मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह| काय तुझा महिमा वर्णूं मी ... पांडुरंग आरती संग्रह युगें अठ्ठावीस विटेवर उभा... येई हो विठ्ठले माझे माऊली... विठ्ठला मायबापा । वारीं ... जय जय कटिकर विठ्ठल चिन्मय... आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर... धन्य दिवस अजि दर्शन संतां... जगदीश जगदीश देव तुज म्हणत... ऎसीया पायालागी मंगळ आरती ... ऎसीया पायालागी मंगळ आरती ... ओवाळूं आरती माझ्या पंढरीर... भक्तीचे पोटीं बोध कांकडा ... ओंवाळूं गे माये विठ्ठल सब... सुंदर अंगकांती मू... गावों नाचों विठी करुं तुझ... पंचदशीचे सारीं पंडितभी भ्... निर्जरवर स्मरहधर भीमातिरव... काय तुझा महिमा वर्णूं मी ... सुकुमार मुखकमल । निजसार न... पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ... जय पांडुरंग देवानंददुमकंप... फळलें भाग्य माझें । धन्य ... संत सनकादिक भक्त मिळाले अ... प्रेम सप्रेम आरती । गोविं... जय जगज्जननि , विठाबाई । उ... पांडुरंगाची आरती - काय तुझा महिमा वर्णूं मी ... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratipandurangvitthalआरतीपांडुरंगविठोबाविठ्ठल पांडुरंगाची आरती Translation - भाषांतर काय तुझा महिमा वर्णूं मी किती ॥नाममात्रें भवपाश पैं तुटती ॥ पाहतां पाऊलें ही श्रीविष्णूमूर्ती ॥कोटी कुळांसहित जग ते उद्धरती ॥ १ ॥जय देव जय देव जय पंढरीराया ॥करूनियां कुर्वंडी सांडीन काया ॥ धृ. ॥मंगल आरतीचा थोर हा महिमा ॥आणिक द्याया नाहीं तीस ती उपमा ॥श्रीमुखासहित देखे जो कर्मा ॥पासूनि सुटे जैसा रवि नाशी तमा ॥ २ ॥धन्य व्रतकाळ हे एकादशी ॥जागरण उपवास घडे जयासी ॥विष्णूचें पुजन एकभावेंसीं ॥नित्य मुक्त पूज्य तीन्ही लोकांसी ॥ ३ ॥न बचे वायां काळ जो तुज ध्याती ॥अखंड तुझा वास तयांच्या चित्तीं ॥घालें मुखें सदा प्रेमें डुल्लती ॥तीर्थे मिळणी वास तयांचा पाहती ॥ ४ ॥देव भक्त तूंची झालासी दोन्ही ॥वाढावया सुख भक्ति जनीं जडजीवां उद्धार व्हाया लागोनी ॥शरण तुका वंदी पाऊलें दोन्ही ॥ ५ ॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP