मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह|
जय देवा धूतपापा । आतां सं...

शंकराची आरती - जय देवा धूतपापा । आतां सं...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

जय देवा धूतपापा । आतां संकल्प खेपा ।
या क्षेत्री जन्मा आलों कृतकृत्य मी झालों ॥ धृ. ॥
रचना कैलासाची । शितळाई गंगेची विशाळ पर्वतांगे ॥
दोही भागीं गिरिशृंगे । मस्तकीं मध्यभागी ॥
दास करिसी सभागी । दीन जन उद्धराया ॥
पावन करिसी काया ॥ जय. ॥ १ ॥
कल्पतरू द्वारापुढे । ठायीं ठायीं फुलझाडें ॥
भवताली बागशाई । सुगंधिनी जुई जाई ॥
फुलती बारा मास । दाठ देऊळी सुवास हे स्थान अनुपम्य ।
 कैलासाहूनि रम्य ॥ जय. ॥ २ ॥
उत्साह प्रतिदिवशी न वर्णवे आनंदासी ॥
सर्वदा सद्‌गुण गाती । मंगलवाद्ये वाजविती ॥
सप्रेमे नाचताती । रंगी तल्लीन होती ॥
या सौख्या पार नाही । क्षेत्रें पाहतां दु:ख जाई ॥ जय. ॥ ३ ॥
जगदीश जगदुद्धारा । सोडवीं या संसारा ॥
चित्तवृत्ती शांत व्हावी । अवघी मायाकृति जाणावी ॥
नाचावे ब्रह्मानंदे ।  जगतारकनामछंदे ॥
करूनि कृपा वर देई । म्हणोनि विष्णु लोळे पायी ॥ जय देव. ॥ ४ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP