महारुद्रा जगन्नाथा शिवाभोळ्या शंकरा ॥
अति प्रेमें आरती ही करितों मीं तूजला ॥ धृ. ॥
भयकृद्भयभंजनादी ही नामें तुजप्रती ॥
विबुधादी सर्व प्रेमें तव सेवा वांछिती ॥
तव लीला वर्णनाची प्रीती असे मज अति ॥
भो ईशा सुप्रसादें दे दासा सद्गिरा ॥ महा. ॥ १ ॥
तव पादांबुज सेवा मम हातीं देउनी ॥
आसक्त भ्रमरप्राय रस द्यावा या जनीं ॥
उपदेश बोधुनीयां करि ऎसें मन्मनी ।
ज्ञानामृता पाजिं प्रेमें विठ्ठलात्मज किंकरा ॥ महा. ॥ २ ॥