मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...

पांडुरंगाची आरती - पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण दिग्वाहिनी ॥
तीर्थ ते चंद्रभागा ॥ महापातकधूणी ॥
उतरलें वैकुंठ महासुख मेदीनी ॥ १ ॥
जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा ॥
आरती ओवाळीन ॥ तुम्हां लक्ष्मीच्या कांता ॥ धृ. ॥
नित्य नवा सोहळा हो ॥ महावाद्यांचा गजर ॥
सन्मुख गरूडपारी ॥ उभा जोडोनी कर ॥
मंडित चतुर्भूज ॥ कटिं मिरवती कर ॥ २ ॥
हरिनाम कीर्तने हो ॥ आनंद महाद्वारी ॥
नाचती प्रेमसुखे ॥ नर तेथिच्या नारी ॥
जीवनमुक्त लोक ॥ नित्य पाहती हरी ॥ ३ ॥
आषाढी कार्तिकी हो ॥ गरुड टक्याचे भार ॥
गर्जती नामघोषे ॥ महावैष्णववीर ॥
पापासी रीग नाहीं ॥ असुर कांपती शूर ॥ ४ ॥
हें सुख पुंडलीके कैसें आणिले बापें ॥
निर्गुण साकारलें ॥ आम्हालागीं हें सोपें ॥
म्हणोंनी चरण धरुनी ॥ तुका राहिला सूखे ॥ जय. ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP