|
न. हाताचा पंजा आणि कोपर यांमधील भाग ; ( सामा . ) मणिबंध ; पंज्याचा सांधा . पाऊल व पायाची नळी यांच्यामधील सांध्याचें हाड ; घोटा ; पायाचा डोळा ; गोफा . घोड्याच्या पायाचा सांधा . ( ल . ) उपाय ; मार्ग ; योग्यता ( शक्ति , पैसा , विद्या इ० ची ). [ सं . मणि + कट ] म्ह० ज्याच्या मणगटास जोर तो बळी . ०घेणें बोंबा मारणें ; बोंबलणें . धरणें एखाद्यास कांहीं अपराधांत पकडणें ; आरोप ठेवणें . मणगटांत , मणगटास जोर असणें द्रव्य , अधिकार , योग्यता , शारीरिक शक्ति इ० बाबतींत समर्थ असणें . मणगटावर केंस येणें हातांतील जोर नाहींसा होणें ; एखादें काम करावयाला असमर्थ असणें . मणगटावर गोणी पडणें , येणें ( ल ) एखादें कष्टाचे किंवा जबाबदारीचें काम लांदलें जाणें . मणगटावर तेल , तेल चुना घालणें , ओतणें बोंबा मारणें ; बोंबलत सुटणें ( कांहीं एक विद्येविषयीं अज्ञ ). मणगटावर तेल घातलें पाहिजे मूर्ख , अडाणी मनुष्यास उद्देशून योजितात . मणगटासारखें मणगट पाहून कन्या द्यावी , मणगटासारखें मणगट पहावें शरीर , पैसा , परिस्थिति इ० बाबतींत कन्येशीं जुळणारा वर पहावा . मणगटाशीं मणगट घासणें एखाद्याशीं बरोबरी , स्पर्धा करणें . मणगटी स्त्री . लहान मुलांच्या मणगटांत घालण्याचा मण्यांचा एक अलंकार .
|