१ अनंगत्रयोदशी :
(१) मार्ग. शु. त्रयोदशीला नदी, तलाव, विहीर या ठिकाणी अगर घरी स्नान करुन अनंग नर्मदेश्वर महादेवीची गंधाक्षता, पूष्प, धूपदीप आणि नैवेद्यादी उपचारपूर्वक पूजन करून व्रत करावे. विशेष गोष्ट अशी की, मार्गशीर्षादी महिन्यांत- १ मधू, २ चंदन, ३ न्यग्रोध, ४ बदरिफल, ५ करंज, ६ अर्कपुष्प, ७ जांभूळ, ८ आघाडा, ९ कमलपुष्प, १० पळस, ११ कुब्ज-अपामार्ग आणि १२ कदंब यांचे यथाक्रम पूजन व सेवन (रसप्राशन) करावे. विशेष विधान मूळ ग्रंथात पाहावे. या व्रताने शंकर प्रसन्न होतो.
२) या तिथीपासून एक वर्षभर प्रत्येक त्रयोदशीस अनंगाची (कामाची) निरनिराळ्या नावांनी, फुलांनी आणि नैवेद्यांनी पूजा करतात.
* प्रदोषव्रत :
अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि