१ दत्तजयंती :
ही पौर्णिमा प्रदोषव्यापिनी घ्यावी. मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी म्रुग नक्षत्रात बुधवारी सायंकाळी अत्रिऋषीची पत्नी अनसूया प्रसूत झाली . अत्रिऋषींनी तो प्रत्यक्ष विष्णू जन्माला आला, असे समजून त्याचे नामकरण केले. ईश्वर स्वतः आपणाते देता झाला म्हणून तो दत्त आणि स्वस्थ म्हणजे अत्रीचा पुत्र असल्यामुळे आत्रेय, मिळून दत्तात्रेय असे नाव ठेवले. म्हणून जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात होतो. त्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण, सायंकाळी जन्माचे किर्तन इ. कार्यक्रम करतात. ज्यांना गुरुचरित्राचे पारायण शक्य नसेल, ते सात दिवस गुरु दत्तात्रेयाच्या नाममंत्राचा जप करतात. या दिवशी दत्तात्रेय - नवरात्र संपते.