|
पु. १ कपडा शिवण्याची एक तर्हा ; टीप . ( क्रि० घालणें ). २ पाथरवटाची छिणी ; टांकी . झाला क्षितिला दंडें जेविं शिळेलागि खाणिता टंकें । - मोआदि २ . १०४ . २ चार माषांचें वजन . टाक पहा . ३ टाईप ; छापखान्याचा खिळा ; ठसा . [ सं . ] - क्रिवि . ( जोरदार , अर्थद्योतक अव्यय . याचा उपयोग वजन - मापासंबंधींच्या क्रियापदाशीं व नामाशीं होतो ). १ तंतोतंत प्रमाणानें , अंशानें ; भारंभार ; अगदीं वजनाबरहुकूम . ( क्रि० उतरणें ; होणें ). पुण्याचे मापानें दाणे आणिले ते आळंदीचे मापानें टंक उतरले . - वि . परस्पर तुल्य ; बरोबर हें वजन आणि तें माप टंक आहेत . [ सं . ] स्त्री. १ कपाळाचा एकसारखा लागलेला ठणका ; कपाळ उठणें . ( क्रि० लागणें ). २ सतत एकाच दृष्टीनें पहाण्याचा प्रकार ; एकसारखी दृष्टि . ( क्रि० लावणें ; लागणें ). डोळीया पडलें टकां । - ब २३४ . ३ अखंड आवाज ( एकसारखा पाठ , अभ्यास , ओरड , रडें , भुंकणें , गाणें , पाऊस पडणें इ० चा ); सततपणा ; अखंडता ; टकळी ; गुर्हाळ . एकसारखी भाषणाची पढण्याची - म्हणण्याची - पावसाची - रडण्याची - टक लावली आहे . - न . १ ( काव्य ) आश्चर्यामुळें होणारी एकाग्रता , एके ठिकाणीं दृष्टि ; नवल ; अत्यंत आश्चर्य ; आश्चर्याचा अतिरेक ; भूल . ( क्रि० पडणें ). मागधासी पडलें टक । तटस्थ ठेला मुहूर्त एक । - एरुस्व ११ . ४५ . २ ( ल . ) मौन ; मुग्धपणा ( आश्चर्यानें ). वर्णितां थोरांसि पडलें टक । - भवि २७ . ८ . ३ एकाग्रता ; एकसारखी नजर . तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडलें । टकासी टक लागलें । - ज्ञा ११ . १९२ . ४ संकट . - मनको . [ घ्व व दृश्य . तुल० सं . तक = तग धरणें ] ०यंत्र न. टाईपरायटर . ०टक स्त्री. १ अखंडपणा ; सातत्य . २ कंटाळवाणें भाषण ; बडबड ; टकळी ; वटवट . ३ सतत पिरपिर , चिरचिर ; रडणें ( मुलाचें ). ०क टकां - क्रिवि . १ अनिमेषदृष्टीनें ; एकसारखें रोखून ( क्रि० पाहणें ) तो मूल दिव्याकडे टकटक पाहातो . २ ( कानशिलें इ० ) शिलशिलण्यानें ; उडण्यानें . ( क्रि० करणें ).
|