्वितीयं कर्म तद्वेष्ट प्रियवादिनोः ॥१॥

या प्रकारे संचित प्रारब्ध आगामी जे त्यातें कुळंकषेकरून विचारून हे संचित प्रारब्ध आगामी जे तें अहंकारासच ॥ अहंकारसाक्षी जो मी मज नाही म्हणून जो जाणतो तो मुक्तम्हणून वेदांत सिद्धांत ॥ प्रळयाचें स्वरूप निरूपितों ॥ ते कैसे म्हणाल तरि नित्यप्रळय म्हणून आवांतरप्रळय म्हणुन दैनंदिनप्रळय म्हणुन ब्रह्मप्रळय म्हणून अत्यंतिकप्रळय म्हणून पांच प्रकारिचा ॥ यामध्यें नित्यप्रळय म्हणतां समस्त प्राण्याची सुषुप्ति नित्यप्रळय ॥ आवांतरप्रळय म्हणिजे कृत द्वापार कलयुग जे तें सहस्रवार फिरलें तरि ब्रह्मयाचा येक दिवस ॥ त्या दिवसामध्ये चवदा मनु चौदा इंद्रासही आधिपत्य येतें जातें ॥ तें आधिपत्य जातां लोक जे ते खालिवरि होत्यात ॥ त्या अधिपत्यावरि दुसरा येउन

बैसिजेपर्यंत अवांतरप्रळय म्हणून बोलिजेतो ॥ या कारणास्तव ब्रह्मदेवाच्या येका दिवसाचेठाइं ॥ चौदा आवांतरप्रळय ॥ यास नैमित्तिक प्रळय म्हणून मन्वंतर प्रळय म्हणून दोनि नामें ॥ युगप्रळय जो तो याचमध्यें अंतर्भूत ॥ दैनंदिन प्रळय म्हणिजे ब्रह्मयाची सुषुप्ति ॥ ब्रह्मप्रळय म्हणिजे ब्रह्मदेवाची नाशावस्था ॥ ब्रह्मप्रळयावस्थेचेठाइं आकाशादिप्रपंच सर्वात्मना नाही ॥ अज्ञानमात्र माहाप्रळय होउन असते ॥ त्यास प्राकृत प्रळय म्हणून महासुषुप्ति म्हणून दोनि नामें ॥ अत्यंतिक प्रळय म्हणिजे मुक्ति त्या अवस्थेचेठाइं अज्ञान सर्वात्मना नाही ॥ हे पांचहि प्रळय अन्योन्यव्यार्तक होत्साते आहेत ॥ म्हणून अनात्मस्वरूप जाले ॥ या प्रळयास अधार होत्साता असंग जो तो आत्मा मी म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ लोकांचेठाइं वेदांतशास्त्र व्यतिरिक्त ऐसें जे काव्य नाटकुतर्कशब्द यातें पढले जे ते ॥ केवळ कर्मठ जे ते ॥ मुमुक्षु जो त्यातें नाना उपाय करून भेद उपजउन त्याच्या बुद्धीचा नाश करिताहेत ॥ म्हणायाचा दृष्टांतपूर्वकेकरून निरूपितों ॥तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि लोकांचेठाइं मंडळेश्वर राजा जो तो आपुल्या पुरोहितास बलाउन यज्ञ करि म्हणून आज्ञा केली ॥ सकल पदार्थहि त्यास दिधले ॥ दिधल्यानंतर पशु स्वाग्रामी न मिळतां पशुपरिक्षक ब्राह्मण जो त्यातें बलाउन कितेक द्रव्य देउन पशूतें आणी म्हणून बोलिला ॥ त्यास पाठविल्यानंतर तो ब्राह्मण जो तो ग्रामांतरास जाउन पशु मिळायाचें स्थळ विचारून त्यानें मागितलें द्रव्य देउन बरा लक्षणयुक्त पशु जो त्यातें घेउन येतां मध्यान्ह काळाचेठाइं मेटामध्यें मेटकरी जो तेणे येउन उभे केले असतां हा पशु राज्याचे येथे जातो ऐसे सांगतां राज्यास मी येउन मेट मागितले नाहीं ॥ त्यानंतर आणिक येक जन येउन तो मेटकरी त्यास बोधुन आम्ही उपाय करून पशुते सोडउं म्हणून सांगतां ॥ यानें तो उपाय कोणता केला म्हणाल तरि पुसिल्यानें उपायातें सांगतो ॥ तो कैसा म्हणाल तरि आम्ही चौघे जनही त्याच्या मार्गाचे ठाइं चौं चौं घटिकामध्यें एक येक ऐसे उभे राहुन कावरे कुत्तरे म्हणुन बोलूं ॥ चौघेजन ऐसें बोलतां तो भ्रमून त्या पशूतें सोडुन जाईल म्हणून योजना करून दुसऱ्या दिवसीं त्याच्या मार्गाचेठाइं उभे राहिले ॥ हा ब्राह्मण जो तो दुसरे दिवसीं त्या पशुतें रज्जुकरून गळां बांधुन नेत असतां प्रथम जो उभा होता तो त्या ब्राह्मणातें बोलाउन ब्राह्मणास कुतऱ्यातें पोसने उचित नव्हे ॥ पोसिले तरि जीव घ्याव्याचें हे कावरे कुतरे पोसाव्या काय ॥ तुज चोखट कुतरें नाही सापडले काय ॥ म्हणून सांगुन हें अवघियासही जिव मारून जाइल ॥ आहा जवळि घेउन येउं नको ॥ ऐसें सांगून तो पळून गेला ॥ तो ब्राह्मण जो तो त्याची वार्ता ऐकून यास पैत्यभ्रम आहे ॥ नाहीं तरि त्या पशूते पाहून ऐसे बोलेल काय ॥ न बोलेल ॥ म्हणून विचार करून त्याच्या गोष्टिची परव्हा न करून पुढें चालिला ॥ दुसरा जो तो या ब्राह्मणातें पाहुन याचप्रकारें बोलिला ॥ हें काय बोलिल्यासारिखे हाहि बोलतो ॥ कावऱ्या कुतऱ्यास घेउन दगा पावलों की काय म्हणून ब्राह्मणास संशय उत्पन्न जाला ॥ त्यानंतर आलोचन करित होत्साता हे कावरे कुतरें आपणाते कोठें जिवे मारून जाते म्हणून भीवभिउं मागें पाहात होत्साता चालिला ॥ जात असतां तीसरा जो तो यातें पाहुन ब्राह्मण जो तो दुरुन येतांच हाक मारून बोलिला की कावरें कुतरें आम्हांजवळि घेउन येउं नको ॥ म्हणून बोलुन आपणाजवळि होते त्यांसमवेत पळून गेला ॥ त्यानंतर हा ब्राह्मण जो तो घाबिरा होउन कावऱ्यातेंच म्या घेतलें संदेह नाहीं ॥ म्हणून विचार करीत होत्साता ॥ आम्ही यातें टाकुन जाऊं तरि हा टाकून जातो म्हणून आपणातें खेटून येउन जिवें मारील संदेह नाही ॥ यातें सोडुन जायाचा उपाय जो त्यातें चिंतन होत्साता गेला ॥ जात असतां चौथा जो तो यातें पाहुन याच प्रकारें बोलिला त्याची गोष्टि ऐकता हा जो ब्राह्मण जो तो त्यातें बोलाउन मातें कावऱ्या कुतऱ्यापासुन सोडविसील तरि तुज मोटे सुकृत घडेल म्हणून बोलतां या ब्राह्मणाचि गोष्टी ऐकून तो बोलिला जें मी तुज जवळी येउं सकत नाही ॥ त्यातें सोडुन जाव्याचा मार्ग सांगेन ॥ त्याची गोष्टि ऐकुन तो ब्राह्मण जो तो उपाय कैसा म्हणून पुसतां उपाय सांगितला ॥ सांगितला प्रकार कैसा म्हणाल तरि बोलूं ॥ ब्राह्मणास बलाउन दोरासीं त्या कावऱ्या कुतऱ्याते त्या झाडाजवळि नेउन तो दोर हातीं धरून त्या झाडास तीनि प्रदक्षणा करून त्या दोरासि घालून पळुन जाय म्हणून सांगितले ॥ याचप्रकारें त्या झाडासीं त्यास बांधून तुझेया धर्मेकरून वांचलों ॥ आपणास पुनः जन्म जाले ऐसे मानून आतां पशूतें घ्याव्यास जाउ नये म्हणून निश्र्चय करून आपल्या स्थानास गेला ॥ याप्रकारेंकरून वंचक ऐसे जे मेटकरी जे ते प्रत्यक्षें करून घेतला जो पशु आपण ग्रहण करावयानिमित्य कावरें कुतरें म्हणुन सांगुन त्या ब्राह्मणाची बुद्धि जे तीतें जैसें नाशिले ॥ तैसेंच तार्किकादिक जे तेही ॥ शब्दज्ञ जे तेही ॥ कर्मठ जे तेही ॥ मुमुक्षु जो त्यास बलाउन अहो गीता काशास पढता ॥ संन्यासाजवळि काम काय ॥ उपनिषधें किंन्निमित्य पढतोस ॥ तुज कोणतें पापकर्म उपस्थित होउन आहे ॥ नारदादिक जे त्यांसही ज्ञान नाही म्हणून पुराणादिकाचेठाइं सांगितलें आहे ॥ हें इतुकींही मिळुन अन्नानिमित्य संन्यास घेतला आहे ॥ अरे तुज ज्ञान म्हणिजे काय ॥ आम्हि सकळ शास्त्रे पढलों आम्हासहि ज्ञान होत नाही ॥ म्हणून विचारून कर्मेच करित आहों ॥ तुज मुक्ति पाहिजे तरि तर्क पढ ॥ नाहीं तरि शब्द पढ ॥ काव्यनाटकपाहे ॥ गीता उपनिषत् सर्वात्मना पढुं नको ॥ ज्ञानबोध करूं म्हणनार जे ते वंचक म्हणून जाण ॥ त्यांस ज्ञान असेल तरि ते तुज उपदेश करितील ॥ त्यास आधीं अमानित्वादि साधनें नाहीत ॥ क्षणमात्र उष्ण साहुं सकत नाहीत ॥ क्षणमात्र सीत साहु सकत नाहीत ॥ आपण ज्ञानी म्हणून नाम ठेउन घेउन आहेत ॥ ज्ञानलक्षणें स्थितप्रज्ञादिक जें ते येकही त्यांचेठाइं नाहीत ॥ कोपतापादीक आधीक होउन आहेत ॥ येका श्र्लोकास अर्थ पुसिल्यानंतर सांगुं सकेनात ॥ या वचनास लोलुप्त होउन अनेक पुरुष जे ते पहिलें नाडले ॥ तैसाच तुहीं कोठें नाडतोस कीं ॥ म्हणून तुजवरि दया करून सांगितलें तूंही बरव्याप्रकारे विचार करून वेदांती जेथे आहेत ॥ त्याच्या संगती सर्वात्मना तुज त्याग करावयायोग्य ॥ संदेह नाही ॥ म्हणून तुज मुक्ति पाहिजे तरि सुल्लभ ऐसा जो मार्ग सांगतों तो कैसा म्हणाल तरि आम्हीं रहस्य ऐसें मंत्र जे त्यातें जाणतों ॥ त्यामध्यें येक मंत्र उपदेश करूं त्या मंत्राते जप करीत होत्साता राहें ॥ तो मंत्र जो तो इहलोकाचेठाइं तुज सर्वाभिष्ट जे त्यातें देइल ॥ सेवटी मोक्षही देइल ॥ संदेह नाही ॥ तुज शंभर प्रकारे सांगितलें अमची गोष्टि ऐकसील जरी तरिच वांचसील नाइकसी तरि नाशुन जासील संदेह नाही ॥ म्हणुन याप्रकारें त्या मेटकऱ्यासारिखे वंचक ऐसे तार्किकादिक जे ॥ ते मुमुक्षुच्या बुद्धीतें नाशिताहेत संदेह नाही ॥ या कारणास्तव मुमुक्षु जो तेणें बरव्याप्रकारें विचारून वेदांतशास्त्रच आम्हांस तारक ॥ वर्कड शास्त्रें जें तें आम्हांस तारक नव्हेत ॥ आत्मस्वरूप उपदेश करणार जो गुरु तोच सद्गुरु ॥ उरले ते गुरु नव्हेत वंचक म्हणून विचारून वेदांताचेठाइं आत्मस्वरूप उपदेश करणार जे गुरु त्याचेठाइं विस्वासातें धरून शुश्रूषापूर्वक श्रवणादिक जे त्यातें करून ज्ञान संपादुन कृतार्थ होउन जावें संदेह नाहीं ॥ सिद्ध ॥ पंचविध ऐशा ज्या मुक्ति ज्या त्यातें निरूपितो त्या कोणत्या म्हणाल तरि सालोक्य मुक्ति ॥ सामिप्य मुक्ति ॥ सारुप्य मुक्ति ॥ सार्ष्टि ॥ कैवल्य हे पांच प्रकार ॥ यामध्यें सालोक्य मुक्ति कोणती म्हणाल तरि उपासना महिमेस्तव ब्रह्मलोकास जाउन ब्रह्मदेवाचे सान्निध्य नसून येका स्थळाचेठाइ राहुन समस्त भोगातेही अनुभवित होत्साता असाव्याची सालोक्य मुक्ति ॥ सामिष्य मुक्ति म्हणिजे ब्रह्मदेवाचे समीपता पाउन समस्त भोग जे त्याते भोगीत होत्साता असायाचें सामिष्य मुक्ति ॥ सारुप्य मुक्ति म्हणिजे ब्रह्मदेवासमान रूप पाउन समस्त भोग जे त्यातें भोगीत होत्साता असायाचें सारुप्य मुक्ति ॥ सार्ष्टि म्हणिजे ब्रह्मदेवास जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्य समवेत असायाचे सार्ष्टि ॥ या चौघासही येकरूप मुक्ति होउन असिली जरीं ॥ उपासना तारतम्यास्तव आवांतर तारतंम्य फळही आहे ॥ कैवल्य म्हणिजे मुमुक्षु जो तो शांत्यादिक जे येहीसी युक्त होउन गुरुपासी श्रवण मनन करून ज्ञान संपादुन सच्चिदानंदस्वरूप आत्मा मी म्हणून जाटिल्यानंतर स्वरूपमात्र असायाचें कैवल्य ॥ हें कैवल्य विचारापासुन उत्पन्न जाले जे ज्ञान तेणें यावें ॥ कर्म उपासना योग येहीकरून याव्याचें कव्हे ॥ऐसें तरि ब्रह्मलोकीं असनार जें तेही ॥ ब्रह्मयाजवळि असनार जे तेही ॥ ब्रह्मयापासी विचार करून ज्ञान संपादुन ब्रह्मदेवा बराबरि मुक्ति जे तितें पावतेत ॥ येणेकरून काय सांगितलें म्हणाल तरि समस्त प्राण्यास ज्ञानेंच करून मुक्ति कर्मोपासना योग येही करून मुक्ति नाही या अर्थाचे ठाइं संदेह नाही ही सिद्ध ॥लोकाचेठाइं ज्ञानी जो तो सर्वदा समाधिनिष्ट होत्साता असावा म्हणुन नियम आहे ॥ नाहीं तरि जाले ज्ञान ते दृढ न होय म्हणुन व्यवहारास मिळुन असणार त्यास ज्ञान घडेना ॥ विवेकी ते त्यामध्यें कित्येक जे त्यांस अनेकविध संशय आहेत त्याचे संशय दुरि करावया कारणें ॥ ब्रह्मवित् ॥ वर ॥ वरीय ॥ वरिष्ट ॥ यांचे स्वरूपस्थिति जे तीते बोलतों ॥ ब्रह्मवेत्ता जो तो आपणास काळत्रइं अबाध्यत्व प्रपंचास स्वप्नतुल्यत्व सर्वदा पाहात होत्साता असुन यज्ञादिकर्में जे त्यातें अतिथीपूजा जे त्यातें स्वधर्म ऐसे जे स्नानसंध्यावंदनादिक जे त्यातें भोजनादिक क्रिया ज्या त्यातें सर्वदा करित होत्साता असिला जरी ॥ आपण साक्षी आपण येक कर्मही नव्हे ॥ अहंकारादिक जे ते आपल्या विषयांच्याठाइं प्रवर्तत आहेत ॥ आपण असंग आपणास साक्षित्वहि कल्पित म्हणून निश्र्चय करून सकळ व्यवहार जे त्यातें करीत होत्साता राहतो ॥ यास ब्रह्मवित् ऐसे नाम ॥ वराची स्थिति प्रकार बोलतों वर जो तो बाह्य व्यापार अवघे दुःखरूप म्हणून लेखुन व्यापारासीं आम्हांस प्रयोजन नाहीं म्हणून विचारून या व्यापारातें सोडुन देउन सर्वदा अंतर्मुख होत्साता निद्रस्थाचेपरि राहुन काळत्रय याचेठाइं प्रपंच नाहीत ॥ भासला जरी मिथ्या ॥ मज साक्षित्वही कल्पित म्हणून निश्र्चय करून मुमुक्षु ऐसे जे त्यास उपदेश करित होत्साता अनिवार्य ऐसे जें शौच अन्नपानादिक क्रिया याचेठाइं प्रवृत्ति होत्साता असिला जरी सकळ व्यापार जे तेही अहंकारादिक करिताहेत ॥ आपण एका कर्मातेही कर्ता नव्हे ॥ म्हणून निश्र्चय करून बाह्य व्यापाराते टाकुन सर्वदा येकान्तनिष्ट होत्साता राहातो ॥ त्याचें वर ऐसे नाम ॥ वरीय याची स्थिती प्रकार बोलूं वरीय ऐसा जो तो बाह्य व्यापार अवघेही दुःखरूप म्हणून विचारून बाह्य व्यापारातें टाकुन सर्वदा निदिध्यासनपर होत्साता राहुन पर जे तेही करून प्रेरित होत्साता अन्नपानादिक क्रिया ज्या त्यातें केल्या जरी सकळ व्यापार जे त्याते अहंकारादिक करिताहेत आपण येक व्यापारातेंही करित नाही आपण साक्षी म्हणून आपणास साक्षित्वही कल्पीत ॥ आपण असंग आपणास येकासी संमंध नाही ॥ म्हणून निश्र्चय करून संशयरहित होत्साता सकळ संशय छेत्ता होत्साता सर्वदा निदिध्यासनपर होत्साता राहतो ॥ त्यास वरीयान् ऐसे नाम ॥ वरिष्टाची स्थितिप्रकार बोलूं वरिष्ट जो तो बाह्य अवघें दुःखरूप म्हणून टाकुन सकळ संशयरहित होत्साता सर्वदा निर्विकल्पसमाधि होत्साता अंतर्बाह्य व्यापारातें विसरून स्वरूपानंदाचेठाइं मग्न ऐसे जे चित्त ते जे ज्याचें ऐसा होत्साता राहतो ॥ त्यास स्वतः परतः व्युत्थान नाहीं त्यास अन्नपानादिक क्रिया ज्या त्या नाहीत यास अनेक पुण्यकर्मपरिपाकवशास्तव समाधि सिद्ध जाली ॥ या समाधिस्तव सकळ दुःख जे ते नाशाते पाउन जात आहेत म्हणूनही तो सर्वदाही निर्विकल्पसमाधिनिष्ट होत्साता राहतो ॥ वरिष्ट ऐसे त्याचे नाम ॥ हे चौघे जे यासही मुक्ति समान ॥ ऐसे तरि हें याप्रकारें असायाचें प्रयोजन काय म्हणाल तरि कर्मे नानाविध ॥ म्हणून ज्ञानी जे तेही याप्रकारें राहावें ॥ म्हणोन बोलता नये ॥ याविषी प्रमाण कोणते म्हणाल तरि बोलूं ॥ जनक जो तो राज्य करिता जाला म्हणून ॥ जडभरत जो तो असंग होत्साता संचार केला म्हणून ॥ शुक जो तो उपनयनात्पूर्विच गृहापासुन पूर्वीं निघुन गेला म्हणुनही ॥ दुर्वासा जो तो कितेकास शाप देता जाला ॥ आणिखि कित्तेकास अनुग्रह करित होत्साता म्हणुन ॥ श्रुति स्मृति इतिहास पुराण जे ते बोलताहेत म्हणुनही ॥ कर्मे म्हणुनही ॥ कर्मे नानाविधे म्हणुनही येका सारिखे येक नाहींत ॥ म्हणुन श्रुत्यादिकाचेठाइं जनकादिक जे तेच प्रमाण विवेकी ॥ ऐसे जे ज्ञानी जे ते याप्रकारें आहेत त्याप्रकारें आहेत म्हणायाचे प्रयोजन नाही ॥ त्याचे कर्म जैसे आहे तैसे राहाताहेत संदेह नाही सिद्ध ॥ लोकामध्ये कित्येक शास्त्रज्ञ जे ते समस्त वाक्य जे तेही परीक्षज्ञान जनकच ॥ अपरोक्षज्ञानजनक नव्हे म्हणून सर्वदा अपरोक्ष ऐसा जो आत्मा त्यास ज्ञानाज्ञानाश्रयत्व घडेना म्हणून बोलताहेत ॥ याचि वार्ता ऐकून अनेक जन जे ते मोहातें पावले आहेत ॥ याचा भ्रम दुरि करावयाकारणे दृष्टांतपूर्वकें करून आत्म्याचेठाइं सप्तावस्था ज्या त्या निरूपितो ॥ तो दृष्टांत काता म्हणाल तरि एका क्षेत्राचे ठाइं परमाजी म्हणुन संन्यासी होते त्यास अनेक शिष्य होते त्यामध्यें दहाजणाते बोलाउन त्यास एका कार्यास पाठविले ते दहाजणही कार्य करून येउ म्हणून जातां मध्ये नदी आड होती ॥ ते नदी वोलाडुन पैल तीरास पावले । त्यानंतर त्यामध्यें श्रेष्ठ जो होता तो आम्ही दहाजन आलों की ॥ अवघेंही अल तीरास आलो की नाही म्हणून अवघ्यासही मोजिले ॥ त्यामध्यें आपणातें न गणून ते नवजन मनुष्यें जें यांचे ठाई चित्त ठेविले ॥ त्यातें प्रत्यक्षें करून पाहात होत्साता अज्ञानें करून गणना करणार ऐसा जो आपण ॥ आपणातें दशम म्हणून जाणता नाही जाला ॥ ते जाणणें जें तेंच अज्ञान ॥ आवरणातें निरूपितों ॥ ते सदावरण अभानावरण म्हणून दो प्रकारें असतें ॥ ते कैसे म्हणाल तरि बोलूं ॥ दशम होत्साता आपण जो तो असतांही दशम आहे काय म्हणून पूसिले तरी ॥ दशम दिसत नाही ॥ दशम असीला जरि ॥ तरि दिसला पाहिजे । दिसत तरि नाहीं म्हणून नाही ऐसें बोलतो ॥ या व्यवहारास कारण होउन असायाचें अज्ञान - कार्य ऐसें जे आवरण द्वय म्हणून बोलिजेतें ॥ अज्ञान - कार्यविशेष ऐसा जो विक्षेप त्यातें निरूपितो ॥ ऐसे तरि दशम जो तो काय जाला म्हणून पुसील्यानें नदीचे ठाई हारपला म्हणून निश्र्चय करून दशम जो तेणें शंख करून रोदन केलें ॥ त्या रोदनाते अज्ञानें करून केले ऐसा जो विक्षेप जो त्यातें निरूपिताहेत ॥ दशमास असदावरण निवर्त्तक ऐसे जे परीक्ष ज्ञान जे त्यातें निरूपितो ॥ दशम जो तो याप्रकारें करून रोदन करित असतां ॥ आप्त जो तो येउन ॥ काशास रोदन करितोस रोदन करू नको ॥ दशम जो तो मेला नाही ॥ आहे ॥ म्हणून बोलतां तें आप्त वाक्य जे त्यातें ऐकून ॥ तेव्हा दशम जो तो । शास्त्र जे तेणेकरून स्वर्गादिक जाटील्या सारिखें दशमास परीक्षत्वें करून जाटले । हे परोक्ष ज्ञान म्हणून बोलिजेतें ॥ याचप्रकारें दशमास अभानावरण निवर्तक ऐसे जें अपरोक्ष ज्ञान जे त्यातें निरूपितों ॥ दशम जो तो ॥ तो जो आप्त जो त्यातें बलाउन । दशम जो तो कोठें म्हणून पुसतां तो आप्त जो तो दशमास । या नवजणातें मोजून दाखवून दाहावा तूं म्हणून पुसतां तो आप्त जो तो दशमास । या नवाजणातें मोजून दाखवून दाहावा तूं म्हणून सांगतां ॥ तो दशम जो तो आपणहीं त्यातें मोजून पाहून । आपण दाहावा संदेह नाही । अज्ञानें करून भ्रांत जालो ॥ काळत्रयाचे ठाईं आपण दाहावांच संदेह नाही म्हणून । आपणातें अपरोक्षें करून जाणून रोदनातें । टाकून संतोषातें पावला ॥ या प्रकारें दशमाचे ठाईं सप्तावस्था ज्या त्यातें निरूपिल्या ॥ याचप्रकारे आत्म्याचे ठाइं सप्तावस्था ज्या त्यातें निरूपितो ॥ चिदाभास जो तो संसाराचे ठाईं आसक्त होत्साता आपणांस स्वरूप भूत स्वप्रकाश ऐसा कूटस्थ जो त्यातें नाहि जाणत म्हणून म्हणायाचें अज्ञान ॥ येक जन या चिदाभासातें बलाउन कूटस्थातें जाणतोस काय म्हणून पुसत असतां ॥ कूटस्थ म्हणून येक जण नाही । असता तरि भासावा ॥ नाहि भासत या कारणास्तव कूटस्थ म्हणून येक जन नाही म्हणून बोलतो ॥ हें अज्ञान कार्य ऐसें आवरणद्वय । विक्षेप म्हणीजे ॥ मी कर्त्ता मी भोक्ता मी सुखी मी दुःखी मी मनुष्य मी ब्राह्मण म्हणाव्याच्या आरोपास कारण होत्साता देहद्वयांसी मिळुन असणार जो चिदाभास तो विक्षेप म्हणून बोलीजेतो ॥ गुरुपदेशास्तव आधीं कूटस्थ जो तो येक आहे म्हणून परोक्षेंकरून जो जाणतो ॥ तें परोक्ष ज्ञान ॥ हा चिदाभास जो तो गुरूपासीं श्रवणादिकेंकरून ज्ञान संपादून त्यानंतरे तो कूटस्थां मी म्हणून जाणाव्याचें अपरोक्ष ज्ञान ॥ अनर्थ निवृत्ति म्हणीजे ॥ चिदाभास जो तो निर्विकार असंग ऐसा जो आत्मा मी म्हणून जाटल्यानंतर ॥ कर्तृत्वादि शोक समूह जो यातें टाकीलें म्हणायाचें जे आहे तं अनर्थ निवृत्ति म्हणून बोलिजेतें ॥ आनंद वाप्ति म्हणीजे ॥ कर्तव्य जात जितकें आहे ते तितकें ही मज करून घडुन आलें ॥ पावावयाचा फळ समूह जितका होत तितकाही मजकरून घडून आलें ॥ पावावयाचा फळ समूह जितका होता तितकाही मजकरून पावला म्हणून संतोषातें पावतो ॥ तेचि आनंदावाप्ती म्हणून बोलिजेते ॥ अज्ञान म्हणून ॥ आवरण । विक्षेप । परोक्ष ज्ञान । अपरोक्षज्ञान । अनर्थनिवृति । आनंदावाप्ति । म्हणून । याप्रकारें करून सप्तावस्था निरूपिल्या । यामध्यें आदि ऐस्या ज्या तीनि अवस्था ज्या त्या बंधहेतु ॥ उरल्या अवस्था मोक्षहेतु म्हणून विचारून । या सप्तावस्था ज्या त्या माझेठाईं ॥ आरोपित ऐसा जो अहंकार जो त्यासच ॥ अहंकार साक्षी निर्विकार ऐसा जो मी मज नाहिं म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ छ ॥ तादात्म्य त्रयातें निरूपितों ॥ तें कोणते म्हणाल तरि ॥ सहजतादात्म्य म्हणून । कर्मजतादात्म्य म्हणून । भ्रांतिजन्यतादात्म्य म्हणून ती प्रकारिची आहेत ॥ त्यामध्यें सहजतादात्म्यातें निरूपितों ॥ ते कैसे म्हणाल तरि बोलूं ॥ चैतन्य जें तें अहंकाराचे ठाईं प्रतिबिंबुन । ते प्रतिबिंब जे तें अहंकारातें मिळुन तप्तायः ( तप्तायः ) पिडांचेपरि येक जालें । तें चिदासारिखे भासलें ॥ ते चित्प्रतिबिंब जें त्यासी मिळुन असणार जो अहंकार त्यास प्रतिबिंबासी तादात्म्य जें तें सहजतादात्म्य ॥ म्हणून बोलिजेत ॥ यास सहजतादात्म्य म्हणून नाम कैसे जालें म्हणाल तरि ॥ उत्पन्न होतें वेलेसचि मिळुन उत्पन्न होतें वेलेसचि मिळुन उत्पन्न जाहाले म्हणून या दोहीच्या तादात्म्यास सहजतादात्म्य म्हणून नाम । कर्मजतादात्म्य कैसे म्हणाल तरि ॥ चित्प्रतिबिंबासी मिळुन चिदासारिखें भासणार जो अहंकार त्यास स्थूळ शरीरासी तादात्म्य जें तें कर्मजतादात्म्य म्हणून बोलिजे ते ॥ यास कर्मजन्य म्हणून किन्निमित्त नाम आलें म्हणाल तरि । जाग्रद्भोगप्रद ऐसे जे कर्म जे तें उत्पन्न जाहालें तरि तें तादात्म्य उत्पन्न होतें । तें कर्मं जे ते नाशातें पावले तरि ते तादात्म्य नाशातें पावतें । म्हणून याचे प्रतिबिंबासी मिळुन असणार जो अहंकार त्यास स्थूळ शरीरांसी तादात्म्य जें तें कर्मजतादात्म्य म्हणून बोलिजेतें । कर्म जरि आहे तरी तादात्म्य आहे । कर्म नाही तरी तादात्म्यास्तव स्थूळ देहेहि चेतना सारिखा जाला ॥ भ्रांति - जन्य तादात्म्य कैसें म्हणाल तरि । मी ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र ॥ मी ब्रह्मच्यारि गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी मी म्हणायाच्या चित्तवृत्तीसीं मिळुन असायाच्या अहंकारास । अहं शब्दार्थ ऐसा जो साक्षी जो त्यासीं तादात्म्य जे तें भ्रांतिजन्य म्हणून बोलिजेतें ॥ यास भ्रांतिजन्य म्हणून कां नाम आलें म्हणाल तरि ॥ सर्वाधिष्टान ऐसें जें । आत्मस्वरूप त्यातें नाहि जाटीलें यास्तव आलें आहे म्हणून ॥ यास भ्रांतिजन्य म्हणून नाम ॥ या प्रकारें करून । सहजतादात्म्य म्हणून ॥ कर्मज तादात्म्य म्हणून ॥ भ्रांतिजन्य तादात्म्य म्हणून ॥ क्रमें करून ती प्रकारिचे ॥ या तादात्म्यत्रयाची निवृत्ति केव्हां होईल त्यास निरूपिताहेत ॥ दशमास असदावरण निवर्त्तक ऐसें जे परोक्ष ज्ञान जें त्यातें निरूपितो ॥ दशम जो तो या प्रकारें करून रोदन करित असतां ॥ आप्त जो तो येउन । काशास रोदन करितोस रोदन करू नको । दशम जो तो मेला नाही ॥ आहे ॥ म्हणून बोलतां ते आप्त वाक्य जें त्यातें ऐकून ॥ तेव्हा दशम जो तो । शास्त्र जे तेणेंकरून स्वर्गादिक जाटील्या सारिखें दशमास परोक्षत्वें करून जाटलें । हे परोक्ष ज्ञान म्हणून बोलिजेत ॥ याचप्रकारें दशमास अभानावरण निवर्तक ऐसे जे अपरोक्ष ज्ञान जे त्यातें निरूपितो ॥ दशम जो तो ॥ तो जो आप्त जो त्यातें बलाउन । दशम जो तो कोठें म्हणून पुसतां तो आप्त जो तो दशमास । या नवाजणातें मोजून दाखवून दाहावा तूं म्हणून सांगतां ॥ तो दशम जो तो आपणही त्यातें मोजून पाहून । आपण दाहावा संदेह नाही अज्ञानेंकरून भ्रांत जालों ॥ काळत्रयाचे ठाईं आपण दाहावांच संदेह नाही म्हणून । आपणातें अपरोक्षें करून जाणून रोदनातें । टाकून संतोषातें पावला ॥ याप्रकारें दशमाचे ठाईं सप्तावस्था ज्या त्यातें निरूपिल्या ॥ याच प्रकारें आत्म्याचे ठाइं सप्तावस्था ज्या त्यातें निरूपितो ॥ चिदाभास जो तो संसाराचे ठाईं आसक्त होत्साता आपणांस स्वरूप भूत स्वप्रकाश ऐसा कूटस्थ जो त्यातें नाहि जाणत म्हणून म्हणायाचें अज्ञान ॥ येक जन या चिदाभासातें बलाउन कूटस्थाते जाणतोस काय म्हणून पुसत असतां ॥ कूटस्थ म्हणून येक जण नाही । असता तरि भासावा । नाहि भासत या कारणास्तव कूटस्थ म्हणून येक जन नाही म्हणून बोलतो ॥ हें अज्ञान कार्य ऐसें आवरणद्वय ॥ विक्षेप म्हणिजे ॥ मी कर्त्ता मी भोक्ता मी सुखी मी दुःखी मी मनुष्य मी ब्राह्मण म्हणाव्याच्या आरोपास कारण होत्साता देहद्वयांसी मिळुन असणार जो चिदाभास तो विक्षेप म्हणून बोलिजेतो ॥ गुरूपदेशास्तव आधी कूटस्थ जो तो येक आहे म्हणून परोक्षेंकरून जो जाणतो ॥ तें परोक्ष ज्ञान ॥ हा चिदाभास जो तो गुरुपासी श्रवणादिकेंकरून ज्ञान संपादून त्यानंतरे तो कूटस्थां मी म्हणून जाणाव्याचें अपरोक्ष ज्ञान ॥ अनर्थ निवृत्ति म्हणिजे ॥ चिदाभास जो तो निर्विकार असंग ऐसा जो आत्मा मी म्हणून जाटल्यानंतर ॥ कर्तृत्वादि शोक समूह जो यातें टाकीलें म्हणायाचें जें आहे तें अनर्थ निवृत्ति म्हणून बोलिजेतें ॥ आनंद वाप्ति म्हणीजे ॥ कर्तव्य जात जितकें आहे ते तितकें हीं मज करून घडुन आले ॥ पावावयाचा फळ समूह जितका होता तितकाही मजकरून पावला म्हणून संतोषातें पावतो ॥ तेचि आनंदावाप्ती म्हणून बोलिजेते ॥ अज्ञान म्हणून ॥ आवरण ॥ विक्षेप । परोक्ष ज्ञान ।अपरोक्षज्ञान । अनर्थनिवृत्ति । आनंदावाप्ति म्हणून । याप्रकारें करून सप्तावस्था निरूपिल्या । यामध्यें आदि ऐस्या ज्या तीनि अवस्था ज्या त्या बंधहेतु ॥ उरल्या अवस्था मोक्षहेतु म्हणून विचारून । या सप्तावस्था ज्या त्या माझेठाईं ॥ आरोपित ऐसा जो अहंकार जो त्यासच ॥ अहंकार साक्षी निर्विकार ऐसा जो मी मज नाहिं म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ छ ॥ तादात्म्य त्रयातें निरूपितों ॥ ते कोणते म्हणाल तरि ॥ सहजतादात्म्य म्हणुन । कर्मजतादात्म्य म्हणून । भ्रांतिजन्यतादात्म्य म्हणून ती प्रकारिची आहेत ॥ त्यामध्यें सहजतादात्म्यातें निरूपितों ॥ तें कैसे म्हणाल तरि बोलूं ॥ चैतन्य जे तें अहंकाराचे ठाईं प्रतिबिंबुन । ते प्रतिबिंब जे तें अहंकारातें मिळुन तप्तायः ( तप्तायः ) पिडांचेपरि येक जाले । तें चिदासारिखें भासलें ॥ ते चित्प्रतिबिंब जे त्यासी मिळुन असणार जो

अहंकार त्यास प्रतिबिंबासी तादात्म्य जे तें सहजतादात्म्य ॥ म्हणून बोलिजेतें ॥ यास सहजतादात्म्य म्हणून नाम कैसें जालें म्हणाल तरि । उत्पन्न होतें वेलेसचि मिळुन उत्पन्न जाहालें म्हणून या दोहीच्या तादात्म्यास सहजतादात्म्य म्हणून नाम ॥ कर्मजतादात्म्य कैसे म्हणाल तरि ॥ चित्प्रतिबिंबासी मिळुन चिदासारिखें भासणार जो अहंकार त्यास स्थूळ शरीरासी तादात्म्य जें तें कर्मजतादात्म्य म्हणून बोलिजे तें ॥ यास कर्मजन्य म्हणून किन्निमित्त नाम आले म्हणाल तरि । जग्रद्भोगप्रद ऐसे जे कर्म जे ते उत्पन्न जाहालें तरि तें तादात्म्य उत्पन्न होते । तें कर्म जें तें नाशातें पावलें तरि तें तादात्म्य नाशातें पावतें । म्हणून याचे प्रतिबिंबासी मिळुन असणार जो अहंकार त्यास स्थूळ शरीरांसी तादात्म्य जें तें कर्मजतादात्म्य म्हणून बोलिजेतें । कर्म जरि आहे तरी तादात्म्य आहे । कर्म नाहि तरी तादात्म्य नाही । नाही म्हणायाचें जाग्रत्सुषुप्त्यादिकाचे ठाईं पाहुन घेणे ॥ या तादात्म्यास्तव स्थूळ देहेहि चेतना सारिखा जाला ॥ भ्रांति - जन्य तादात्म्य कैसे म्हणाल तरि । मी ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र ॥ मी ब्रह्मच्यारि गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी मी म्हणायाच्या चित्तवृत्तीसीं मिळुन असायाच्या अहंकारास । अहं शब्दार्थ ऐसा जो साक्षी जो त्यासी तादात्म्य जे तें भ्रांतिजन्य म्हणून बोलिजेतें ॥ यास भ्रांतिजन्य म्हणून का नाम आलें म्हणाल तरि ॥ सर्वाधिष्टान ऐसें जें । आत्मस्वरूप त्यातें नाहि जाटीलें यास्तव आलें आहे म्हणून ॥ यास भ्रांतिजन्य म्हणून नाम ॥ या प्रकारे करून । सहजतादात्म्य म्हणून ॥ कर्मज तादात्म्य म्हणून ॥ भ्रांतिजन्य तादात्म्य म्हणून ॥ क्रमें करून ती प्रकारिचें ॥ या तादात्म्यत्रयाची निवृत्ति केव्हां होईल त्यास ईश्वरत्व घडेना म्हणुन मायेस ईश्वरत्व बोलता नये ॥ ते कैसे नये ॥ आकाश उत्पतिमंत आहे म्हणुन आकाशास ईश्वरत्व घडेना जर्हि ॥ अनादि ऐसी जे माया ईस ईश्वरत्व बोलू तरि । अत्यंताभावास ईश्वरत्व यावें ॥ या अभवासहि ईश्वरत्व बोलू तरि । अत्यंताभावास ईश्वरत्व यावें ॥ या अभावासहि ईश्वरत्व घडेना म्हणुन अनादि ऐसी जे माया जे ईस ईश्वरत्व बोलता नये ॥ तैसे नव्हे ॥ अभावभावपदार्थ नव्हे म्हणून माया भाव पदार्थ म्हणून इस ईश्वरत्व बोलूं म्हणाल तरि जाती ही भावपदार्थ म्हणुन ॥ ईस ईश्ररत्व आले पाहिजे ॥ तीस ईश्वरत्व घडेना म्हणुन माया भाव पदार्थजालि जरी ॥ तीस ईश्वरत्व बोलता नये ॥ माय अनिर्वचनीय म्हणुन तीस ईश्वरत्व बोलूं म्हणाल तरि ॥ अनिर्वचनीय शुक्तिरजत जे त्यास ईश्वरत्व आलें पाहिजे । त्यास ईश्वरत्व घडेना म्हणुन अनिर्वचनीय ऐसी माया तीस ईश्वरत्व बोलतां नये ॥ ऐसें तरि केवळ प्रतिबिंबास ईश्वरत्व बोलूं म्हणाल तरि ॥ मया विरहीत प्रतिबिंब नाही म्हणून त्यास ईश्वरत्व बोलता नये ॥ त्या प्रतिबिंबाकारणें मायेतें अंगीकार करून प्रतिबिंब मात्रासच ईश्वरत्व बोलू म्हणाल तरि ॥ माया प्रतिबिंब ते केवळ प्रतिबिंबास सर्वज्ञत्वादि घडेना म्हणुन प्रतिबिंबमात्रास ईश्वरत्व बोलता नये ॥ ऐसे तरि अधिष्ठान चैतन्यास ईश्वरत्व बोलूं म्हणाल तरि ॥ अधिष्ठान चैतन्य निर्विकार म्हणून ॥ केवळ निर्विकार चैतन्यास जगत्स्रष्टृत्वादिक घडेना म्हणुन त्यास ईश्वरत्व बोलता नये ॥ ऐसे तरि अधिष्टान चैतन्य हीं माया ही मिळुन ईश्वरत्व बोलूं म्हणाल तरि ॥ आकाशही आकाशाधिष्ठान चैतन्य ही मिळुन ईश्वर जाले पाहिजे । त्यास ईश्वरत्व घडेना म्हणून मायातदधिष्टान चैतन्यास ईश्वरत्व बोलता नये । ऐसे तरि माया प्रतिबिंब मिळुन ईश्वरत्व म्हणुन बोलू म्हणाल तरि ॥ दोन्ही ही कल्पित म्हणुन या दोहीस ईश्वरत्व बोलीलें तरि ॥ ईश्वरास नित्यत्व सिद्धि न होये ॥ न होय तरि नहो म्हणाल तरि ॥ ईश्वरास नित्यत्व प्रतिपादणार श्रुति ज्या त्यांस विरोध येईल म्हणून मायातत्प्रतिबिंबास ईश्वरत्व बोलता नये ॥ ऐसे तरि अधिष्टान चैतन्यही प्रतिबिंब चैतन्यही मिळुन ईश्वरत्व म्हणून बोलूं म्हणाल तरि ॥ केवळ प्रतिबिंबास । केवल अधिष्टान चैतन्यास निर्विकार म्हणून निर्विकार चैतन्य द्वयासही विकार्य ऐसे जे ईश्वरत्व जे तें बोलता नये ॥ या कारणास्तव मायाहीं अधिष्टान चैतन्यही मायेचे ठाईं प्रतिबिंबले ऐसें जे चैतन्य जें हे तिन्ही मिळुन ईश्वर म्हणून बोलावे या प्रकारें करून जीवेश्वर कोठें निरूपिले म्हणाल तरि विद्यारण्य स्वामी जे तेही पंचदशी प्रकरणाचे ठाई निरूपिलें आहे ॥ ते वाक्यें कोणती म्हणाल तरि बोलूं

॥ चैतन्यं यदाधिष्ठानं लिंगदेहश्र्च यः पुनः ।

चिच्छाया लिंगदेहस्था तत्संधो जीव उच्यते ॥१॥

चिदानन्दमय ब्रह्म प्रतिबिम्बसमन्विता ।

तमोरजः सत्वगुणा प्रकृतिर्द्विविद्या च सा ॥२॥

सत्वशुद्ध्य़ाविशुद्धिभ्यां मायाविद्ये च ते मते ।

मायाबिम्बो वशीकृत्य तां स्यात्सर्वज्ञ ईश्वरः ॥३॥

याप्रकारें जीवेश्वराचें स्वरूपनिरूपण ॥ हे जे जीवेश्वर जेते मायाकल्पित म्हणून निश्र्चय करून या जीवेश्वरास अधिष्टानभूत निर्विकार निरवयव असंग स्वप्रकाश सर्व साक्षी ऐसा जो प्रत्यगात्मा तो मी म्हणून जो जाणतो । तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ मन जे तें महा चंचळ ॥ एका ठाई राहाव्याचें नव्हे ॥ आपणासी मिळुन असणार जो पुरुष त्यास ताप करणार ॥ येका विषयाचें ठाई लागले तरि ॥ त्यास आणिखी फीरवर्णे कठीण ॥ अत्यंत वेगवंत वायू जो तो जैसा स्थिर करावयास शक्य नव्हे । लंगरातें तोडून जाणार जो मस्त हस्ती तो जैसा स्थिर न करवे । तैसें मन ही स्थिर करावया कारणें शक्य नव्हे । म्हणून अर्जुन जो तो भगवंताप्रति बोलिला म्हणून ॥ समुद्रही पान केला जाईल मेरूपर्वत उपण्डिला जाईल ॥ वडवानलहीं प्राशिला जाईल चित्त निरोध महा कठिण म्हणून रघुनाथ वसिष्टा प्रति बोलिला म्हणून गीता ज्ञानवशिष्टादिक जे यांचे ठाईं बोलिलें आहे ॥ ते ईश्वर वशिष्टादिक जे ते चित्तनिरोध सुल्लभ म्हणूनहीं बोलिले आहेत ॥ त्या वाक्यातें टाकून लोकाचे ठाई चित्तनिरोध कठीण म्हणून बोलणार ऐसी जे वाक्यें त्यातें ऐकून कोणासही चित्तनिरोध सर्वात्मना घडेना म्हणून निश्र्चय करून ॥ वेदांतविचाराचे ठाई अधिकारिच नाही म्हणून बोलणार जे त्याच्या गोष्टी ऐकून कित्तेक भ्रमातें पावले आहेत ॥ त्याच्या भ्रमाते दुरि करावयाकारणे चित्तनिरोध महा सुलभ म्हणावयाचें दृष्टांतपूर्वक करून निरूपितों ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि बोलूं ॥ मन जे तें मोकाट ढोरासारिखें ॥ ते कैसे म्हणाल तरि मोकाट ढोर जे तें सर्वदा सेताचकडे जातें ॥ धरावयास गेले तरि पळुन जातें । त्यातें प्रयासें करून आणून गृहाचें ठाईं चारा घातल्यानें ॥ त्यातें आघ्राणमात्र करून त्या सेताचेंच चिंतन करित राहातें ॥ कित्तेक राहातें ॥ कित्तेक काळ राहील्यानंतर त्यानें सोडिलें ते आणिखी सेताचकडे जाते ॥ दुसऱ्या दिवशी याचप्रकारे करिताहेत ॥ त्याच्याही दुसरे दिवसी याच प्रकारे करिताहेत ॥ याप्रकारे करित करित येत येतां ॥ घरिच खादिचा अभ्यास होउन बाहेर मारून घातल्यां फिरून घरासच येतें ॥ तेव्हां ते ढोर अभ्यासेंच करून जैसे गृहाचे ठाई बंधनातें पावलें ॥ ऐसे वोढाळ ढोरासारिखें मनही जे ते अभ्यासें करून ॥ वैराग्येंकरून स्थिर करू ये ॥ अभ्यास म्हणिजे कोणता म्हणाल तरि बोलूं ॥ प्रत्यही आपणास अभिष्ट ऐसी जे मूर्ति जे तीचें दोनी घटिका ध्यान करणें ॥ करिते वेळेस ते चित्त जें तें फिरऊन विषयाचें ठाईं जातें ॥ त्यातें पुनः फिरउन त्या मूर्तिचे ठाईं ठेवणे या प्रकारें करून दुसऱ्या दिवसीं च्यारि घटिका ॥ तीसरे दिवसी सा घटिका ॥ चौथे दिवसी प्रहर ध्यान करित असतां ॥ या अभ्यासास्तव चित्त जे तें जेथें स्थिर केले तेथे स्थिर होतें ॥ हा अभ्यास म्हणून बोलीजेतो ॥ वैराग्य म्हणीजे कोणतें म्हणाल तरि ॥ अनेक जन्माचे ठाई विहीत ऐसी जे कर्मे जे ते अवघीही ईश्वरार्पणेंकरून करित येतां ॥ या प्रकारे केले ज्या पुरुषें त्याचे येका जन्माचें ठाईं चित्त परिपक्व होतें ॥ त्यानंतर विषयाचें ठाईं दोष दृष्टि येते ॥ त्यानंतर आविरिंच्यादमंगळ म्हणून ब्रह्म लोक तृणिकार बुद्धि होतें ॥ ते वैराग्य म्हणून बोलिजेतें ॥ त्या पुरुषाचें चित्त जे तें श्रवणादिकाचे ठाई जेथे ठेविलें तेथेच राहाते ॥ या कारणास्तव चित्त विरोध जो तो सर्वत्र घडेना जरी ॥ ईश्वर गुरू कटाक्ष ज्यास आहे ॥ त्यास अभ्यास वैराग्यें करून चित्तनिरोध जो तो सुलभें करून संपादिला जातो ॥ या कारणास्तव वेदांत विचाराचें ठाईं साधन चतुष्टय संपन्न ऐसा जो अधिकारि तो नाही म्हणायाचें प्रयोजन नाहीं सद्धि ॥ हा चित्तनिरोध कठिण म्हणायाविषई संमति ॥ श्र्लोक ॥ चंचलंहि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दढं ॥ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं ॥१॥ अप्यब्धिपानान्महतः सुमेरोन्मूलनादापि ॥ अपिवन्ह्यशनात् साधो विषमाश्र्चित निग्रहः ॥२॥असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहंचलं ॥ अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येणचगृह्यते ॥३॥ अपिपुष्पावदलनादपि लोचन मीलनात् । सुकरोहं कृति स्त्यागो न क्लेशोत्र मनागपि ॥ या प्रकारे विचारून ॥ वैराग्यातें संपादुन ॥ वैराग्यपूर्वकें करून ॥ श्रवणादिक जें त्यातें करून । जो कोणी ज्ञानातें संपादितो ॥ तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ देहेंद्रियास आत्म्यास वैलक्षण्यता बोलतों ॥ देहेंद्रियादिक जें तें अनित्य ॥ आत्मा नित्य ॥ देहोंद्रियादिक जे ते अशुद्ध ॥ आत्मा शुद्ध ॥ देहोंद्रियादिक जडरूप ॥ आत्मा बोधरूप ॥ देहोंद्रियादिक दुःखरूप ॥ आत्मा सुखरूप ॥ देहोंद्रियादिक दृश्य आत्मा द्रष्टा ॥ देहेंद्रियादिक सविकारि ॥ आत्मा निर्विकार ॥ देहोंद्रियादिक नानारूप । आत्मा सुखरूप ॥ देहेंद्रियादिक दृश्य आत्मा द्रष्टा ॥ देहेंद्रियादिक सविकारि ॥ आत्मा निर्विकार ॥ देहेंद्रियादिक नानारूप । आत्मा येकरूप ॥ देहोंद्रियादिक साक्षेप प्रकाश । आत्मा निरपेक्ष प्रकाश ॥ देहेंद्रियादिक परिछिन्न ॥ आत्मा अपरिछन्न ॥ देहोंद्रियादिक सकंप ॥ आत्मा निष्कंप ॥ देहोंद्रियादिक आधेय ॥ आत्मा आधार देहेंद्रियादिक सावयव ॥ आत्मा निरवयव ॥ देहोंद्रियादिक अप्रकाश ॥ आत्मा प्रकाशक देहेंद्रियादिक आद्यंत सहीत ॥ आत्मा आद्यंतरहीत ॥ देहेंद्रियादिक सजातीय विजातीय स्वगत भेद सहीत ॥ आत्मा सजातीय विजातीय स्वगतभेद रहीत ॥ देहेंद्रियादिक कार्य । आत्मा कारण । देहेंद्रियादिक गुणवंत ॥ आत्मा निर्गुण ॥ या प्रकारें देहेंद्रियास आत्म्यास वैलक्षण्य विचारून तो आत्मा मी म्हणून जो जाणतो तो मुक्त म्हणून वेदांत सिद्धांत ॥ लोकाचे ठाई श्रुति स्मृति ईतिहास पुराणागमाभियुक्त वचनें हे अवधीही तूंच ब्रह्म ऐसी बोलिली जरी ॥ गुरू जे ते ही तूंच ब्रह्म तूंच आत्मा श्रुति युक्ति अनुभवें करून बहुप्रकारें करून उपदेश केला जरी ॥ ईश्वर कटाक्ष थोराचा कटाक्ष ज्यास नाही ऐसा जो पापात्मा जो त्याची बुद्धि दुर्मार्गी जे त्याच्या उपदेशे करून तो सच्चिदानंद स्वरूप आत्मा मी म्हणून अंगीकार न करून । जड ऐसें जें देहेंद्रियादिक जे तेच मी म्हणून ग्रहण करितो म्हणून दृष्टांतपूर्वकेंकरून निरूपितो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि ॥ लोकाचे ठाई धर्मगुप्त म्हणून येक राजा होता ॥ तो धर्मेच करून प्राणी जे त्यातें बर्व्या प्रकारें पाळण करित होत्साता याप्रकारें कीत्तेक काळ असतां ॥ त्यानंतर भर्जू म्हणून आहे नाम ज्याचें ऐसा जो वंचक पापात्मा जो तो त्या राज्यास प्रधान जाहाला त्यानंतर तो त्या राज्यातें अधर्म बोधविता जाला ॥ बोधविला प्रकार कैसा म्हणाल तरि बोलूं ॥ या हो धर्मगुप्त हो म्हणून त्या राज्यातें बलाउन हे विद्वांसादि करून जे आहेत ॥ यांस इतकी वरुषासनें काशास देतो आहेस ॥ यांसी आम्हास प्रयोजन काय म्हणून हीं ॥ हेजीब हरकारे सेनवैदारवठकार चौकीदार हे आदिकरून यांस वेतन काशास देतोस ॥ आम्हांस यांचे प्रयोजन काये म्हणूनहीं ॥ याप्रकारें करून राज्यास बोधून ॥ कोणास ही जीवनोपाय नाहींसा करून । अवघ्याचा द्वेष करित होत्साता राज आणि मी ऐक्य होउन असल्यानें यांचा द्वेष माझें काय करूं पाहाते ॥ अप्रयोजिक म्हणून परवा न करून त्याचा अवमान करितच असतां याप्रकारें कीत्तेक काळ असतां ॥ येका समयाचें ठाईं । समस्त जनही मिळुन ॥ या भर्जुतें राज्यासमीप नये सारिखे करूं ॥ म्हणून येक संकेत करून ॥ राजद्वाराचे ठाई निरोध करून त्यातें राज्यासमीप नयेसारिखें केलें ॥ जेथें देखिलें तेथुन बाहिर घातला ॥ त्यानंतर ज्याच्या दृष्टिस पडला तोच खेदित असतां तो पळुन गेला ॥ त्यानंतर राजा भर्जु काय निमित्त येत नाही म्हणून पुसत असतां त्यास ज्वर आला म्हणून सांगितलें ॥ त्यानंतर राजा कष्टि होत्साता वैद्यातें बलाउन परामर्श करा म्हणून नेमिले ॥ ते वैद्य जे तेही आम्ही परामर्श केला त्यास दोष जाला ॥ तोच वाचत नाही म्हणून बोलिले ॥ त्यानंतर राजा बहुत कष्टि होत्साता मी त्याते न पाहातां राहु न सके म्हणून त्याच्या गृहास चालिला ॥ जातां सामोरे कीतेक येउन ॥ भर्जु मेला त्या शवातें तुम्ही पाहो नये म्हणून बोलून ॥ राज्यातें फिरउन राजगृहास घेउन येउन ॥ ऐसें अप्रयोजक किती नाहींत म्हणून त्या राज्यास विवेक सांगून दुःखातें दुरि केलें ॥ याप्रकारें असतां ॥ तो भर्जु जो तो अभिमान धरून ॥ मी राज्या समीप जाउन यातें साक्षीन म्हणून विचार करून ॥ यातें सीक्षील्या वाचून मी क्षौर करणार नाही म्हणून प्रतिज्ञा करून ॥ राज्याची भेटी केव्हां होईल म्हणून पाहात होत्साता होता ॥ त्यानंतर येका दिवसाचे ठाईं राजा पारधीस गेला म्हणून ऐकून जात्या मार्गीं अश्वत्था वरि वेधून कोणासही न दिसता होता ॥ त्यांनंतर राजा जो तो आपल्या सेने सहीत जाता ‘‘ विजयीभव ’’ म्हणून हांक मारून मी ॥ भर्जु होये ॥ अवघीं संकेत करून आपणांस तुम्हा समीप नये सारिखें मारून बाहिरि घातलें म्हणून हाक मारिली ॥ त्या नंतर राज्यानें अश्वत्था वरि होता जो भर्जु त्यातें पाहीलें ॥ त्यानंतर समीप असणार जे ते मेला जो भर्जु ते ब्रह्मराक्षस होउन पिंपळाच्या झाडावरि बैसला आहे म्हणून राज्यास समाजाउन वस्त्रेंकरून राज्यातें झाकून विभूती कापाळी लाउन राज्यास भीउं नको म्हणून धैर्य देउन घेउन गेले ॥ त्यानंतर त्या भर्जुतें कोरडेवऱ्हि मारून पळविलें ॥ तो राजा जो तो ही त्यांच्या गोष्टी ऐकून दोष रहीत चक्षू करून त्या भर्जुतें पाहिले असतांही ब्रह्मराक्षेस म्हणून जैसा निश्र्चय केला ॥ तैसे श्रुति स्मृति इतिहास पुराणागमाभियुक्त वचनें जे तें तूच आत्मा म्हणून बोलिले जरि ॥ गुरु जे तेही तूंच आत्मा तूंच ब्रह्म ॥ श्रुति युक्ति अनुभव जे येही करून उपदेश केला जरी ज्ञान जे तें श्रुतिप्रमाणें करून उत्पन्न जाहालें जरी ॥ प्रतिबंध ज्यास आहे ते विपरीत होत्साते जड ऐसे जे देहोन्द्रियादिक जे तेच मी म्हणून ग्रहरण करिते जाले ॥ हा अर्थ कोठें निरूपिला आहे म्हणाल तरी संक्षेपशारीकाचार्य जे ते पुराणें जे त्यांते शोधून त्या पुराणार्थातें संक्षेप शरीराचे ठाईं निरूपिले आहे . ते वाक्य कोणती म्हणाल तरी बोलूं ॥

पुरुषापराधमलिना धिषणा निरवद्यचक्षुरुदयापि यथा ।

न फलाय भर्च्छुविषया भवतिश्रुतिसंभवापि तु तथात्मनि धीः ॥१॥

इतिषोडशवर्णकंसमाप्तम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP