पांडुरंगाची आरती - फळलें भाग्य माझें । धन्य ...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.
फळलें भाग्य माझें । धन्य झालों संसारीं ॥
सद्गुरु भेटला हो । तेणें धरियेले करीं ॥
पश्चिमें चालवीलें । आत्मस्तुती निर्धारी ॥
त्रिकुटांवरी नांदे देखियेली पंढरी ॥ १ ॥
ते सुख काय सांगूं ॥ वाचे बोलतां न ये ॥
आरतीचेनि गूणे । गेले मीपण माये ॥ धृ. ॥
राउळामाजी जातां । राहे देहअवस्था मन हें उन्मन झालें ॥
नसे बद्धतेची वार्ता ॥ हेतु हा मावळला ॥
शब्दा आली नि:शब्दता ॥ तटस्थ होऊनि ठेलों नीजरूप पाहतां ॥ २ ॥
त्रिगुण गुणाबाई ॥ पूर्ण जळल्या वाती ॥
नवलाव अविनाश ॥ न समाये स्वयंज्योती ॥
पाहतां लक्ष तेथें ॥ हालूं विसरलीं पाती ॥
नातुंडें माझें मन । नाहीं दिवसराती ॥ ३ ॥
आरती विठ्ठलाची । उजळली अंतरी ॥
प्रकाश थोर झाला । सांठवेना अंबरी ॥
रविशशी मावळले । तया तेजमाझारी ॥
वाजती दिव्य वाद्यें । अनुहातें गजरीं ॥ ४ ॥
आनंद सागरांत । प्रेमें दिधली बुडी ॥
लाधलों सौख्य मोठें । नये बोलतां बोली ॥
सदगुरुचेनि संगे । ऎसी आरती केली ॥
निवृत्तीने आनंदाची । तेथें वृत्ती नीमाली ॥ ५ ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP