मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
विठ्ठला मायबापा । वारीं ...

पांडुरंगाची आरती - विठ्ठला मायबापा । वारीं ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

विठ्ठला मायबापा ।
वारीं त्रिविधतापा ।
संसारी त्रासलो मी ॥
वय लागलें मापा ॥ धृ. ॥

बाळपणीं नाठविले ॥
व्यर्थ तारुण्य गेलें ॥
जरा हे दु:ख मोठे ॥
पुढे ठाकुनि आले  ॥ विठ्ठला. ॥ १ ॥

भक्तीचा लेश कांही ॥
सत्यमागम नाही ॥
परिणामीं काय आतां ॥
शरण आलों तुझें पायी ॥ विठ्ठला ॥ २ ॥

हरी हरी माझी भ्रांती ॥
म्हणुनी आलो काकूळती ॥
कृपाळुबा जगन्नाथा ॥
तारी गंगाधरसूता ॥ विठ्ठला ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP