-
उ.क्रि. १ गमन करणें ; जाणें ; मार्ग क्रमण करणें ; रस्ता क्रमणें ; जाण्यासाठीं पावलें टाकणें . मी दिवसास पंधरा कोस चालतों . २ पुढें जाणें ; प्रगति होणें ; चालू असणें ; सुरू असणें . त्या वकिलाचे हातामध्यें माझें काम यथायोग्य चालतें . कोश चालला . घर चाललें . ३ जाणें ; लोटणें ; गतींत असणें ; कंठिला जाणें ( दिवस , भरभराट , आयुष्य ); चालू राहणें ; वर्षानुवर्ष अस्तित्वांत असणें ( जिंदगी , रीतरिवाज ). ही माझी वृत्ति पांचशें वर्षे चालली . ४ अधिकार , वर्चस्व असणें ; प्राधान्य असणें ; पटणें ; यश येणें . त्या मनुष्याचें कोठेंही चालत नाहीं . ५ मान्य केलें जाणें ; पसंत पडणें ; उपयोगांत असणें ; चालू देणें ; बाजारांत , व्यवहारांत घेणें , स्वीकारणें ( नाणें , गोष्ट , वागणूक , हकीकत ). हें नाणें , ही गोष्ट , तुझी चेष्टा , त्याची उनाडकी एथें चालणार नाहीं . तूं दिलेला रुपाया आमच्या मुलखांत चालत नाही . - गुजा ३७ . ६ वागणें ; वर्तणें ; ऐकणें ( आज्ञा , हुकूम ). गुरू जसें सांगतील तसें चालावें . वैद्य सांगेल तसें चालावें . ७ कामास , उपयोगास पडणें ; पुरवणें ; समाधान करणें ; भागणें . ओलेंकोरडें जसें मिळेल तसें मला चालेल . चालला तर गाडा नाहीं तर वाडा . = उपयोगी असला तर सोय नाहीं तर अडचण . ८ चालू असणें ; सुरू असणें ( काम , यंत्र ). ९ विवक्षित , विशिष्ट गतीनें , ढबीनें , नेकीनें , गमन करणें , चालण्याची क्रिया करणें . १० योग्य होणें ; उपयोगी पडणें ; उतरणें ; जमणें ; हेतूला , उद्देशालां योग्य असणें . ११ लिहिण्यास धजणें ( लेखणी वगैरे ). १२ दरवळणें ; भरून जाणें ( सुवास वगैरेनीं ). १३ उपाय , युक्ति असणें . आलें देवाजीच्या मना । तेथें कोणाचें चालेना । ( या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ गमन किंवा गति असा आहे ). [ सं . चल = हलणें , चलन ; प्रा . चल्लइ ; फा . चरिदन ; झेंद चर ; फ्रेंजि . चलव ] ( वाप्र . ) चमकून चालणें - ऐटींत चालणें . चाले चुकावुनि पुढें चमकोनि घोषा । - आकं ३ . चालता घेणें - चालवून घेणें ; गुजारा करणें ; चालू होणें . चालून जाणें - हल्ला करणें ; चढाई करणें ; स्वारी करणें . हिंदुस्थान सरकाराचें लष्करी धोरण जरी रशिया संबंधानें बचावाचें असलें तथापि एकंदरीनें चालून जाण्याचेंच आहे . - टि २ . ३५७ . चालून देणें , चालों न देणें - न . ऐकणें . चालों न देचि मत , करि मन तैशाचेंहि वश्य पाप तिचें - मोमंभा ३ . ५२ .
-
चमकून चालणें
-
भीत भीत पाऊल टाकणें
-
v i Move, walk; proceed. Flow. Have effect. Have currency. Behave. Pass with. Work. Suit.
Site Search
Input language: