मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
पंचदशीचे सारीं पंडितभी भ्...

पांडुरंगाची आरती - पंचदशीचे सारीं पंडितभी भ्...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.

पंचदशीचे सारीं पंडितभी भ्रमले ॥
घटमठ खटपट करितां गुरुशिष्य श्रमले ॥
तव पदिं सुगमी नमले स्वमुखीं ते रमले ॥
पंढरीनाथा नयनी लक्षुनि विश्रमले ॥ १ ॥

जय देवा जय देवा पंढरीच्या राया ॥
वैकुंठा प्रति वससी जगदुद्धराया ॥ धृ. ॥

ढकलति चिरडति पडती वरडति भेटाया ॥
क्षीरापति उडविति किति वणंवति वेंचाया ॥
बडवे बडविति देवा झाला खेटा या ॥
पुनरपि जाणे खुंटें कालाच्या ठाया ॥ २ ॥

रिपुही चरणी लोळति सांडुनियां गर्व ॥
वर्णावर्ण हि नेणति भेटति सम सर्व ॥
नाचति अप्सरसांगण गाती गंधर्व ॥
बहु जन्मींच्या पुण्यें साधे हें सर्व ॥ ३ ॥

नाचावे संतांसह गांवे खेळावें ।
आनंदे डोलावें प्रेमें लोळावें ॥
न्हावें भीमाजळिं मन भजनीं घोळावें ॥
पुंडलिका भेटावें तव वपु टेळावें ॥ ४ ॥

थकलों येरझारी बहुविध संसारी ॥
तुज विस्मरलों दु:खें अनुभवलों सारिं ॥
ध्यानी यावें विठ्ठल पीतांबरधारी ॥
नारायणदासा न्या भवनिधिपरपारीं ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP